वजा लसावि
आख्खं आभाळ पेटलेलं आणि त्यात निर्वात संध्याकाळ. झटकले तरी जात नाहीत मनातुन अशुभाचे अगम्य संकेत. कवी आहे म्हणून कल्पनेचं एक टोक सतत ताणलेलंच हवं का? तेही दुखेपर्यंत? फॅक्टरीत ब्लास्ट झाल्याची बातमी ऎकल्यापासुन मी मुळातुन हललो, एक क्षणभर तुम्हीच डोळ्यासमोर आलात. कुठे असाल? कसे असाल? ओहो, प्रश्नांना नकारार्थी केलं नाही तरी मनातुन वाईट शंका जातच नाहीत. ऎन संध्याकाळी हे असले भास? देवाचा धावा करावा तर त्याच्याशी तेव्हा उभं वैर. थोडा कमीपणा घेऊन तेव्हाच त्याला साकडं घातलं असतं तर? पुढचं चित्र बदलण्याची ताकद त्यात असती, तर कदाचित तेही करुन बघायला हवं होतं. मी कवी, जगातला सर्वात शक्तिमान माणूस, पण माझीच कल्पनाशक्ती आज माझा घात करतेय. मेंदुला स्वीचऑफ बटन नसतं का? आता मला राहावतच नाही. मॉर्गला फोन लावण्याची ताकद माझ्यात नसते. शेवटची धुकधुकी जागी ठेवून मी हॉस्पिटलला फोन लावतो. "Everyone is looking for you" माझा चेहरा चमत्कारीक झाला असणार, एका क्षणात अंगातली सारी हाडं वितळून गेली, कण्यासहीत. Man is so fragile? उत्तर शोधायला वेळच नाहीए मला.
तुमचा चेहरा झोपेत असल्यासारखा शांत. तुम्हाला हलवून पाहायची भिती वाटते मला. तुम्ही तरी विस्कटाल नाही तर मी तरी.
माईंच्या नजरेला नजर देण्याची ताकद नाही माझ्यात. She is mindless? काही तरी करुन त्यांना हलवा, माझ्या मनातलं किती जोरात ऎकु आलं मलाच? की दुसरंच कोणी बोललं हे? Mai must be mercury, the liquid metal. सोसण्या पलीकडंच दुःख मिळालं की माणसं जशी होतात, तश्याच माई.
सारं शब्दशः आटोपलं तसा मी माझ्यातुनच उठून गेलो. समंजसपणाचा आव आणणारी माणसं तुटली की त्यांना शिवणं मोठं कठीण असतं. सख्ख्या मैत्रिणीनं डोळ्यांना हातांवर घेऊन फुंकर मारली आणि शुरपणाचं सारं उसनं अवसान गळून पडलं. पुढचे कित्येक दिवस जीवाभावाचे सखे वीण तुटलेल्या माणसाची गोधडी शिवत होते. गोधडी! विसंगतीचं रंगीत बोचकं!!
काही शतकांसारखी पुढची एक-दोन वर्षं गेली. सारेच निवल्यागत झाले. अंगात १०२-१०३ ताप असताना मी तुमचं घर गाठलं. जेवण्यापुरताही हात उचलण्याची ताकद नाही म्हणताच माईंनी त्यांच्या हातांनी मला जेवु घातलं. तुमच्या नसण्याचे अर्थ मला जाणवु न देण्याइतपत दुःख माईंनी नक्कीच बघीतलं होतं.
इंजिनिअरींग संपलं तसं तसा मी तुमचा गाव सोडला. आमच्यातला लसावि संपला होता तरी माईंचा निरोप घेणं फार अवघड गेलं. स्वतः सोबत घरालाही त्यांनी तोपर्यंत उभं केलं होतं. तुम्हीही तिथून बघत असालंच.
"आयुष्य वजा एक माणुस, किती अवघड असते समिकरणाची उजवी बाजु." मी कवी नसतो तर कदाचित उमळून पडलो असतो? कदाचित दगडही झालो असतो. शक्यतांच काय? काहीही होऊ शकतं.

Comments
Who else, but you have the authority to comment on this article. you were the one who stood with me all the time...
बऱ्याचदा मनाला पीळ पढतो. पण यु नो, थांबता येत नाही.
जावू दे. We both know, how the situation was and we survived it pretty well. So let us take life positively.
visheshan nakot ugach....
just keep it up.
वजा वैयक्तिक संदर्भ, थेट भिडलं!
तु हजाम आहेस.
कारण आज मी लिहिण्याचा मूड मध्ये जनतेच्या ब्लॉग्जवर घवघवीत कमेंट्स लिहित चाललोय आणि मी खास म्हणुन तुझा ब्लॉग शेवटचा ठेवलेला.
पण आता हे वाचुन यावर कमेंट देणं हे माझ्या ’पहोंच के बाहर’ आहे याची मला (तुझ्याबाबतीत) परत खात्री पटली.
म्हणुन - हजाम आहेस!