पुल, संत आणि मराठी माणूस

या सगळ्या व्यक्ती/समाजाबद्दल अनेकांनी अनेक ठिकाणी लिहीलेले आहे, त्यात आता माझी ही भर!

आपल्याला आपल्या श्रीमंत संत परंपरेचा भरपूर अभिमान आहे, पण माझ्या मते मराठी माणसाचं या सगळ्या प्रकारात खूप नुकसानही झालं आहे. रामदासांचा अपवाद वगळता, आपले बहूतेक संत या जगाबद्दल काहीच बोलत नाहीत. जे जग आपण पाहीलेच नाही त्याचे स्वप्नरंजन करण्याची एक घातक सवय या समाजाला लावली. याही पलीकडे जाऊन, आपले राहाते जग ही एक ताबडतोब सोडावी अशी जागा आहे, इथे मिळणारया प्रत्तेक सुखाची किंमत "तिथे" चुकवायची आहे, तेंव्हा ही सारी सुखे म्हणजे पाप आहे, मिथ्या आहे असा काहीसा अविर्भाव कितीतरी अभंगात दिसतो. अर्थात याचीच चांगली बाजू म्हणजे मराठी समाज भोगवादी झाला नाही.

आश्चर्य वाटत ते रामदासांचं. ज्या माणसाने कधीही संसार केला नाही, तो अधिकारवाणीने इतका सुंदर उपदेश करु शकतो? ज्या काळात व्यवस्थापन शास्त्राची सुरुवातही झाली नव्हती, त्या काळात हा माणूस कालातीत सुत्रं सांगतो?
पण हा अपवाद! आणि अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही!!

दुसरा अपवाद ज्ञानेश्वरांचा ज्यांनी ही माझी लिहीती भाषा मला दिली!!

तर अश्या मुशीतून तयार झालेला हा मराठी समाज. आनंद उपभोगणं, मोठ्याने हसणं, विनोद करणं हे शिष्टसंमत नसणं ही एक आपली ओळख निर्माण करुन बसलेला.

अश्या समाजात पु ल जन्माला आले, आवडले हा माझ्या मते एक मोठा बदल होता. पु लंच्या लिखाणावर काही बोलण्याची माझी लायकी नाही, पण या माणसाने शतकानुशतके चालत आलेली सुख/आनंद नाकारण्याची प्रर्दिघ परंपरा मोडली! जगण्याचा आनंद कसा घ्यावा, र्निलेप पणे दुसय्रा वर कसे प्रेम करावे, कौतूक करावे, खळखळून हसावे हे या माणसाने आपल्याला शिकवले. त्या अर्थाने पु ल म्हणजे मराठी माणसाचं "आनंदाचं झाडं" होत.
कुठे कुणाला न दुखवता हसता येतं हे कदाचित आपल्याला या माणसामुळेच कळालं असेल. रसिकतेच्या नव्या परिभाषा आपल्याला कळाल्या. एकच माणूस लिहीतो, गातो, संगीत देतो, नाटक-सिनेमे करतो हेही एक वेळ मान्य आहे पण हाच माणूस अजातशत्रु पदाला पोचून जगन्‌मित्रही होतो हे फक्त त्यालाच शक्य आहे जो जगण्याच्या प्रत्त्येक अंगांगावर प्रेम करतो, प्रत्त्येक क्षण तितक्याच उत्कटतेने जगतो, ज्याच्या डोळ्यातील मुलपण अजून शिल्लक आहे!

आता आपल्याला गरज आहे अजून एका पुलंची जो आपल्याला शिकवेल की पैसा कमावणं वाईट नसतं, प्रत्त्येक श्रीमंत माणूस गुन्हेगार नसतो, गरीबी हा अभिमानाचा विषय नसून लाजेची बाब आहे, कोणतही काम हलकं नसतं आणि एखाद्याचा साहेबपणा त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसावा लागतो ना की त्याचा संबोधनातून!! जो थोडासा समाजवादीपणा/communisam आपल्यात भरुन राहीला आहे, त्या संदर्भात हा सुदंर quote:

"जो माणूस तरुणपणी कम्युनिस्ट नसतो, तो तरुणच नाही आणि जो म्हातारपणीही कम्युनिस्ट राहातो तो वेडा असतो"

Comments

तुझा मला सर्वात जास्त आवडलेला लेख.Could not agree with you more. आपल्यात थोडा नाही ठासुन socialism भरला आहे. पु.ल. चे योगदान यात खुपच आहे. माझ्यामते महाराष्ट्राला पुल तेंडुलकर खानोलकर जिए पाडगावकरांसारख्या अनेक बुद्धीवादी लेखक लाभले ज्यांनी आपल्या कलाकारीतुन लोकांना भोदुगिरीच्या मागे लावले नाही.
सध्या संदिप खरे आहे, पण मला प्रविण दवणे अवचट जास्त दिसत आहेत.
तुझे या दोघांविषयी काय मत आहे?