शब्द संपले तसा संवाद सुरु झाला

शब्द संपले तसा संवाद सुरु झाला

जळणाऱ्या कोंभाच्या आचेने
निबरत्वाचे बंध तुटले
तंबोऱ्याच्या तारांवर ताणून बसवलेला
तीव्र मध्यम
रेझोनेट झाला
पोक्त पिवळ्या नारंगी रंगांच्या
पॅलेटमधल्या मिश्रणाशी

मला गायचे नसते
माझे गाणे झाले
मौनाचे तल्खली ऍबस्ट्रॅक्ट झाले
गोठलेल्या देवराईत अशब्दांचे कल्लोळ झाले

Comments

सॉरी, नाही कळली.
पण (तुझी चिडचिड होईल, हे मान्य आहे मला!) समजावून सांगायची तयारी असली, तर मला प्रयत्न करायला आवडेल.
>> मला गायचे नसते
माझे गाणं झाले

hee 'key' asaavee ase vaaTate aahe.
Each person is a unique philosophy. tee maajhee jee kaahee asel (whatever I am / I am about) tee maajhyaatoon (kRuteetoon) sahajapaNe aaNi anaavarapaNe phuToon yaavee. tee shabdaant 'baandhat' basaNe haa .. vyabhichaar aahe (?).
(haa malaa saapaDalelaa - aaNi aavaDalelaa - artha.) :)

(shabdaanshee ashee love-hate relationship sagaLyaach 'paanDhaRyaavar kaaLe' karoo paahaNaaRyaanchee kaa asate? ithe saMved laa hee (roopak mhaNoonahee) soor chaalale, raMg chaalale. tee maadhyame holier / jaast sachchee aahet..? :)
Samved said…
On behalf of Meghana Bhuskute

@संवेद

बाकी सगळं जागच्या जागी बसलं. (मला माहितीय, याने तुझी मेजर चिडचिड होतेय. पण समजत नाही, असं म्हणून मला हे सोडून द्यायचं नव्हतं.)

पण कोंभ 'जळणारा' का?

@स्वाती

आभार! मला खरंच मदत झाली.

माध्यमांबद्दलः शब्द तसे कुणीही गण्या-गणप्या वापरतोच. आणि कवीनं वापरले, तरीही त्याला अर्थाची कुंपणं असतातच. माध्यम म्हणून शब्द वापरताना, ती कुंपणं ओलांडून जावं लागतं. पण सूर आणि रंग? ती बीजगणितासारखी शुद्ध - आणि म्हणूनच अधिक 'पवित्र' - नव्हेत का?
Samved said…
व्यक्त होण्याची आत्यंतीक तळमळ, आत्मशॊध आणि मुक्तीचा आनंद....असं काहीसं!
Samved said…
मेघना, सेन, स्वाती: Thanks :)
स्वाती, थोडा मुड आला की तुझ्या प्रतिक्रीयेला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन