Posts

Showing posts from August, 2026

The Pendulum Doesn't Arrive

कसलीच हालचाल नाही अजिबात नाही गळक्या झाडांचं पानही हलत नाहीये रस्ताच्या मध्यभाग बसलेली गायही सुस्त पेंगुळलेली नाही म्हणायला भर बाजारात अश्लीलपणे उभ्या असणाऱ्या  वॉचटॉवरचा लंबक तेव्हढा डावी- उजवीकडे झुलतो आहे पण तो त्याच जागेवर कुढतोय असंही म्हणता येऊ शकतं - अगदीच शक्य आहे आपण  बुटांकडे बघायचं आकाशाकडे बघितलेलंही चालतं आकाश- राखाडी / बुट घट्ट की बुट - राखाडी/ आकाश घट्ट? मरु दे, कुणाला फ़रक पडणार आहे? आपण इथेच उभं राहायचं - वाट बघायची शू आल्यासारखे वजन या पायावरुन त्या पायावर करायचं शबनम मधलं हस्तलिखीत काढून परत आत ठेवायचं सालं काहीच बदलत नाही शबनम शबनम राहाते पाय कंबरेखाली लटकलेले राहतात रस्तापण वाढ खुंटल्यासारखा जागीच रमतो  हे बेश्ट! आपल्यालाही कुठं जायचं माहीत नसतं या रस्त्यावरुन कुणी गेलं तर काय होईल? आपल्याला बकरीसारखं त्याच्या मागे मागे जाता येईल? गेला बाजार कुणी बॉम्ब फोडला तर? कुल्ले वर करुन पळावं वाटेल - बहुदा त्या निमित्तानं का होईना काही तरी हालचाल होईल  पण तसं वाटलंच नाही तर?   शंका आणि शक्यता फार वाढायच्या आत इथून निघायला हवं निदान कुणी चार प्रश्न विचा...