Posts

Showing posts from 2016

न-लिहीण्याची कविता

येऊ नका सांगूनही शब्द ऎकत नाहीत. अर्थान्वेषी छटांचे पलीते नाचवत शब्द पापण्यांवरुन घरंगळतात आणि लूचत राहातात डोळ्यांमधल्या काळ्या सूर्यांना उताविळ  माझ्या बोटांमधून झरझर झरतात उताविळ तुझ्या बाजारात संदर्भांची वस्त्रे फेडून ऊठवळ शब्द नागवे होतात अझदारी! बोथट चवीचे शब्द उन्मादात घेरतात छाती पिटत भोसकत राहातात उखाणातल्या तेविसाव्या श्रुतीला साजिरा मातम अझदारी... डोळ्यात मिटून घेतलेल्या काळ्या सूर्याचा साजिरा मातम अझदारी... दिवंगत दिगंबर अर्थाचा

टोगो आणि ज्येनुफी बॉईज

॥ १ ॥ एखाद्या वास्तुचा चेहरामोहरा हळु हळु त्यात राहाणाऱ्या माणसांसारखा होत जातो . नुक्तंच लग्न झालेल्या कुण्या नववधूची वास्तु अंगावर रंगांची उधळण मिरवत असते , तिचं नवथरपण , तिची अनाघ्रात वळणे कुठल्याशा चुकार क्षणी झट्कन दिसून येतात . एखादं रोपटं कुणाला न जुमानता सज्ज्याच्या तळातून उगवतं , ढासळत चाललेला एखादा अनवट चीरा जीवाच्या आकांतानी निर्जीव चुनखडीत बोटं रुतवु पाहातो , अश्या वास्तूत लांबलेल्या सावल्या पेलत जीर्ण वृद्ध तगून असतात . महालांचंही तसंच असतं . त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नसतात कोणत्याच संवेदना , डोळ्यांनी दिसत नसतात जीवघेणी भुयारं - त्यांच्यात राहाणाऱ्या राजवंशी अस्तित्वांसारखीच . त्यामुळेच सबाला तिच्या महालाची झालेली वाटणी हृद्यभंगासारखी वाटली . सबाचा , सबाराणीचा महाल एकाच देठाला लहडलेल्या दोन फळांसारखा होता . अबोर आणि चिलका ; आरश्यातल्या प्रतिमा असाव्यात तसे दोन भव्य प्रासाद ! त्यांचे मार्ग वेगळे होते खरे पण त्यांचं उगमस्थान एकच होतं - कमलबिंदु . कमलबिंदुशी येऊन सबाराणी ...

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ...   झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्त तेव्हा तिथे असतो; उदा. शाळा सुरु होण्यावेळी ’उन्हाळ्याच्या सुट्टीतला माझा छंद’ टाईप विषयावर निबंध, पाढे-वर्ग-वर्गमुळं यांच्या दुःखद उजळण्या वगैरे वगैरे. कु. सोमेश (नुक्तेच नववी ब) शाळा सुरु होण्या आधी अश्याच काही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यात मग्न होता. "सोमेश" अशी मधूर हाक दुसऱ्यांदा येऊनही त्यानं दुर्लक्ष केलं कारण शाळेच्या नव्या गणवेशाची निळ्या रंगाची चड्डी अंगावर कशी दिसते याचं निरिक्षण करण्यात तो गुंग होता. त्याला बऱ्याच चिंता पडल्या होत्या उदा. पायांवरची नव्याने उगवलेली लोकर निळ्या रंगाची चड्डी झाकणार नसते वगैरे. हल्ली सोमेशला अश्या चिंता आणि सोबतच हळव्या कविता वगैरे सुचतात- डार्क निळे आकाश सागर फेन्ट निळा निळ्या चड्डीत सोम्या नादखुळा (आपणही ’तुक्या म्हणे’ सारखं ’सोम्या म्हणे’ असा कवि व्हावं का? सोम्यानं लख्ख विचार केला) "सोम्या...." या हाकेत मघासारखी पुंडलिकाची आर्तता नव्हती, शिवाय आवाजा...

निळे हत्ती, निळे घोडे

निळे हत्ती, निळे घोडे, पोट फाडलेला ष, सारे झुलतात शक्यतांच्या अमानुष टोकां दरम्यान. ताणून बसवलेला सुर्य पीडीसीए सायकलच्या काठाकाठांनी आणि नदीत सोडलेले यांशी लोकांचे वीस पाय, मधेच करकचून घसरणारे बगळे पॉवर पॉईन्टच्या स्लाईडवरुन, आणि त्यांच्या पाठीवर टाकलेल्या गोळ्या गोळ्यांच्या बुलेट्स, सखीच्या पावसाळी किनाऱ्यांसाठी तयार केलेला भरगच्च कंटींजन्सी प्लॅन... ऎटदार टाय लावलेल्या देवदुतांनो, उपटा निर्वासित फुलपाखराचे पंख आणि मारा भरारी करारी राखाडी आकाशात. फुलवंतीला सुगंधाचे, निळावंतीला शब्दांचे, चित्रवतीला स्वरांचे अभिशाप मात्र जरुर द्या

फुल्या-फुल्यांचं साहित्य

Image
भूमिका : समजणं, आवडणं, मान्य करणं (किंवा या प्रत्येकाची विरुद्धार्थी कृती) आणि ती ठाशीव माध्यमात व्यक्त करता येणं या दोन भिन्न गोष्टी असू शकतात. फुल्या-फुल्यांचं साहित्य हा प्रकार माझ्यापुरता तरी असा आहे. वाचनाच्या ओघात बऱ्याच वेळा ओंगळवाणं ते कलात्मक (!) असे लैंगिक अनुभव व्यक्त करणारी पुस्तकं डोळ्यांखालून जात असतात आणि त्याबद्दलची विचारांच्या पातळीवरची प्रतिक्रिया ही निव्वळ खासगी स्वरूपाची असते. पण जेव्हा त्याबद्दल विचार करून लिहिण्याची वेळ येते, तेव्हा मला सततचा अवघडलेपणा जाणवत आहे. अशा अवघडलेपणाचा लेखाच्या गुणवत्तेवर आणि खोलीवर परिणाम होऊ शकतो का? तर हो, ती शक्यता मी या क्षणी नाकारत नाही. दुसरी मर्यादा, जी स्वीकृत आहे, ती म्हणजे हाताशी सगळे संदर्भ नसणं. या दोन्ही मर्यादा लक्ष्यात घेऊन लेखाची मांडणी मी किंचित वेगळी ठेवत आहे. विचारांचा ढग : वेगवेगळे मुद्दे आणि त्यांचा परस्परांशी असणारे संबंध मांडायला विचारांचा ढग मदत करतो. यातले सर्व मुद्दे लेखात येतीलच असं नाही. शिवाय त्यांच्या आपापसांत असणाऱ्या संबंधांमुळे हे मुद्दे स्वतंत्रपणे मांडले जातीलच असंही नाही.   टिपा : १....

पांढऱ्या पायांची काळी मांजर

लोक कधी ही येऊ शकतात. लेकवी (ढ लोकांसाठी: लेखक + कवी = लेकवी) रिकामा असला तरी त्याला आपण उपलब्ध नाहीत सांगायला आवडतं. त्यामुळं आता दार उघडून लेकवी नुक्तेच सुक्ष्मात गेले असं विक्षिप्त उत्तर द्यावं की काय या विचारात असताना दुसऱ्यांदा दारावर टकटक झाली. खरं तर ही अशी सुर्य वितळत असतानाची वेळ म्हणजे व्याकूळ होऊन हातांना शब्दांचं सहावं बोट फुटण्याची वेळ. पण नेमकी लेकवीची दर्दभऱ्या गजलांची सीडी गेले दोन दिवस खरखरत असल्यानं त्याला पुरेसं व्याकूळ होता येत नव्हतं. त्याच्या कुठल्यातरी टेकी फ्याननं सांगीतल्याप्रमाणं त्यानं ती सर्फ मधे बुडवून उन्हात वाळत टाकली होती पण त्या गायकाचा गळा म्हणावा तितका अजून साफ झाला नव्हता. थोडक्यात ऎन संध्याकाळचा लेकवी चक्क मोकळा होता आणि आता तीच ती टकटक परत... साशंक नजरेनं लेकवीनं दार किलंकिलं करुन बघितलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. लेकवी ऑलमोस्ट अश्रद्धेय असल्यानं त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण उगाच धोका नको म्हणून त्यानं ’श्रीराम’ म्हणत सुस्कारा टाकला. दार लावून तो वळला तर नेमकं पायात काही तरी गुबगुबीत अडखळलं. अल्टर ईगोनं यावं तसं अगदी सहजपणे एक मांजर आत आलं ...