सावित्री

-१-
...
मी म्हटलं,"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं"
...
-२१-
केवळ एका पत्रांतील दोन शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळ वेळां कांहीच सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले. कुठल्या पाखरांनी स्वरांची ओवणी केली.

दिवस तिला अपरुप असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला नाही सोसत शब्दांची बंदिषी.

ती म्हणाली होती, अशीच कधीं तरी येईन-आणि दिवस लोटले तरी आलीच नाही.

मग वाटेवरच्या बागेंत त्याला कोण भेटलं? कोण कुणाकडं निघालं होतं?

बरोबर चालतांना पावलं आडखळलीं नाहींत. डोळे कुठंच रेंगाळले नाहीत. वाट ओळखीची झाली आणि बाजूच्या झाडांनी सावल्यांची तोरणं बांधली. खालीं पडलेल्या जुन्या पानांना पहिली आठवणहि उरली नाहीं.

नदीच्या काठांवर ती बसली होती तेव्हां तिनं उगाच पाण्यांत खडा टाकून कुणाला भिवविलं नाहीं. एक सारस पक्षी दुरुन येऊन काठांशी गवतावर अलगद उतरला. त्याचं पाण्यांतलं प्रतिबिंब जरसुद्धा सरकलं नाहीं.

पहिली पावसाची सर अचानक आली तेव्हां ती भिजत चिंब तशीच उभी राहिली.

देवळाच्या आवारांत त्याच्याबरोबर फिरतांना तिनं सहज एक उत्सवांतील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वाद्यं तालावर घुमूं लागली.

ओढ्यावर बसून फुलं गाथतांना जीं थोडीं कोमेजलेलीं होतीं त्यांनाहि तिनं हारांत सांवरुन घेतलं.

हे सगळं कुठं झालं?

कुणाच्या तरी साठ सांभाळलेल्या प्रश्नांची ही पाच संगतवार उत्तरं.

**********************************************************************************************************

पुस्तक: सावित्री
लेखक: पु. शि. रेगे

कधी, ते आठवत नाही पण बहुदा इंजिनिअरींगच्या दिवसांमधे, आईने मला हे छोटंसं पुस्तक दिलं. आवडणारी खुप पुस्तकं आहेत, सावित्री अगदी टॉपवर आहे असं ही नाही पण या पुस्तकात एक मराठीत सहसा न आढळणारं अत्यंत रोमॅन्टीक वातावरण आहे.

Comments

Nandan said…
surekh utara. khas karun pahila vakya!
manapasoon abhar. khelat sahabhagi zalyabaddal aaNi 'savitree'chee niwad kelyaabaddal...
Tulip said…
अहाहा... सावित्री मलाही खूप आवडतं. दोन व्यक्तींमधला इतका तरल (पत्र)संवाद, विचारांमधली हळवी एकात्मता आणि तरीही सतत जाणवत रहाणारी त्या दोघांमधली ती अस्वस्थ करणारी अलिप्तताही. कदाचित मधल्या अंतराने किंवा स्वभावांमुळे आलेली.. अपरिहार्य अशी.
रेगेंनी त्यांच्या त्या विलक्षण शब्दकळेमुळे सावित्री वेगळ्याच उंचीवर नेऊन पोचवले आहे खरे. [आणि आता मला का हा para लिहायला सुचला नाही असं वाटतय :))]
Samved said…
I wish I could copy complete Savitri for our friends who haven't read it!
Megha said…
nice idea....u can do it...karan aata vachun pan barech divas zale.arthat visaranya sarakha pustak nahiye te..pan lahan vayat vachatana aani aata vachtana yenari anubhuti yat nischitach farak asto..shivay pustak chota pan aahe...tenva mala tyachi size baghun pan maja vatali hoti(pustak asa pan asu shakata??)
farach chhan paragraph aahe. nahi vachalela he pustak. shakya asel tar nakki post karr. arthat hi demand jara jastach zali. scan karun upload kelas tari chalel.