ये शहर बडा पुराना है..

तुझ्या गावातील रसद संपली तसे माझ्या पुरते तुझे गाव मिटून गेले. तसे ते आवडलेही फारसे नव्हतेच; वेळ जाण्यापुरता नुस्ताच झालेला खेळ. दोन विरुद्ध ध्रुवावर एकाचवेळी तोल पेलायला मला आवडते पण तुझ्या शहरात पसरायचे झाले तर मला असंख्य धुमारे फुटण्याची अनंत काळ वाट पाहावी लागली असती. आणि काय खात्री की मला तुझ्या शहराने रुजुही दिले असते? धीर दिल्यागत मधेच माया सांगून जाते ही "ये शहर बडा पुराना है..." पण उधार शब्दांच्या बोलीवर आयुष्य पणाला लावण्याचे दिवस फार थोडे असतात.

तुझ्या शहरात दिवस उजाडतो आणि एखाद्या कैद्यासारखा प्रकाशाचा किंचित तुकडा गजाआडून डोकावल्यासारखा करतो. जमावात बेभान होऊन मी ही झोकून देतो चालत्या डब्यात स्वःतला. स्वच्छ काही सुगंधी वास, काही चेहरयांवरून टपकणारा पवित्रपणा, रात्रीच्या अबोल प्रेमाचे अतृप्त काही स्पर्श आणि संध्याकाळी खिजवणारे थकेलेले घामट असंख्य स्पर्श..is it justified to overwrite my moods with that of the crowds' ?
शब्दांचे तरल वृक्ष
इथे सळसळत नाहीत
काळीज अडकले तरी
खेचत जायचे शरीराचे
माजोरी साज;
माझे तर सारे अंगांग विस्कटलेले..
कुत्सित हसत मी ही एक अवतरण आठवून पाहातो; Man is borne is alone, crowd is just a habit! कदाचित सारयांना सरासरी पातळीवर आणून crowd is just NOT a habit हे प्रुव्ह करण्याचे छंद असतील या शहराला; पण माझी शिकार इतक्या सहजी मी ही होऊ देणार नसतो. मायाच्या डोळ्याला डोळा भिडवून "ये शहर बडा पुराना है पण माझ्या identityचं काय?" असं विचारलं तर ती शिल्लक राहील? काहींना नाही आवडत प्रश्नांची उत्तर द्यायला. कधी कोणी विचारलं म्हणून "एक सो सोला चांद की रातें" असा हिशोब देऊन संपून गेलेली अजून एक माया आठवून मी स्वःतला आवरतं घेतो.

तुला आणि तुझ्या शहराला जसं वेगळं करता येत नाही तसं या शहराला आणि त्याला वेढणारया अपरंपार समुद्राला ही. तो निळा, सुंदर नाही पण त्याचं सौंदर्य त्याच्या जलतत्वात आहे. कदाचित त्याच्या बोलीवर मी उःशाप देईन तुझ्या शहराला
"शोषुन घे
गात्रातील सारे अर्थ,
रक्तातील सजीव खळाळ
आणि चिरंजीव हो
डोरियन ग्रे सारखा"

मी तुझं शहर सोडलय. किशोरीचा आर्त आर्जव "रहना नही देस बिराना है" नाही टाळता येत. नर्तकीच्या आवेशात माया एक गिरकी घेऊन शहराच्या सीमेवर असेल तेव्हा मीरेच्या काही ओळी मी अलगद तिच्या ओंजळीत सोडून देईन
"कहा करु कछु नही बस मेरो
बात नही उड जावनकी"

Comments

Megha said…
pahili comment mazi!!!
vachtanach vah!altimet post asa vatun gela...and what a coincedence....mi agadi kishorichi tich tu pathavaleli cd aikat aahe pan gana ghat ghat me...pan aavajachya tya background var he asa kahi vachayala farach effective vatala.parvach ijajat chi pan gani aathvat hoti mhanun aikat hote...ya veli tuzya blog madhale sagale sandarbha pan lakshat aale....very good work keep it up..aani jara laukar publish karat ja na..
कोहम said…
kya bat hai...wah wah wah wah....yeh shahar bada purana hai....ji han...ji hujur..
"उधार शब्दांच्या बोलीवर आयुष्य पणाला लावण्याचे दिवस फार थोडे असतात..."

"काळीज अडकले तरी
खेचत जायचे शरीराचे
माजोरी साज.."

"काहींना नाही आवडत प्रश्नांची उत्तर द्यायला"

काय बोलावं? तुझ्या हातून सुटून गेलाय हा तुकडा कुठच्याकुठे...
सलग तीनदा वाचलंय आणि तरी परत एकदा परतावं लागणारच आहे.
असं काही लिहायचं डोक्यात साचत असेल तर अर्थात प्रकाशित करायला वेळ लागणारच. तो तुला मोठ्या मनानं माफ!
Samved said…
मेघा(पहीली..), finally you got all reference right!! कल्याणी कायमच मी थोडक्यात लिहीतो म्हणून ओरडते आणि या सगळ्या प्रक्रियेत मी (आळसापायी!!) references kill करतो. मी एक सोयिस्कर (गैर)समज करुन घेतला आहे की all reference are known to all. दोन कारणं; अंगभुत आळस आणि leaving conclusions/parallel reference to readers. माझ्या दृष्टीनं दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे.

निलेश आणि मेघना: च्यामारी, तुम्ही माझी खेचताय असा मला दाट संशय आहे...अरे लेकांनो, आवडलं तर आवडलं म्हणा आणि नसेल तर तसं सांगा. हे काही झेपलं नाही बुवा आपल्याला.
aawadala ahe. bas? aishapath mi durbodh lihayala lagley ki kay ata tuzya kawyatm likhanachya 'prabhawa'khali? ;) Just kidding!
apratim zalay.
Anand Sarolkar said…
Mala tar kahich samajla nahi :(
Megha said…
tuza lalit gadya kavyatma patalivar gela aahe.aataparyantchya posts madhala sarvat sundar post!!
eti Aai
mad-z said…
नाय जमला या बारी मला ... हजमच नाय जाला. ३दा वाचला पण घश्याखाली नाय उतरला. मग शेवटी थुकून टाकला आन पुढल्याची वाट बगालोय.

sorry buddy ... total bouncer. कळालं मुबै बद्दल आहे म्हणून पण "का / कसा / कुणासाठी" चे संदर्भ नाही लागले. म्हणजे एकूण काय तर तुझ्या ब्लॉगच्या नावाशी सहमत असा ब्लॉग हा - "संदिग्ध अर्थाचे उखाणे"!!
Sumedha said…
संवेद, माझ्या बलॉग वरील प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुझा ब्लॉग बर्‍याच दिवसांपूर्वी बघितला होता. या निमित्ताने परत भेट देऊन बराचसा वाचला. What can I say, very intense! माझं वाचन काही "अफाट" नाही, त्यामुळे सगळे संदर्भ भावले नाहीत, पण शक्य तितके कळले :)
a Sane man said…
"पण उधार शब्दांच्या बोलीवर आयुष्य पणाला लावण्याचे दिवस फार थोडे असतात."...वाह!...
काही संदर्भ नाही समजले पण आवडलं....सुरेख झालयं!
Samved said…
:) Then i should be renamed as Phantom!!