झेन आर्ट ऑफ सुसाईड- शुन्याखाली गोठणबिंदु
बर्फात कवीची पावलं उमटतात; केवळ म्हणून मर्त्य म्हणायचं तुला. हिवाळ्यात रंगांचे साजिरे उत्सव सुरु असताना श्वेतांबर तुझे अस्तित्व बर्फाच्छादीत टेकडीच्या पार्श्वभुमीवर कणाकणाने उदयाला येते. "त्वचेशी एकरुप असावेत असे शुभ्र कपडे घालतेस?" माझ्या कुतुहलाला अंत नसतो आणि तूही उत्तराला बांधील नसतेस. आत्म्याच्या विणीचा किंचित उसवलेला धागा असावा तसं आपलं सहचर्य- विमुक्त बांधलेलं. "Dare you see a Soul at the White Heat?" प्रश्नाची धार बोथट करायला उलट प्रश्नांची भक्कम तटबंदी काही क्षणात उभी करु शकतेस तू. कवीला अशक्य काहीच नसतं. "If White- a Red-must be!" रक्ताच्या काळसर लाल रंगाचं तुला कोण आकर्षण!
"फलाटाकडे धावत येणारी आगगाडी पाहीली की सारे बांध फोडून रुळांखाली झोकून द्यावं वाटतं."
मी विलक्षण भेदरलेला, तुझा हात गच्च धरुन हिवाळ्यात गोठलेल्या स्टेशनवर शुन्यवत नेहमीचा उभा.
"नजरेचं संमोहन भेदून उंच इमारतीच्या गच्चीतून तळाकडे सुर मारावा. आधी शुभ्र त्वचेवर उमटेल डाळींबी नक्षीचा टपोरा दाणा, मग शुभ्र कपड्यांवर आणि मग शुभ्र बर्फावर आख्खं लाल काळसर डाळींब..."
तुझं कवीपण बेभान पण तुला उंचीचं भयही तसलंच अफाट. तरीही मला आवडतं तुझं तंद्रीदार बोलणं, वाटतं कधीच संपु नये
"The blood is a sunset. I admire it.
I am up to my elbows in it, red and squeaking.
Still it seeps up, it is not exhausted.
So magical! A hot spring"
त्वचेला भेदून हाडं फोडणारा हिवाळा, यंदा जरा निर्घॄणच. पाण्यावरचा बर्फाचा पातळसा पापुद्रा बघता बघता बेटा सारखा नव्याने उगवुन आला. सवयीच्या पायवाटा शुभ्र चुऱ्यात निवून गेल्या. हिवाळ्यानं जिणं असह्य झालं तसं गाव उठवायचं ठरलं. हिवाळ्यातलं निर्वासितपण ध्रुवाजवळच्या या गावाला तसं नवं नव्हतंच. पण तुझं इथे रुजणं जरा अनपेक्षित...
"All the gods know is destinations.
I am a letter in this slot
I fly to a name, two eyes.
Will there be fire, will there be bread ?"
"माझ्या मरत्या आईनं मला इथं पाठवलं. हा तिचा गाव आणि हे घर अन त्याखालचं तळघरही तिचंच. पोटाच्या आणि नात्यांच्या भुकेपाई ती शहरात गेली. मृगजळाची असंख्य बांधकामं केली. भुकेतला फोलपणा लक्षात आला तेव्हा उशीर झालेला. मरताना हातात इथला पत्ता दिला आणि इथे हार्प शिकवणाऱ्या प्रोफेसरांचा संदर्भ. म्हणाली एकटपणा प्रतिभावंताचा मोक्ष असतो."
एकटेपणाचे संदर्भ हे असे- अनुवांशिक! तुला या गावात, शेजारीपाजारी क्वचितच कुणी ओळखतं. सतत पांढऱ्या कपड्यात वावरणारी आणि दिव्याच्या धुकट प्रकाशात टेबल-खुर्चीच्या काठावर बसणारी एकलकोंडी तरणी बाई अशी तुझी ओळख. यावर तू फक्त हसतेस; निर्व्याज म्हणणार नाही मी, कदाचित समजुतदार.
पण तुझ्याही हक्काच्या जागा आहेतच.
स्वतःइतकं एकनिष्ठ? "-कवितेशी" कवितेइतपत सहचर्य? "- हार्प शिकवणाऱ्या प्रोफेसरांशी" आणि मी? "- अशारीर, अशब्द सोलमेट!" कुठल्याही संदिग्धतेशिवाय तुझी कन्फेशन्स.
"आत्म्याच्या हाकांचे पडसाद लख्ख ऎकु येतात या गावी. त्यांना शब्दांची सुरकुतली त्वचा दिली की कविता बनते. उदासवाण्या हिवाळ्यात बर्फाला लगडुन अर्थांची भुरभुर होते. तो चिमटीत धरुन टिचला की कविता वाहाती होते. असण्या-दिसण्याच्या कल्पनेपलीकडे त्वचेखालच्या गुलाबीसर तंतुंची नाजुक नक्षी मला जास्त आवडते. जे असतं, जे दिसतं, ऎकु येतं, भोगता येतं त्यापेक्षा जे अज्ञात, संदिग्ध, आकारहीन असतं त्याची मला ओढ आहे. मी त्याच्या कविता करते. म्हणूनच मी मृत्युच्या कविता करते. "
It is a love of death that sickens everything...
वृद्ध वृक्ष जास्त डेरेदार असतात आणि त्यांच्या सावल्याही व्यापक शितल. अनुभवांचे ऋतु पानगळतीच्या गणतीपेक्षा कैक अधिक. झाडांवर वसतीला आलेली पाखरंही पिढीजात हक्क गाजवतात अश्या वृक्षांवर. पण उन्मळुन पडतात तेव्हा भुतकाळातली मुळं हादरवणारं वास्तव उघडकीला आणतील त्याचं काय? कुठलाही पत्ता मागे न ठेवता हार्प शिकवणारे प्रोफेसर विनापाश रात्रीतून गाव सोडून निघून गेले तेव्हा तू अशीच अंतर्बाह्य हललीस. " कुठल्याही संबोधनावर, कुठल्याही मायन्यावर न अडता, रोज तुम्हाला एक पत्र मी लिहीन प्रोफेसर." जिव्हार दुखऱ्या जखमा शब्दांच्या रंगीत उत्सवात झाकु पाहातेस तू.
हिवाळा अमानुष म्हणावा इतपत तीक्ष्ण झाला तसा तू तळघरात मुक्काम हलवलास, पण गाव सोडला नाहीस.
तळघरातल्या शेकोटीत लाकडं जाळत तू हिवाळा संपण्याची वाट पाहत होतीस. सोबतीला काही पत्र आणि काही कविता. ऎन युद्धात दगाफटका व्हावा तशी तळघरातली लाकडं एक दिवस संपली. बाहेर गाव संपलेला आणि तुझ्या पिचक्या मनगटात कविता लिहीण्याव्यतिरिक्त कसलीही ताकद नाही. कोळश्याच्या धुगधुगीत प्राण यावेत म्हणून तळघरातल्या जुन्या वस्तु शेकोटीत टाकण्याची तुझी कोण लगबग. तितक्यात कुणाची तरी जीर्ण पत्रं तुझ्या हाताला लागली. थिजत जाणाऱ्या डोळ्यांनी तू वाचायला बसतेस तुझ्या आईची पत्रं-तिच्या प्रियकराला लिहीलेली, हार्प वाजवायचा तो...
शब्दांमधे नजरबंदीची विलक्षण ताकद असते. एकेका अक्षरावर जीव गहाण पडत जातो पण तुझी पापणीही लवत नाही. तळघर विझु झालेल्या कोळश्याच्या धुरानं भरत चाललय पण तुला त्याचं भान नाही. बर्फाची चिरेबंद तटबंदी हवेतुन पसरत तुला जिवंतपणीच चिणु पाहातेय. हवा कशी गच्च जड आणि मृत्युगार.
तुझे डोळे आता लवत नाहीत. शब्दांचे अनर्थ शरीरातुन उमटलेल्या शेवटच्या उबेशी रेझोनन्समधे. तुझ्या लाकडी खुर्चीशेजारी अस्पर्श तुझ्या कविता आणि न पाठवलेली काही पत्रं....
The way she laid his letters, till they grew warm
And seemed to give her warmth, like a live skin.
But it is she who is paper now, warmed by no one.
मी, श्रीशिल्लक, तुझा सोलमेट -. the ghost of an infamous suicide!!

Comments
"Dare you see a Soul at the White Heat?" आणि "If White- a Red-must be!" अवतरणे एमिलीची
उर्वरित सारी सिल्व्हीयाची
मला श्रीशिल्लक हा श्ब्द खूप आवडलाय. :)
एमिली डिकीन्सन्सची मला माहीत असलेली एकच कविता-"माय रिव्हर रन्स टू दी". कुठल्याही टॉम, डिक, हॅरीला माहित असलेली. सिल्व्हीया प्लाथ- वाचावं लागेल.
अवांतर-
कविता वाचताना अपोझिट सेक्सवाल्यांच्या कविता जास्त अपीलिंग वाटतात, असं मलाच वाटतं की हे युनिव्हर्सल आहे?
एमिली डिकीन्सन आठराव्या शतकातून आजपावेतो शिल्लक राहीलेली आणि वाढतच गेलेली कवी. कमालीची प्रसिद्धीपराड्मुख (बरोबर टाईपलं का शंकाए). तिच्या हयातीत तिच्या अत्यंत मोजक्या कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. तिच्या सततच्या पांढऱ्या कपड्यांमुळे तिला woman in white म्हणून ओळखायचे
सिल्वीया प्लाथ ही अमेरिकेतली महत्वाची कवी. हीच्या बऱ्याच कविता आणि कादंबरी आत्महत्या/मृत्यु बद्दल आहेत. एक दोन अयशस्वी प्रयत्नानंतर मात्र तिसाव्यावर्षी तिला आत्महत्या जमून गेली!