Posts

इडिपसाचे किंचित जुने वर्तमान

स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. नाटकाच्या वाचनाला स्टेजचा हट्ट करण्याची दोन कारणं; नाटक ही केवळ गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे ही दृष्टी आणि स्टेजचं असणं. तर, स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. अंड्यातल्या बलकासारखा कोवळा पिवळसर प्रकाश मध्याभागी ठेवलेल्या ३-४ खुर्च्यांवरुन ओसांडून वाहात असतो आणि अंधाराचं एक टोक पकडून मी स्टेजच्या एका कोपरयात बसलेलो. अंधाराचा अवकाश मोठा सुखद असतो. शरीराचे निर्बुद्ध प्रतल कुणाला वाचता येत नाही की डोळ्यांमधून उमटणारे अर्थांचे नाचरे बेबंद मोर कैद करावे लागत नाहीत. आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत. अंधाराच्या पल्याड अजून थोडा अंधार असावा तशी तू गर्द काळी शाल पांघरुन विरुद्ध अर्थाच्या कोपरयात बसलेलीस. काय करत असावीस? अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण? कठीणपणे लपत होतं तुझं लख्ख लावण्य त्या काळ्या शालीत आणि तसे तुझे अट्टहासही नसावेत बहूदा. मी तुला निरपेक्षपणे पाहात राहातो. समाधी मोडते कारण नाटकाचं वाचन सुरु होतं; राजा इडिपस! इडिपस, लुई, जोकास्टा सारे पुस्तकातून जीवंत ...

मरा साले हो

मरा साले हो मराच तुम्ही. तुमची तीच लायकी आहे. झाकलेत डोळे? हां आता मी गाणं म्हणतो "कुणी तरी यावं, बॉम्ब टाकून जावं" भ्याड आणि नामर्द येतं कुणी आणि तुमच्या बरगडीत (हो, त्याचीच कुणी शस्त्र केली होती कधी!) बंदूक टोचून टुचकवतं तुम्हाला आणि तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे मरुन पडता रस्त्यावर बेवारश्यासारखे. तुम्ही हुतात्मे नाही झालात तरी मॄतात्मे व्हाल आणि उदार मायबाप सरकार "सानुग्रह" मदत देईल तुम्हाला. पण साले तुम्ही टुचकेच. सानुग्रह मदत मिळण्यासाठीपण तुम्ही कुणालातरी पैसे चाराल आणि उरल्यासुरल्या भिकार तुकड्यांवर येडझव्यासारखे टॅक्स भराल. टॅक्स म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट. विचारता त्याचं काय होतं ते? टॅक्स मधून लोकांनी, लोकांसाठी, लोकांमधून निवडुन दिलेल्या सरकारची yz सिक्युरिटी येते. त्यांच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटत नाहीत, इन शॉर्ट, ते तुमच्या सारखे सामान्य आणि टुचके नाही राहात. टॅक्स मधून तुरुंगात राहाणारया आणि सरकार नसून सरकार असणारया सोद्यांची सोय होते. सोदे कंटाळले की बाहेर येतात आणि दिवाळी समजून पाच-पन्नास फटाके फोडतात. आणि तुम्ही? तुम्ही नेमक्यावेळी नेमक्या ठिकाणी असल्...

आरसा आपुलिये/आंगी आपण पाहे/तरी जाणणें जाणों लाहे/आपणयातें

मुलभुत, उदाहरणार्थ हिंसा, सत्ता, निष्ठा किंवा व्यभिचार वगैरे वगैरे... ... कॉलनीच्या ओसाड पटांगणात महाळुंग्यानं उगाच रिकाम्या फुटबॉलला लाथ घातली. पंधरा-वीस मिनीटांत निदान तीनवेळा तो वॉचमनला वेळ विचारुन आला होता. रवीवारी दुपारी काही केल्या दोनच्या पुढे घडाळ्याचा काटा काही सरकत नव्हता. या वेळी कुणाच्या घरी जाऊन खेळायचं म्हणजे फुकटात शिव्या खायच्या इतपत व्यवहार त्याला माहीत होता. रिकाम्या गोकर्ण्याचं तसं नव्हतं. तो येताना सगळ्या मित्रांची दार वाजवत आलेला. दार वाजवल्यावर ’कोण’ या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत पण रिकाम्या तिथे थांबला नव्हता. रिकाम्याला पाहून महाळुंग्याला उगीच बरं वाटलं. रिकाम्याचं भरुन वाहाणारं नाक आणि विटके कपडे यांच्या पलीकडेही महाळुंग्याला रिकाम्या आवडायचा. म्हणजे साहित्यीक भाषेत कसं इमानी वगैरे होता तो. महाळुंग्यानं प्रेमाच्या भरात आरोळी ठोकली "हैश्य्य्य्य्य्य्य्य." फुटबॉलला मनसोक्त तुडवून झाल्यावर रिकाम्यानं खिशातून मोर मारुन भरल्यासारखी निळीगर्द गोटी काढली आणि डोळ्याला लावून गंमत बघायला लागला. "च्यायला" मैदाच्या पोत्यासारखा भुस...

देवी

देवी, नेसत्या आत्म्यानिशी भेटलेल्या स्त्रीयांची माणूस-रुपं. तीन वेगवेगळ्या कालखंडात (!?) लिहीलेल्या कविता, एकत्र जोडून काही अर्थपुर्ण होतय का ते बघतोय... देवी-१ //१// बर्फ वितळतो मणक्यात माझ्या, मरणगंध पुन्हा दरवळतो त्याच्या अभिषेकात. सांगा देवीजी, तुमचं अस्तित्व एखाद्या अभिशापासारखं का भासतं? माझे रंग, गंध, सूर, छंद सारे कसे ओढून घेतात स्वतःला स्वतःतच //२// आज तुमच्या नावाचा गोंधळ देवीजी, जागरणाला याल नां तुम्ही? आमच्या उभ्या देहाचा पेटलाय पोत, त्यात मनाच्या गाभारयात घुमतं तुमचं बोलणं उदासारखं. घुसमटतो माझा प्राण. आत्मव्देषाचा हा उत्सव तुमच्याच आशिर्वादाने पार पाडतोय मी. तुम्ही दिलेल्या लक्ष लक्ष जिव्हारजख्मा प्रत्येक क्षणात मरणाशी तडजोड करतात कवितांच्या बोलीवर. या कविताही तुमच्या व्रताचं उद्यापन //३// तुम्ही माझ्या? मी मात्र सर्वस्वी तुमचाच. माझ्याकडून बांधलेले संबंधांचे दोर आणि तुम्ही तगवलेलं नातं निव्वळ दुःखाचं सुंदर देवी-२ //१// देवी, तू जननी या शोधाची आणि सनातन नात्याची आद्यकडी. माझ्या रक्तातील पेशीपेशीत तुझं ...

रेषेवरची अक्षरे..०८

१९०९ मधे रघुनाथरावांनी दिवाळी अंकाची एक अनोखी प्रथा मराठीत सुरु केली आणि आज शताब्दी वर्षात या प्रथेला आमचा हा सलाम... http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/

बोका

नवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का? कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली. स्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या. स्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा. बाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की ...

डॅड, डोन्ट किल सुपरमॅन

Hey Dad, तू कधीच कॉमिक्स आणून नाही दिलंस मला. विचारलं की म्हणायचास कल्पनाशक्ती झडते आणि मला ही ते नेहमी सारखं पटून गेलं! अधूनमधून हातात येणारया अमरचित्रकथा सोडल्या तर मधल्या काळात खानदानी पुस्तकं माझ्यात खोलवर रुजत गेलेली. पानांपानांवर उगवलेले शब्द आणि त्या शब्दांना लगडलेल्या अर्थांच्या कित्येक शक्यता यांनी मनावर गारुड घतलेलं. पण मग नवल झालं. जाळीफेक्या स्पायडी पुस्तकातून टीव्हीत घुसला. त्याचे अगम्य शत्रु पुराणकथांहून चमत्कारीक होते. त्याची अक्कल फा.फे.हून वेगळ्या कुळीची होती आणि त्याचं विश्व कदाचित विरधवलाहून चित्तथरारक होतं. मध्येच कधी तरी अर्चुनं सुपरमॅन, मॅन्ड्रेक आणि फॅन्टमशी ओळख करुन दिली आणि सुपरहिरोजची एक पंगतच माझ्या अंगणात झडली. नथिंग रॉन्ग आफ्टर अ पॉईन्ट ऑफ टाईम, यू सेड, खरं आणि खोट तुझं तुलाच कळेल! तू बरोबर होतास डॅड. चिरंतन सोबतीला कोणती पुस्तकं राहातील हे कळण्या इतपत शहाणा करुन सोडला होतास तू मला. नंतर कधी प्रकर्षानं कुठलाच सुपरमॅन नाही आठवला मला. पण आज, जेव्हा मी तीन, तेरा किंवा तीस कुठल्याही वयाचा असू शकतो, मला सुपरमॅन कुठे तरी असावासा वाटतो. उन्मळुन पडणारी माणुसकीची मु...