भयाचे असंबद्ध वर्तमान
मी गच्च बंद डोळ्यांनी भय हलके उसवुनी आले पाण्यात खोल दडलेले काही उदास वर आले मातीत मुळांचे सर्प शेवाळ छिन्न उरलेले जे फिरुन वळूनी आले ते भय माझ्यात उतरले ओंजळीत मिटले भाळ रेषांचे रंग सरकले क्षितिजाच्या मागे गेले जुने रक्त साकळले मारुन अमेचे घोडे दिवसाला परतुनी आणले पण दूर खोल दडलेले काही उदास वर आले