Posts

अनु का बाई सु अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया

यत्ता सहावीतला चि. सव्यसाची बुक्कलवार वर्गभेदाचा बळी पडला म्हणणं म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही वैषयिक कविता आहे म्हणण्यासारखंच झालं. पण चि. सव्यसाचीच्या मते तरी तसंच झालं होतं. परंपरागतरित्या अ, ब, क आणि ड तुकड्यांना काही अर्थ होता आणि दुसऱ्या गावाहुन बदली होऊन आल्यानंच आपण ड तुकडीत ढकलले गेले आहोत हा त्याचा ठाम समज शाळा सुरु होई पर्यंत राहाणार होता. ऎन उन्हाळ्यात नव्या गावात यावं लागल्यानं शेजारच्या बंगल्यातली लिला देशपांडे सोडली तर त्याची कुणाशीही ओळख होऊ शकली नव्हती. "पाचवी-सहावीतली मुलं तुम्ही. कसलं मुलगा-मुलगी करता रे?" असं आईनं दहावेळा वैतागुन म्हटलं तरी लिला देशपांडे ही मुलगीच आहे या बद्दल चि. सव्यसाचीला तिळमात्र संशय नव्हता. ती फ्रॉक घालायची, तिच्याकडे चेंडु-बॅट ऎवजी बाहुल्या होता आणि ती मठ्ठासारखी पुस्तकं वाचायची तरीही तिच्याशी खेळण्यावाचून पर्याय नाही हे कळून चि. सव्यसाचीला अव्यक्त दुःख झालेलं. पण एक दिवस त्यानं पुढाकार घेऊन जमेल तेव्हढं मऊ आवाजात लिला देशपांडेला म्हटलं"ही बघ तुझी बाब्री. मी तिला डॅन्सच्या स्टेप्स शिकवत होतो तर हिचा हात बघ नां. काई तरी झालं......

वैती

आज वैती दरबारात उभी होती. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंधुकल्या सावरल्या तरी विखरुन जातील अश्या विसविसलेल्या. विशेष प्रसंग म्हणून मध्यरात्री भरवलेला दरबार आणि त्यातले खासेच मानकरी वृद्ध डोळ्यांनी वैतीवर चोरुन कटाक्ष टाकत होते. शरीराच्या गरजा भुक आणि हव्यास यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात, ज्ञानी अमात्यांच्या मनात नकळत चोरटा विचार आला. सरावाने कमावलेला कोडगेपणा क्षणभरासाठी कमी पडला, पण क्षणभरच. अमात्य दुसऱ्या क्षणी कर्तव्यकठोर प्रधानाच्या भुमिकेत शिरले. आणि आवाजातला करडेपणा न लपवता त्यांनी हलकेच हा दिली "वैती" राजा शौनकाने आपला चिंतातुर चेहरा वैतीकडे वळवला. वैतीला पाहाताना शौनकालाही अंगभर डोळे फुटले. पण आजचा प्रसंग वेगळा होता. "वैती, तुझ्या जंगलातून तुला शोधून आणून या अवेळ दरबारात उभे करण्यामागे काही कारणं आहेत. सुर्याचा किरणही पोचत नाही अश्या गुहांमधे राहातेस तू.जवळपासच्या वस्तीतले लोक घाबरतात तुला. तू म्हणे वशीकरण जाणतेस. पशु-पक्ष्यांना त्यांच्या भाषेत बोलतेस. वस्तीतली तरुण मुलं जंगलात चुकली की तुझी भुल पडते त्यांना. त्यांना कैद करतेस तू तुझ्या चित्रांमधून आणि असंबद्ध गाण्...

लोकशाही, गांडु बगीचा

नाव जरा भडक दिलं म्हणजे निदान चार डॊकी इथे हिटा मारतील हा साधा हिशेब. सालं व्यावसाईक लेखकं आणि पत्रकार हल्ली काही गंभीर लिहीत नाहीत तर आपण तर प्रयोगशील ब्लॉगवाले. आपली लाल/निळी/ जांभळी आपणच करायची. गंभीर म्हटलं की लोकांना हाताशी जेलुसीलची बॉटल लागते. बरं हल्ली आर्टी म्हणवुन घेण्याची पण फॅशन राहीली नाही वरच्या वर्तुळात, त्यामुळं तो तोंडदेखला ऑडिअन्सही बाद. सारं कसं हल्कंफुल्कं असावं, म्यॅच २०:२०ची शिवाय त्यात नाचणाऱ्या पोरींचा तडका, नाटकं निव्वळ भरत जाधवीय पद्धतीचं-अंगविक्षेपी विनोदी, सिनेमे अजागळ हसवणारे! आपला राष्ट्रीय प्राणी अस्वल केला तर? सारं कसं हसतं खेळतं... जन्मापासून लिंकनची ऎकलेली रेकॉर्ड- लोकांनी- लोकांसाठी- लोकांकडून चालवलेली पद्धत. मग परवाच प्लेटो की कुणाचं वाक्य वाचलं- लोकशाही ही गुंडपुंड आणि रिकामटेकड्या लोकांकडून चालवली जाईल. सॉलीड टाळी दिली. फुकट १ मार्काचा लिंकन वाचला इतकी वर्ष. मुळातच भारतीय मनोवृत्ती धकवुन न्यायची, सोईस्कर ते स्विकारायची, सहन करण्याची, कुणाच्या तरी टाचेखाली राहाण्याची, आंधळी आणि भित्री. त्यामुळे आज आपल्या लोकशाहीनं जी अगम्य दिशा आणि गती पकडली आहे, त...

अ- कील

जंगलातून सयामी असल्यागत आम्ही जुळेच धावत सुटलो ठेचकाळत जीवाच्या आकांताने कधी कधी हिरव्याकांत तृणाच्या धारदार पात्यांवरुन धावण्याला भितीचा आकार नव्हता पाठीवरच्या लंपट तीळासारखी निव्वळ निखळ जाणीव दिशांनी वाटा अडवल्या पण हातातून हात सुटले नाहीत प्रहरांनी चकवे लावले पण पाय क्षणभरही थबकले नाहीत भाळावर कोरलेली अक्षांश रेखांशाची प्रमेये कधीच तुझ्या वतनावर वाहीलेली म्हणून हक्काचे आलो तुझ्या मुक्कामी पण दिठीतले धुके जरा निवळते तोच दारावर मारेकऱ्यांच्या अबोध खंजीराची नाजूक नक्षीदार किणकिण "त्यांना" असते हेवा वाटावे असे दगडी काळीज "त्यांना" माहीत नसतो घटनेमागचा कार्यकारणभाव "ते" जोडतात आणि मोडतात काळाचे काही तुकडे "त्यांना" नेमून दिलेले चित्र पुर्ण करण्यासाठी "त्यांना" माहीतही नसतं आमचं जुळं अस्तित्व एका क्षणाचा इतिहास झाला काजळाचा एक आर्त थेंब टेकवलास गालावर- जुळ्यांमधे द्वैती पाचर जशी पुरत्या जन्माची नवी ओळख जशी एका जगण्यासाठी- एक मरण अस्तित्वाचा दंश जणु तुझी काजळमाया आवेगाने दार उघडलस आणि डार्लींग, तू कवितेला मारेकऱ्यांच्या हवाली केलस.

रेषेवरची अक्षरे 2010

यंदाचं रेषेवरची अक्षरेचं तिसरं वर्ष. तिसरं म्हणजे खासचं नाही? हॅट-ट्रीक, साडे माडे तीन इ इ. प्रस्तावनेतून उचलेली ही कविता आणि ही लिंक, बघा काही कुतुहल चाळवतय का...बरं वाईट जसं वाटलं तसं कळवा अंक कसा झालाय ते. आपल्याही बाब्याचं कौतूक कधी करावं म्हणून नाही, पण यंदाचा अंक मला खरंच आवडलाय... http://reshakshare.blogspot.com/ आम्ही लिहितोच आहोत पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात. इरेस पडलों जर बच्चमजी तर आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही. गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे. आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत आम्ही लिहितोच आहोत. पण नंतर असेच झाले अट्टल कलावंताचे होते तसेच झाले प्रश्नचिन्हांनी फेर धरले आमचेच शब्द गर्गरा फिरले. अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द? आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी? शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्...

ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुट

रिकाम्या वेळात पेन्सिलींना टोक काढणं म्हणजे लिहीण्याची जय्यत तयारी किंवा सफाई कामगाराला अखंड कामाची हमी. किंवा शुन्याचा कडेलोट बिंदु शोधून काढणं हा ही एक दैनंदीन कार्यक्रम असुच शकतो. असं सावरुन बसलं असताना ती दोघं आली तरी लेखक दचकणार नसतो. लेखक- तुम्ही काय करताय? तो- मी पाय मोडक्या स्टुलवर बसलोय आणि ती स्पंज उसवलेल्या खुर्चीत टेकलीए लेखक- मी उसवलेल्या पेन्सिलीची कुंची शुन्याला घालत आहे. ती- प्रश्न नसताना उत्तर देताय म्हणजे तुमच्या मनात नक्कीच कुठेतरी अपराधी भावना आहे. असो. निष्पर्ण वृक्षाखाली टोपी घातलेलं कुणीच नाही तरी आपण असे का बोलत आहोत? असे का? असे का? असे का? तो सर्वत्र आहे. तो सदैव आहे. तो सर्वाकार आहे. गोदाशेट, गोदुकल्या, लाडक्या गोदुका तू नाहीस तरी तू आहेस रे. तो- महोदय, मुद्याला भिडु. आपण आमची गोष्ट लिहावी असा आमचा प्रस्ताव आहे. लेखक- पण तुमच्या गोष्टीत विशेष काय? ती- काहीच नाही. पण तुम्हीही रिकामेच आहात. आणि तुमचं आडनाव पिरॅन्डेलो नसतानाही तुमच्या गोष्टीतली पात्रं तुम्हाला बोलताहेत हे विशेष नव्हे काय? काही तरी घडवण्याची संधी आल्यानं लेखक सावरुन बसतो. दरचवेळी सावरुन बसलं की क...

उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता

नव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु. यावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही. शिट्टी फुर्र्र्र्र ******************************************************** अमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टो...