नात्यांचे आकार समजून आले

नात्यांचे आकार समजून आले
आणि सखीचे डोळे अजूनच धुसर झाले

खोल आत दडवलेले संदर्भ
झाडांसारखे निरर्थक खुपू लागले
तसे सखीने विचारले ललाटरेखांमधे दडलेले भाष्य

आभाळाचे डोळे लेण्याचा शाप मला आहे सखी
खोटे कसे बोलू

’प्रतिमाभास' सारी अंगे गोळा करुनही
शापवाणी सारखे मला ऎकु आले माझेच शब्द
आणि नंतर कितीतरी वेळ
सखीचे कोसळणे

Comments

’...शाप आहे मला सखी
खोटे कसे बोलू...’
हे सगळंच जर असं अपरिहार्य इत्यादी असतं, तर मग कशासाठी करतो आपण सगळी क्षुद्र धडपड? हे कसले शाप? सगळंच अनाकलनीय आहे सालं.
Anonymous said…
vaa! sahee..
Sneha said…
सगळच म्हणे ठरलेल असतं आपण फ़क्त मोहरे... त्रास होतो ना या गोष्टीचा?