Mind Snatcher

श्रीरंग नटराजन उर्फ श्री हा काही फार जगावेगळा माणुस नव्हे. पण त्याच्या आयुष्यात जे झालं ते कदाचित तुम्हाला चित्तथरारक वाटू शकतं. तर मी काय सांगत होतो? हं, श्री काही फार जगावेगळा माणुस नव्हे. हिमाचलच्या कुशीत कोणत्याश्या अडनिडं नाव असणारया गावात तो राहायचा, म्हणजे तेव्हा होता. कसलसं धरण बांधण्याच्या सरकारी प्रोजेक्टवर तो आलाय. आता सरकारी कारभार म्हटलं की जो काही नैसर्गिक उशिर होऊ शकतो, तो झाल्यामुळे गेली वर्ष-दोन वर्षं तो त्या गावात होता. मुळातच बोलका स्वभाव, मदत करण्याची वृत्ती आणि मोकळा वेळ या मुळे त्या छोट्याशा गावात त्याचं बस्तान बसायला फार वेळ लागला नाही. पुढे पुढे तर त्याचं एकवेळचं जेवण कुणाच्या न कुणाच्या घरीच व्हायला लागलं. सगळ्या मित्रांना घेऊन तो कधी कधी त्याच्या रेस्टहाउसवर जमायचा, शहरातल्या गंमतीजंमती, इंजीनिअरींगच्या दिवसातले किस्से असं बरच काही चालायचं. सगळ्यांनी मिळून या अड्ड्याला क्लब असं फॅन्सी नाव ही दिलं होतं. दिवस असे बरे चालले होते. घराची फार ओढ आणि आयुष्यात फार ध्येय नसल्यानं श्री ही खुष होता.

एखाद्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचा एखादा पुसटसा सिग्नल आधीच मिळतो म्हणतात. कुणाला तो कळतो, कुणाला नाही. श्रीरंगराव दुसरया कॅटॅगरीतले होते नाहीतर पुरंग नावाच्या इसमाला त्यानं थाराच दिला नसता. पुरंग कोण म्हणता? अहो त्याचं नाव असं का ते तरी आधी विचारा! तुम्ही बुवा पुरंगासारखेच घाईत असता.

पुरुषोत्तम रंगराव!! किरकोळ माणसाचं एव्हढं मोठ्ठं नाव म्हणजे जरा अतीच होतं. पण आई-बापाला पोर जन्मतं तेव्हा थोडचं हे कळतं? कर्मावरुन नावं ठेवणारया लोकांनी पुरुषोत्तम रंगरावाचं १८-१९व्या वर्षी परत बारसं करुन पुरंग नाव ठेवलं. माणूस प्रत्यक्षात सॉलिड फाटका होता, सर्वार्थाने. रॅम्पवर चालणारया तिलोत्तमांनी मान खाली घालावी असं त्याच वजन, वाटतं याला चिमटीत धरून उन्हात धरला, तर कवडसा आरपार जाईल. तर अश्या या पुरंगाची कोणत्यातरी अफाट मुहुर्तावर सांगकाम्या म्हणून श्रीच्या प्रकल्पावर नेमणुक झाली.

अनोळखी गावात, काम नसताना जे होतं तेच इथेही झालं. पुरंगानं महीन्या दोन महीन्यात साहेबावरुन श्रीरंग आणि श्रीरंगावरुन रंगा अशी मजल मारली. पुरंग पुरता श्रीच्या प्रभावाखाली होता. त्याच्यासारखं बोलणं चालणं, त्याचेच ज्योक मारणं, अधून मधून त्याची कामं परस्पर करणं इतपत त्यानं प्रगती केली. श्रीला असं वाटायला लागलं आपण आपल्या प्रतिकृती बरोबरच राहात आहोत; श्रीरंग-पुरंग!!

माणसं तणावाखाली नेहमीच चुका करतात. एक बिन-कामाचं, बिन-साहेबाचं युनिट शोधुन श्रीनं पुरंगाला तिथं टाकलं. आपण कितीही हसलो तरीही जुन्या, फालतु साहित्यीक मुल्य वगैरे असणारया पुस्तकातले काही सदविचार खरे असतात. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने की काही तरी होतं म्हणतात; श्रीच्या सहवासात राहून पुरंगाचं तसलच झालं होतं. पुरंगानं तसल्या दळभद्री युनिटमध्ये सुध्दा जान आणली होती. काम श्रीनं केलय की पुरंगानं हे न कळण्याइतपत पुरंग श्रीची नक्कल मारत होता. अर्थात नक्कल नक्कल असते आणि हवा भरुन बैलाशी कॉम्पीट करणारया बेडकासारखी गत पुरंगाची बरयाच वेळा व्हायची पण ज्याचं आयुष्यात कधीच भलं झालं नव्हतं त्या माणसासाठी असले पराभव फारच तुच्छ होते.

श्रीनं कितीही नाकारायचं ठरवलं तरी पुरंगाच्या दृष्टीनं रंगा म्हणजे देवच होता. जेथे जाशील तेथे मी तुझा सांगाती या न्यायानं पुरंग, श्रीच्या क्लबचा मेम्बर पण झाला. श्रीच्या क्लबमेम्बर्सची घरचीही कामं पुरंगच परस्परच उरकुन टाकायला लागला होता. आता त्या बदल्यातच म्हणून नाही पण पुरंगाला बरयाच वेळा मेम्बर्स घरी जेवायला बोलावायचे आणि दरवेळी श्री सोबत असायचाच असंही नाही.

पुरुषोत्तम रंगरावानी पुढाकार घेऊन क्लब मेम्बर्ससाठी सायकलिंग उपक्रम चालवायला सुरुवात केली होती. शिवाय प्रकल्पग्रस्तांसाठी म्हणून असणारया काही जागांवर त्यांनी गावातली काही मुलं लावली होती.

रंगा, पुरुषोत्तम रंगरावाच्या दृष्टीनं अजूनही देवच होता पण रंगानं अचानक सगळ्यातुन अंग का काढून घेतलं ते मात्र बिचारया पुरंगाला कळत नव्हतं.

आताशा क्लब वगैरे उपक्रम पुरंगच चालवत असल्यानं श्रीनं mountaineering ला सुरुवात केली होती. तासंतास उगाचच चालत राहाण्यात कुणालाच गम्य नसल्यानं श्री एकटाच सारया उचापत्या करत होता. मधल्या काळात कुठल्या तरी संस्थेत जाऊन तो mountaineering चा रितसर कोर्सपण करुन आला होता.

गावा जवळचा एक महाउंच सुळका आपण सर करणार असं श्रीनं जाहीर केलं तेव्हा कुणी फारसं लक्ष दिलं नाही. पुरंगानं मात्र डोळ्यात अत्यंत लीन भाव आणून रंगाला विचारलं," मी आलं तर चालेल का? हे काही तरी नवीन दिसतय. तुम्ही करताय तर मला ही जमु शकेल असं वाटतय"

लोकशाहीत कोणताही पर्वत चढायला कुणाची परवानगी लागत नाही.

सोडायला आलेल्या क्लबमेम्बरांना सोबत घेऊन पुरंग बेस पर्यंत आरामात आला. त्यांच्या समोर एक छोटसं निरोपाचं भाषण ठोकून पुरंगानं श्रीरंगाकडे चला असा इशारा केला आणि जोडी चालु लागली.

"पुरुषोत्तम रंगराव, आपण आता निम्मा डोंगर चढलो आहोत. उरलेला निम्मा डोंगर म्हणजे एक सुळा आहे. आपण काय करणार आहात?" श्रीनं उपहासानं विचारलेल्या प्रश्नाचा टोन लक्षात न येऊन पुरंगानं ताबडतोब उत्तर दिलं, " म्हणजे काय रंगा, तुला जमेल तर मी ही जमवेनच की" "बघ, विचार कर, वर जागा फार कमी आहे, ऑक्सिजन पण कमी आहे, येताना रॅपलिंग करत उतरावं लागेल" "रंगा, तू काळजीच करु नकोस. मला जमेल"

उत्साहाच्या बळावर एका पॉईंट पर्यंत मजल मारता येते.

निम्मा सुळका पार केल्यावर एका कपारीत बसून पुरंगानं खाली पाहिलं आणि त्याचे डोळेच फिरले. "श्री, हे भयंकर आहे. मला नाही जमणार या पुढचं. आपण परत फिरु"

दोरीला लटकलेल्या अवस्थेत सुद्धा श्रीला हसु आलं. "Mr. Purushottam Rangarao, मला तुमची दया येतेय. पुराणातली प्रतिसृष्टी निर्माण करणारया त्रिशंकुची गोष्ट तुला ठाऊक आहे? आज तू शब्दःश त्या अवस्थेत आहेस. तू, माझे मित्र, माझं काम, माझं अस्तित्व सारयांवर अतिक्रमण केलस. You are nothing but a damn mind snatcher. मला माझं स्वतःच असं काहीच उरलं नाहीए. आज, इथून पुढे, मी एकटा वर जाणार आहे. इतका वर जिथून फक्त माणुस खालीच पडू शकतो. माझी ईच्छा झाली तरी मी तुला मदत करु शकत नाही कारण तू जिथे थांबला आहेस, तिथे एकाच माणसासाठी जागा आहे. कोणी सांगावं तुझा तुलाही उतरण्याचा मार्ग सापडेल, किंवा तुला देव बनवुन तुझी कुणी काही काळाने इथेच पुजा करेल. कुणी सांगावं यातल काहीच न होता तू अजून काही काळ इथेच राहाशिल.."



Well, मित्रांनो गोष्ट इथेच संपली. पुढे काय झालं, श्री येताना पुरंगाला घेऊन उतरला की पुरंग आयुष्यभर तिथेच राहीला I leave it to your imagination!
गोष्ट पुर्ण काल्पनिक आहे असं मात्र मी म्हणणार नाही.

Comments

Megha said…
hmmm....
masta jamali aahe laghukatha.aadhi tar asa vatala ki rarangdhang varach kahi lihila aahes ki kay....
and the last line..i think i got the clue..
याला चिमटीत धरून उन्हात धरला, तर कवडसा आरपार जाईल.hihihi..typical samved chaap vakya..
Monsieur K said…
yeah, even i was reminded of raarang-dhaang - but that was because of the geographical reference maybe.

liked the story. of course, i dont know the personal references/experiences. but nevertheless, it serves as a nice warning to those who blindly imitate their idols.
मलापण! अर्थात ’रारंगढांग’ आठवलं. पण हे पोस्ट ’खूप’ नाही आवडलं. :(
शेवटच्या ओळीचा अपवाद..
mad-z said…
कथा छान जमलीय. पण बहुतेक तुझ्या सवयीचा भाग म्हण किंवा कामाचा त्राण म्हण .. आटोपतं घेतलयस असं वाटतं.

रारंगढांघ काय आहे मला नाही माहिती. पण आता वाचायची इच्छा होतेय. वाचीनच

बाय द वे, "याला चिमटीत धरून उन्हात धरला..." वरनं होस्टेलवरचा "... फ़रफ़टत नेईन" चा विनोद आठवला आणि परत एकदा हसायला झालं. काही विनोद किती फ़्रेश असतात नाही.
Anamika Joshi said…
chhan lihilayes. rarangadhaang mahitiye mala, masta pustak aahe. ketan mhanato tase malahi yatale personal references kaLaale nahit, kaLaale asate tar ajun maja ali asati. ;-)