Posts

अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत

बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं. मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निव...

आवडलेले थोडे काही

मित्रांनो, खुप दिवसांनी एक नवा खो-खो सुरु करतोय. विषय तसा बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा आहे त्यामुळे मझा यावा हीच (श्रींची!) ईच्छा. कविता जश्या बालभारतीच्या तावडीतुन मुक्त झाल्या, तुम्हा-आम्हाला त्या (अचानकच?) आवडायला लागल्या. त्या आवडीनिवडीतही जिवाच्या जवळ असणारया काही कविता असतातच. हा खो खो अश्याच कवितांसाठी. यावेळी खेळाचे नियम जssरा बदलतोय. १. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा २. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २) ३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा ४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही ५. अजून नियम नाहीत :) --------------------------- XXXXXXXXXXXXXXX- ----------------------- सख...

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी

खुप आधी नाटकांविषयी लिहीलं होतं. नाट्यगीतांविषयी न लिहीतो तर कुठे तरी आत रुखरुख लागली असती. मराठी गाण्यांची पहीली आठवण म्हणजे भावनातिरेकाने मळमळणारी करुण, दारुण भावगीते. रस्त्यावरची भिकारीण असो की कॉलेजात जाणारी चंपट पोरं असो, सारी आळवुन आळवुन शुद्ध, दाणेदार, स्वच्छ, सुमधुर आवाजातच गाणार. ते खोटे शब्द, खांडेकरी आदर्शांचा काव्यगुळ यात खरं तर मराठी गाण्यांचा आमच्या पुरता मुडदाच पडला असता पण.. ..पण वसंतराव भेटले. वसंतराव म्हणजे बाप-माणुस. आधी नुस्तंच "घेई छंद मकरंद" आवडायचं कारण त्यातली तानांची भराभरा उलगडणारी भेंडोळी. "घेई छंद" चं विलंबित व्हर्जन मिळमिळीत वाटायचं आणि तडफदार वसंतरावांबद्दल आदर द्विगुणित व्हायचा. तेव्हा उत्तुंग नाट्यशिल्प (कदाचित) दुसरया कुठल्या तरी नावाखाली कॅसेटच्या स्वरुपात मिळायचं. कान जरा सेट झाल्यावर "घेई छंद" च्या विलंबित लयीची पण मजा कळायला लागली. तो पर्यंत वसंतराव नुस्ते छा गये थे. "मृगनयना रसिक मोहीनी" सारखं तलावातल्या चांदण्यासारखं संथपणे पसरत जाणारं गाणं असो की "सुरत पिया की" सारखी दमसाजाची परिक्षा घेणारं, प्रचं...

भरल्या पोटीचा न-अभंग

कोंबड्यागत फोनाचे आरविणे-मेलाचे फोनातच चेकविणे स्वप्नांच्या बुडावर लाथविणे-आपणची आपुल्या निग्रहाने पुस्तक मिटणे-एमओएमांमागे जीवा पळविणे पापण्यांना तिष्ठविणे-भरल्या पोटी कळफलकावर कळा काढिणे-दुसरयांच्या घाणी निस्तरणे आपुल्या खालचे जळणे-कोणा न दिसे सश्याचे आतची धडधडणे-श्वासांचे येणे अन रेंगाळणे सुरांचे आर्त आळविणे-मनयोगासाठी शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे

काळेकुट्ट सर्पगार काही

//१// दिवाभीत काळोखात देखील त्याला मानेवरुन पाठीकडे सरकणारे सर्पगार स्पर्श जाणवले. क्षणापुर्वी थोड्या अंतरावर झालेल्या कारच्या स्फोटाने त्याचे हात अजूनही थरथरत होते. चार फौजी ऑफीसर वाळुच्या किल्ल्यासारखे विस्कटुन गेले होते. कुणाचं काय कुठं होतं हे न ओळखु येण्याइतपत विस्कटलेले! त्याला मौलाना आठवले. ज्या विश्वासाने त्यांनी त्याच्यावर ही कामगिरी सोपविली होती, तितक्याच सफाईने त्याने ती पार पाडली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या असंख्य अपमानित बांधवांचे मळलेले पण आज हसणारे चेहरे तरळत होते. एमआयटीतला केमिकल इंजिनिअर ते धर्मयोद्धा, एक कठीण अंतर केवळ श्रद्धेपोटी त्याने पार केले होते. मौलाना भेटले नसते तर आजही तो एमआयटीच्या लॅबमधे प्रयोग करत बसला असता. एमआयटीच्या आठवणीसरशी त्याला तिथेच भेटलेली अबिदा आठवली. त्याच्या डोळ्यात तिचे उष्ण श्वास उतरले पण जाणवलेच नाहीत. मात्र मणक्यावरचे सर्प आता अधीकच धीट झाले होते. त्याने स्वतःची पाठ चाचपून बघीतली, रक्ताचा एक काळसर लाल ओघळ गडद होत जात होता. कदाचित बॉम्बचा एखादा तुकडा उडून त्याच्या पाठीत रुतला होता. विषारी मृत्युची चाहूल त्याच्यातल्या इंजिनिअरला आधी ...

बिनबुडाची टिपणं

काही टिपणं फार विक्षिप्त असतात. त्यांना ना बुड ना शेंडा पण त्यांचं अस्तित्व काही नाकारता येत नाही. बरं दोन टिपणांमधे काही साम्य असावंच असा ही नियम नाही. पारयासारखी ही टिपणं मनाला येईल तेव्हा एकत्र होतात आणि मनाला येईल तेव्हा परकी होतात. पण म्हणून लिहीलं नाही तर उरावरही बसतात आमच्या सोसायटीकडून डहाणुकरला जाताना स्मृतीवन लागतं. किंचित जंगल म्हणता येईल इतपतच झाडांची दाटी आहे तिथे. सवयीने तिथली झाडे शिळी झालेली. हल्ली साधं लक्षही जात नाही तिकडे. परवा अखंड पाऊस पडत होता आणि अचानकच हिर्व्या रंगाचं काहूर माजलेलं दिसलं स्मृतीवनात. जुनीच कविता आठवली झाडे शांत रात्रीच्या येण्यानंतरही स्तब्धतेची शाल पानांआडून सावरुन किंचितशी दमल्यासारखी झाडे सारे ऋतु पानगळ मनात असून नसल्यासारखी अलिप्त खोल मुळे गाडून घट्ट उभी राहील्यासारखी झाडे माणसांवर कलम होतात कधी स्वतःच्याही नकळत रुजून जातात झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी झाडांची आठवण निघावी आणि फुलांचे ऋतु आठवु नयेत म्हणजे शुद्ध क्रुरपणाच. काय गडबड आहे मेंदुत माहीत नाही पण मला कधी गुलाबाचा वासच येत नाही. सुगंध म्हटलं की आधी माठातल्या पाण्यात तरळणारा मो...

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली शपथांचे नवे बहाणे पाऊस कधीचा पडतो उठवित निजली राने या गावामध्ये असतील चैतन्य भारले रावे रक्ताला फुटणारे पण गाणे कोणी गावे पाऊस चिंब भिजलेला गारांचा फसवा तिड धा श्वासात तुझ्या भासांनी विस्कटलेली राधा तो मदमत्त मातीचा गंध ते ओले गुणगुण पाते हातातून क्षितीज हातांचे पारयागत निसटुनी जाते तू ये नां श्रावण बनूनी झुलव्यांचा बहर कुणाला हिरव्या गवतावर माझा बघ श्वास मोडूनी गेला