गोदोसाठीची कविता: ऍज इज आणि टू बी

ऍज इज..

थंड काचा
भावनाविरहीत
आणि मध्येच उभ्या केलेल्या
पुठ्ठ्यांच्या चंचल भिंती,
हवी तेव्हा पाचर मारता येते
अन
हवी तेव्हा काढता ही येते
पण त्याचं काय?
अल्याड-पल्याड तीरावरची माणसं
गुमान पणे
यंत्रातुन बोलत राहातात
यंत्रवत
किंवा गुहेत त्यांच्या बापजाद्यांनी काढलेल्या चित्रांसारख्या
जुन्याच खुणा
नव्याने वापरु लागतात

तारखांनुसार
देयकांची कोष्टकं
फळ्यांवर डकवलेली
आणि आकड्यांचे जादुयी
अनेक आलेख
विस्कटुन फिस्कटुन
जमिनीच्या सात बोटं वर
तरीही नशिबाचेच लेख
मग दिवसांच्या बदल्यात
माणसांचे आदीम सौदे
अमुक दिवस = तमुक माणूसकाम
काम झालंच तमाम!
नवे मंत्र, नवेच परवचे
एफर्ट.. शेड्युल..
डब्लुबीएस..आणि मॅनमन्थ

...टू बी?

सुख-दुःख
अर्थ-निरर्थ
लिहीणं- न लिहीणं
असणं-नसणं
आणि असं फालतु, बाष्कळ बरंच काही
गोदोसाठी सारं अर्थाअर्थी समानार्थी
गोदोला रुढार्थानं सुखी म्हणता मग?
आपण तरी ही गोदो होणार नसतो
आपण फक्त गोदोची वाट पाहायची

उपद्व्याप आणि अट्टहास
याच्या अध्यातमध्यात
गोदोच्या शोधाचे सुवर्णमध्य
मॉल, नाटकं, सिनेमे
कथा आणि हो
कवितात देखिल

Comments

आता परत एकदा फक्त 'आभार!' मानून लोकांना बुचकळ्यात टाकू का?! असो.

हवी तेव्हा पाचर मारता येते, हवी तेव्हा काढता येते...
माणसांचे आदिम सौदे...
उपद्व्याव आणि अट्टहास यांच्या अध्यात मध्यात...

अफाट.
This comment has been removed by a blog administrator.
Snehal Nagori said…
Hi samvedg,

sorry to bother u,

but somebody is using my name to put a comment on blogs... so please take care while publishing it.

the above comment has not been given by me.. somebody has made my fake profile.
Samved said…
Hi Snehal,

Thanks for tip. I have deleted comment but keeping your comment there so that it becomes a reference point.

Samved
Sumedha said…
हायकू जमवणार होतास न?

तशी ही कविताही छानच असणार बहुतेक, पण फार झेपली नाही:(
Samved said…
सुमेधा, :) प्रयत्नात आहे. आधी कधी केलेला नाही हा प्रकार त्यामुळे वेळ लागतोय
Samved said…
गोदो कोण म्हणून पुसता आनंदपंत? गोदो म्हणजे कुणीच नाही आणि सर्वचजण. गोदो तो, ज्याची सर्वजण वाट पाहातात..
सॅम्युअल बेकेटचं नाटक आहे "Waiting for Godot" त्यातला हा संदर्भ. काही जण गोदो म्हणजे गॉड असा ही अर्थ काढतात. Abstract असल्याकारणाने कुठल्याच अर्थाला निरर्थक म्हणता येत नाही. रादर, हे नाटक माणसाच्या जीवनातल्या निरर्थकतेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन पोचवतं. आपल्याकडे नसिरनं बरेच प्रयोग केले आहेत या नाटकाचे
Anand Sarolkar said…
Samved,"Waiting for Godot" shi olakh karun dilyabaddal Dhanyawad :)
Anand Sarolkar said…
"Waiting for Godot"chi olakh karun dilya baddal thanx :)
Samved said…
आनंदपंत,Waiting for Godot ची सीडी मिळते, अतुल पेठ्यंनी केलय. चांगलं केलय. पण तुमच्या जबाबदारीवर बघा बरं का! मला कोसायच नाही :)
Sumedha said…
हाहा! अरे sorry काय! नाही जमत काही लोकांना शिंपीगिरी ;) त्यात काय इतकं मनाला लावून घ्यायचं! तशीही मी आशा सोडून दिलीच होती!