Posts

शुभ्र कबूतर युगायुगांचे

युगांत झाला तसं नेमून दिलेल्या कामागत चहुबाजूने समुद्र चढले. कणा कणाने, क्षणा क्षणाने अवघी पृथ्वी जलमय झाली. रंग-रेषांगत सारे सजीव-निर्जीव कोणत्याही खुणा मागे न ठेवता हल्केच ओघळुन गेले. सारे संपले तसे आकाशाने एकदाच आपले सबंध प्रतिबिंब हळुहळु स्थिरावणारया पाण्यात पाहीले. पाण्याशी कानगोष्टी करायला आकाशाला क्षितीजाची आता गरजच नव्हती मुळी. एक हळुवार फुंकर मारली तरी शहारे यायचे पाण्यावर. दहा महीने चाललेली पाण्याची देहमग्नता मोडली ती नोहच्या निर्मितीच्या नव्या खुणा वागवणारया बोटीने. नोहनं हाताच्या ओंजळीत धरलेलं शुभ्र कबूतर एकवार सश्रद्धपणे डोळ्यांना टेकवलं आणि जमिनीच्या शोधार्थ त्याला आकाशात सोडून दिलं. आशेचा चिवट अदृष्य तंतू पायी बांधलेलं ते कबूतर थोड्याच वेळात ऑलिव्हची डहाळी चोचींत घेऊन नव्या विश्वाची ग्वाही फिरवत परत आलं. ********************************************************************************* विशाल सागराच्या मधोमध उगवलेल्या शाबोध बेटावर कल्लोळ शांतता होती. जगातले काही प्रज्ञावंत काही दशकांपासून तिथे राहात होते आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीनं, त्यांनी शाबोधभोवती जणु अदृश्य पोलाद...

रेषेवरची अक्षरे

नमस्कार! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - संपादक मंडळ http://reshakshare.blogspot.com/

कविता: आधी, आत्ता आणि पुढे?

Image
'Twas not my blame-who sped too slow 'Twas not his blame-who died While I was reaching him But 'twas - the fact that He was dead - एमिली कवितेच्या प्रांतात सध्या एक स्फोटक शांतता आहे. हा स्फोट अनेक अर्थी आहे. कविता फारसं कुणी छापत नाही. कविता फारसं कुणी विकत घेऊन वाचत नाही. कवितेत नवे प्रयोग असे क्वचितच होताहेत. अगदी गेला बाजार, हल्ली कुणी कवींवर नवे विनोदही करत नाही! म्हणजे मराठीतली कविता मेली का? तर निदान अजून तरी नाही असंच उत्तर द्यावं लागेल. बाजारात भाराभर नवे कवी स्वतःच्या पैश्यांनी कविता संग्रह छापताहेत. सहज मराठी ब्लॉग-विश्वाचं निरीक्षण करा. कवितांच्या ब्लॉगची संख्या अगदी लक्षणीय! म्हणजेच उदंड जाहले कवडे!! वाचतय कोण? वाचल्यानंतर झिरपत जाऊन शिल्लक राहतय कोण? धोंड, विजया राजाध्यक्ष, सुधीर रसाळ या बाप-समिक्षकांनी समिक्षा केलेला शेवटचा कवी कोण? प्रश्नचिन्हांच्या ओझ्याखाली दबलात तरीही तुमचं उत्तर मला ठाऊक आहे. पाडगावकर, ग्रेस, भट, आरती प्रभु, कुसुमाग्रज, विंदा...अहो जुनी पिढी ही कवींची! सौमित्र आणि (समजा ओढून ताणून) संदीप खरे म्हणता? आणि हो,हो, सलिल वाघ देखील!! चांगले शिक...

झाडे भ्रमिष्ट झाली

मातीत मिटून फुटलेली बहरुन झाडे आली पाण्यात पसरुनी नाती आकाश पेलती झाली झाडांची माया पुरुषी मौनाला यावी कीव देठाला चुकवून जेव्हा फुल देतसे जीव पाण्याचे गोत्र निराळे ते तहानलेले ओले प्रतिमा वाहून नेताना झाडास पुसे ना बोले झाडांचे तरते भास माती नं मुळाला पाणी देह विस्कटुन गाते जणु भासामधली राणी प्रतिमांचे साजण ओझे झाडे जळात झुकली माश्यांचे रडणे पाहून पण झाडे भ्रमिष्ट झाली

सदु स्टार डॉट स्टार

म्हणजे सदु काही हुशार नसतो. डोंबिवलीतला माणूस कसा लोकल पकडताना अचानक शुर होतो तितपत प्रसंगानुरुप हुशारी सदुला कधीमधी जमून जाते इतकंच. सदुची ऑफिसला येण्याजाण्याची वेळ हा या हुशारीचा एक नमुना. आम जनतेगत सकाळी साडेसातच्या बसने सदु कधीच जात नाही. सदु सकाळी साडेनवाची बस जमवतो आणि येताना आठची. सकाळी घरच्यांच्या धावपळीत आपली भर नाही म्हणून कौटुंबिक सदु खुश, आपण बसने जातो आणि गाडीसाठी पेट्रोल जाळत नाही म्हणून सामाजिक सदु खुश, साडेआठाला येणारी टीम आणि अकराला येणारा प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या दरम्यान आघाडी सांभाळायला मिळते म्हणून ऑफिशिअल सदु खुश वगैरे वगैरे. म्हणजे हे फार पुर्वी सदुला कधीतरी जाणवायचं. हल्ली साडेनवाच्या बसमधे खिडकीपाशी झोपायला मिळतं आणि हिंजवडीच्या कोपरयावर वाकडला भयाण ट्रॅफिक-जॅम लागत नाही एव्हढंच सत्य उरलं होतं. सदुनं विचार करत करत (सश्याचं गंडस्थळ त्या चालीवर सदुच्या परिस्थितीचं सिंहावलोकन!) कदाचित जास्तंच जोरात सुस्कारा टाकला असावा कारण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवुन झोपलेल्या सुंदरीनामक प्राण्याला खडबडुन जाग आली. "अबीबी उद्री है क्या?" असं त्या द्राविडभाषिणीनं तमिळ ह...

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला. कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..." नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग. लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला. जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं रेशमी रेशमी अंबरी अंबरी आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुण...

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले, तडकले, जागोजाग तेव्हाच्या. आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या. .. आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या. एका उपनदीचे नाव डार्लिंग." नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आ...