Posts

Showing posts from 2014

#सेन्स: गंध

माणसाचं शरीर हा इंजिनिअरींगचा अजब नमुना आहे. इतकं गुंतागुंतीचं, ईंटीग्रेटेड आणि कमालीचं सिंक्रोनायजेशन असणारं यंत्र अजून तरी माणसाला (बहुदा) बनवता आलेलं नाही. ज..रा हे यंत्र ऍस्थेटिकली मजेदार आहे. आपण स्वतःच जन्माला माणूस म्हणून आल्याने आणि आजुबाजुला माणसांचीच गर्दी पाहून, सवयीने कदाचित ही ऍस्थेटीक गंमत आपल्याला कळतच नाही. म्हणजे बघा नां, माणसाचे हात कसे खुंटाळ्याला टांगलेल्या बेंगरुळ नेहरुशर्ट सारखे लटकत असतात किंवा अचानक मुळं फुटावित तसे कंबरेपासून उगवलेले पाय किंवा चेहऱ्यावर बाहेरुन डकवलेलं नाक नावाचा ३D अवयव! बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग? दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही! वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ...

॥देहाचा अभंग॥

देह पांघरावा आंथरावा देह देहात मिटावे उगवावा देह देह सजवावा मोगरावा देह देह दिठी दिठी स्पर्शपार देह देह निरखावा मुळमाया देह देह अट्टहास भ्रमभास देह देह रुजवावा ऋतुभार देह देह कळीकोंभ मुळारंभ देह

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे . आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते . एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच , तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास . श्रीयुत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, तुम्ही मायन्या पल्याडची माणसं (आणि तशीही तुम्हाला कोऱ्या पत्राचीही सवय आहेच म्हणा) पण अक्षरामागे अक्षर ठेवावे आणि अर्थांची भाषांतरे व्हावीत असा सजीव सोहळा सहज होणे नाही . It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे , तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी ... निर्दोष लावावेत आणि नक्षत्र ओल कंठामध्येच मुरुन जावी तसे. आणि इथे मी , प्रत्येक शब्दापोटी माझ्याच मुळाक्षरांची गुणसुत्रे तपासून घेत आहे . तंद्रीला तीन मिती असतात ; अनुभवांचे टोक निर्ममपणे पारखण्याची , आत्ममग्न लयीची आणि प्रस्तरांच्या पल्याड परकाया प्रवेशाची. अनुभवांचे आरसे वाकवावेत तसंतसे नार्सिस्ट होत जातात. मी... मला... माझे....च्या गारगोट्या अस्पष्ट ठिणग्या उडवत राहातात. उद्धार करण्यासाठी कुणी गोरखनाथ ’चल मच्छींदर गोर...

अनुवाद ३: He Wishes for the Cloths of Heaven

विल्यम यीट्सची ही १८९९ मधली प्रसिद्ध कविता. ही कविता सिनेमा, टीव्ही मालिका आणि इतरही पुस्तकांमधून वापरली गेली आहे असं विकी सांगतं. या कवितेचा अनुवाद करता करता मला एक सयामी कविता सुचली, यीट्सच्या कवितेची जुळी बहीणंच जणु. तिला नाही म्हणणं अशक्यच होतं म्हणून अनुवादाचा दुसरा भाग म्हणजे ती सयामी कविता. कृष्णाच्या नजरेतून यीट्सची कविता कशी दिसेल असं काहीसं त्या सयामी कवितेचं स्वरुप आहे.   Had I the heavens ’ embroidered cloths, Enwrought with golden and silver light, The blue and the dim and the dark cloths Of night and light and the half-light, I would spread the cloths under your feet: But I, being poor, have only my dreams; I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams - William Butler Yeats तेरे लिए सपनों की चादर बुनुं प्रिय, दैवदत्त एखादा शेला असता, सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला, गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा, अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला तर तुझ्यासाठी त्याच्या ...

अनुवाद २: Poor Old Lady

ही कविता(!) टाईम्सच्या यादीत का आली याचं मला कुतुहल आहे. खरं म्हणजे याला फार तर बडबडगीत म्हणता येईल! बहुदा हे version रोज बोनचं आहे. मला हे वाचून सगळ्यात आधी 'साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला' हे कुठल्याही सहलीतलं must sing गाणं आठवलं. Poor old lady, she swallowed a fly. I don ’ t know why she swallowed a fly. Poor old lady, I think she ’ ll die. Poor old lady, she swallowed a spider. It squirmed and wriggled and turned inside her. She swallowed the spider to catch the fly. I don ’ t know why she swallowed a fly. Poor old lady, I think she ’ ll die. Poor old lady, she swallowed a bird. How absurd! She swallowed a bird. She swallowed the bird to catch the spider, She swallowed the spider to catch the fly, I don ’ t know why she swallowed a fly. Poor old lady, I think she ’ ll die. Poor old lady, she swallowed a cat. Think of that! She swallowed a cat. She swallowed the cat to catch the bird. She swallowed the bird to cat...

अनुवाद १: Hope is the Thing with Feathers

Hope is the thing with feathers That perches in the soul, And sings the tune without the words, And never stops at all.   And sweetest in the gale is heard; And sore must be the storm That could abash the little bird That kept so many warm.   I ’ ve heard it in the chilliest land And on the strangest sea; Yet, never, in extremity, It asked a crumb of me. - Emily Dickinson "आशेला पंख असतात"   आशा म्हणजे छोटा पक्षी आत्म्यावरची साक्षर नक्षी गाण्यामधल्या तरल स्वरांवर अखंड झुलणारी गुलबक्षी   समुद्रवारे फणफणणारे उन्मादाचे वादळ रे चिरडून जाईल सहजपणे हे छोटे पाखरु गाणारे   पक्षी पण बर्फात उगवले सागरमाथ्यावरुन उडाले पंखांवर स्वप्नांना पेरुन निर्मोही ते भिरभिरले