गणित
परवा प्रत्युषचा result आणायला गेलो होतो. कोणी आमचा फोटो काढला असता तर आमची मुखकमले किती प्रेक्षणीय झाली होती हे कळालं असतं. प्रत्युष सोबत नव्हता आणि मी आणि कल्याणी गोरयामोरया चेहरयाने अंजली teacher समोर उभे होतो. It was a funny situation, now I think. निकाल इयत्ता नर्सरीचा! अंजली टीचरचं वय फार फार तर २५-२६ असेल आणि तरीही आम्ही टेन्शन मधे होतो:). प्रत्युषचं शाळेतलं कर्तॄत्व तसं कोण्या अथर्व फाटकला बुकलणे, "शेपटीवाल्या प्राण्यांची सभा" या "सुपरहीट" गाण्यात मासा होणे, रोज शाळेत फक्त नाश्त्यासाठीच जातो असा पक्का समज करुन घेणे इतपतच मर्यादित होतं. शिवाय "परिक्षेहून" आल्यावर त्यानं "मी टीचरला काहीही सांगीतलं नाही कारण त्यांनी मला थांबवून घेतलं असतं आणि माझी व्हॅन चुकली असती" असंही declare केलं होतं. इथे declare या शब्दाला वेगळा वास आहे- ही एकतर्फी सुचना आहे, त्यावर परत वाद घालायचा नाही!! आणि चाणाक्ष लोकांना या वाक्यातील टिळकांसारखा तीव्र मराठी बाणाही जाणवला असेलच. एव्ह्डं सगळं होऊनही चिरंजीव "Excellent" शेरयाने "पास" झाले हा आम्हाला...