खुप आवाज आहे..
खुप आवाज आहे..
वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांचा.
उडणाऱ्या म्हशींचा थवा
छटाहीन हंबरतो आहे घश्याच्या शिरा ताणून.
व्हॉट्सपच्या ईमोजी
भाषेच्या खांबाला बांधलेल्या शब्दांभोवती
फेर धरुन नाचताहेत भीषण.
बोलण्याची असंख्य साधनं
जमा करुन
एकटा माणूस उभा आहे
बेदम भांबावून.
खुप आवाज आहे..
माझ्या डोक्यात..
खुप आवाज..
खुप..
Comments
उत्क्रांतीची सवय आहे आपल्याला. वेग.. that is another story. :)