पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली
शपथांचे नवे बहाणे
पाऊस कधीचा पडतो
उठवित निजली राने

या गावामध्ये असतील
चैतन्य भारले रावे
रक्ताला फुटणारे पण
गाणे कोणी गावे

पाऊस चिंब भिजलेला
गारांचा फसवा तिड धा
श्वासात तुझ्या भासांनी
विस्कटलेली राधा

तो मदमत्त मातीचा गंध
ते ओले गुणगुण पाते
हातातून क्षितीज हातांचे
पारयागत निसटुनी जाते

तू ये नां श्रावण बनूनी
झुलव्यांचा बहर कुणाला
हिरव्या गवतावर माझा
बघ श्वास मोडूनी गेला

Comments

Samved said…
खरं तर या पोस्टचं नाव डिस्क्लेमरची कविता असं असायला हवं

डि.१: गण, वृत्त , अलंकार शोधु नका. सारं मुक्त, मुक्त..

डि.२: कवितेची स्फुर्ती, माझा मित्र आशिषचं पोस्ट (माझ्या ब्लॉगच्या यादीत शेवटी). आशिष आणि राधिका मिळून तो ब्लॉग चालवतात (जसा की संसार...). च्यायला,कविता काय कश्यावरुनही सुचतेच (आत्र्यांच्या नाटका सारखं स्फुर्ती स्फुर्ती असं ओरडावं का? ऑफिसात बरं नाही दिसत)
a Sane man said…
एकदम "ग्रेस"फुल...छान!

"तू ये नां श्रावण बनूनी
झुलव्यांचा बहर कुणाला
हिरव्या गवतावर माझा
बघ श्वास मोडूनी गेला"....छानच!
माय गॉड, संवेद! अगदी डिट्टो ग्रेस! कुणाला माहित नसले तर सहज खपून जाईल.
पुन्हा तितकासा 'दुर्गमतेचा' शापही नाही हिच्या भाळी!
उच्च.
>पाऊस चिंब भिजलेला
>गारांचा फसवा तिड धा
>श्वासात तुझ्या भासांनी
> विस्कटलेली राधा

किती सुंदर लिहिशील? सुरेखच...
शेवटच कडवं देखील देखणं..
Megha said…
हातातून क्षितीज हातांचे
पारयागत निसटुनी जाते
ultimate!!!!
itaka grace ugalyavar kay vhayacha....Bhaylog ya manasane satavi aathavi pasun grace chi pustaka jamavayala chalu keli...to paryant baki sagale kavi vachun zalech hote.
Keep It Up.
कोहम said…
zakaas....parava comment lihayachi rahunach geli..
Anand Sarolkar said…
Mast :) ekdum awadli kavita!
Anonymous said…
तू ये नां श्रावण बनूनी
झुलव्यांचा बहर कुणाला
हिरव्या गवतावर माझा
बघ श्वास मोडूनी गेला

सहीच