अनुवाद १: Hope is the Thing with Feathers
Hope is the thing with feathers
That perches in the soul,
And sings the tune without the words,
And never stops at all.
And sweetest in the gale is heard;
And sore must be the storm
That could abash the little bird
That kept so many warm.
I’ve heard it in the chilliest land
And on the strangest sea;
Yet, never, in extremity,
It asked a crumb of me.
- Emily Dickinson
"आशेला पंख असतात"
आशा म्हणजे छोटा पक्षी
आत्म्यावरची साक्षर नक्षी
गाण्यामधल्या तरल स्वरांवर
अखंड झुलणारी गुलबक्षी
समुद्रवारे फणफणणारे
उन्मादाचे वादळ रे
चिरडून जाईल सहजपणे हे
छोटे पाखरु गाणारे
पक्षी पण बर्फात उगवले
सागरमाथ्यावरुन उडाले
पंखांवर स्वप्नांना पेरुन
निर्मोही ते भिरभिरले
Comments
भाषांतर शब्दास शब्द देत नाही, हे मान्य. पण ते मान्य करूनही पहिल्या कडव्यात भारीपैकी नाद आणि चित्र असं दोन्ही आहे. त्यामुळे ते आवडलं. पण दुसर्यात नाद नाही, आणि भाषांतरही तितकं जमलेलं नाही. 'That kept so many warm.'चा पडसाद भाषांतर कुठेच दिसत नाही, नि तो तर यायला हवाच हवा होता. पुन्हा तिसर्यात 'Yet, never, in extremity, It asked a crumb of me.'साठी तू 'निर्मोही' वापरला असावास. पण 'काहीच न मागणं' आणि निर्मोही असणं यांत एक मुळातूनच फरक आहे. शिवाय पहिल्या दोन कडव्यांत एकवचनात असणारा पक्षी (पाखरू) इथे उगाच अनेकवचनात गेला आहे, ज्यामुळे रसभंग होतोय.
चिरफाड केल्याबद्दल स्वारी. पण... स्वारीच.
अखंड झुलणारी गुलबक्षी" हे फारच सुंदर झालंय.