Posts

Showing posts from 2011

भिन्न षड्ज

हल्ली अचानक चांगलं घडण्यावर फारसा विश्वास उरलेला नाही. चांगलं घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याउपरही काही बरं घडेल याची खात्री कमीच. पण तसं अचानक घडलं खरं. कोऱ्या मनानं क्रॉसवर्डमधे हिंडत असताना सवयीनं एक चक्कर सीड्यांमधून मारली. गेली कित्येक वर्षं एकही सीडी विकली न गेल्यासारखा तो सेक्शन. तेच ते अगम्य इंग्रजी आल्बम, जुनेच जसराज, भिमसेन, तडकामारु पण त्यातल्यात्यात खपावु रिमिक्स आल्बम वगैरे वगैरे. मला इथून हिंडताना शेवाळल्यासारखं वाटतं. तरीही आशाळभुतपणे मी काही वेगळं मिळेल म्हणून चौकस डोळे फिरवले. "भिन्न षड्ज". मी घाईघाईनं सीडी उचलली. एकच होती. कुणी हिसकावुन घेतली तर? नकळत सीडीवरची पकड घट्ट झाली. सीडीत काय आहे हे माहीत असतानाही परत एकदा कव्हर वाचून काढताना आजि म्या ब्रम्ह पाहीलेची अनुभुती आली. खरं म्हणजे मी स्वतःपुरत्या काही चौकटी आखलेल्या आहेत. ब्लॉगवर आवडती सार्वजनिक माणसं आणायची नाहीत हा त्यातला एक महत्वाचा नियम. ब्लॉगवर कविता पिटायच्या नाहीत हाही एक समजुतदार नियम. पण बऱ्याचदा हव्यासापोटी हे नियम मोडले गेले. आतली गाठ नियमांपेक्षा मोठी ठरली. भिन्न षड्ज तर नियमांपलीकडे ...

रेषेवरची अक्षरे - स्टार माझा

स्नेहलमुळे यावेळी रेषेवरची अक्षरे स्टार माझा वर चमकलाय! थॅन्क्स स्नेहल Thanks to Snehal, Reshewarchi Akshare is covered by Star Maza! http://www.youtube.com/user/starmajha#p/search/0/0k0pisLF3SU

लैंगिकता आणि मी-2

Image
Visit-http://reshakshare.blogspot.com/2011/10/blog-post_1661.html

लैंगिकता आणि मी-1

Image
To know more, visit- http://reshakshare.blogspot.com/2011/10/blog-post_4998.html

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी, सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही. इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे. दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत. अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत. तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो... ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद संपादक रेषेवरची अक्षरे २०११

चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...

काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही. मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु. निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची? गाणं- गुलजार संगीत- कनु राय आवाज- गीता दत्त मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां जां ना कहो...

थोडंसं झेन आर्ट मालिकेबद्दल

झेन म्हटलं की बुद्धीझम, ताओइझम इ आठवतं. झेन (>>...चॅन>>...ध्यान!) म्हणजे स्वतःत डोकावुन बघणं/ स्व चा शोध घेणं. झेन म्हणजे अवघडाला बाजुला काढून सोपं होणं. झेन आर्ट ऑफ सुसाईड मालिकेतल्या गोष्टी आत्महत्यांच्या नाहीत. To drift like clouds and flow like water हे झेन मधे महत्वाचं मानलं जातं. म्हणून कथेतल्या पात्रांच्या आयुष्यात जे लादलं गेलेलं होतं, जो गाभा नव्हता त्याच्या नष्ट होण्याविषयीच्या त्या कथा आहेत. असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य कलाकार स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांचं त्याच्या कलाकृतीवर रोपण करतो. थोडक्यात त्याच्या चश्म्यातुन आपण ती कलाकृती बघु पाहातो. या उलट पौर्वात्य कलाकार, खासकरुन झेन कलाकृती विशेष कोणताही आवेश न आणता, रंग, शब्द इ चे बंधन झुगारुन अत्यंत सोप्या भाषेत अभिप्रेत अर्थाच्या मुळाशी पोचतात (उदा. बाशोची ही कविता- Even that old horse । is something to see this । snow-covered morning ). माझ्यासाठी झेन आर्ट ऑफ सुसाईड ही मालिका हा एक प्रयोग होता. प्रत्येक कथेचं बीज आणि त्यांचे फॉर्म्स हे प्रयोगाच्या खाजेखातर वेगवेगळे नव्हते तर ती त्या कथावस्तुची गरज होती. बुडब...

झेन आर्ट ऑफ सुसाईड- शुन्याखाली गोठणबिंदु

बर्फात कवीची पावलं उमटतात; केवळ म्हणून मर्त्य म्हणायचं तुला. हिवाळ्यात रंगांचे साजिरे उत्सव सुरु असताना श्वेतांबर तुझे अस्तित्व बर्फाच्छादीत टेकडीच्या पार्श्वभुमीवर कणाकणाने उदयाला येते. "त्वचेशी एकरुप असावेत असे शुभ्र कपडे घालतेस?" माझ्या कुतुहलाला अंत नसतो आणि तूही उत्तराला बांधील नसतेस. आत्म्याच्या विणीचा किंचित उसवलेला धागा असावा तसं आपलं सहचर्य- विमुक्त बांधलेलं. "Dare you see a Soul at the White Heat?" प्रश्नाची धार बोथट करायला उलट प्रश्नांची भक्कम तटबंदी काही क्षणात उभी करु शकतेस तू. कवीला अशक्य काहीच नसतं. "If White- a Red-must be!" रक्ताच्या काळसर लाल रंगाचं तुला कोण आकर्षण! "फलाटाकडे धावत येणारी आगगाडी पाहीली की सारे बांध फोडून रुळांखाली झोकून द्यावं वाटतं." मी विलक्षण भेदरलेला, तुझा हात गच्च धरुन हिवाळ्यात गोठलेल्या स्टेशनवर शुन्यवत नेहमीचा उभा. "नजरेचं संमोहन भेदून उंच इमारतीच्या गच्चीतून तळाकडे सुर मारावा. आधी शुभ्र त्वचेवर उमटेल डाळींबी नक्षीचा टपोरा दाणा, मग शुभ्र कपड्यांवर आणि मग शुभ्र बर्फावर आख्खं लाल क...

झेन आर्ट ऑफ सुसाईड- प्रतिमांचे तारण

॥१।। "ब्रम्हदेवा, हैस का?" अशी दणदणीत हाक फक्त शिवराजच मारु शकतो. त्याला मी दार उघडुन आत घेतलं तेव्हा चार मजले चढून त्याचा भाता फुलला होता. खरं म्हणजे माझं नाव ब्रम्हे पण शिवराज मला कायमंच विविध नावानं हाका मारतो. आम्ही सगळी दोस्त मंडळी ठरवुन एमपीय्सी झालो. मी पोलीसात फौजदार, कुणी तलाठी, कुणी अजून काही आणि तसंच शिवराज राज्य वखार मंडळात चिकटला. "बोला चित्रगुप्त" मी त्याला डिवचुन बोलायचं म्हणून बोललो आणि अपेक्षेनुसार उसळुन निषेधाच्या स्वरात शिवराज म्हणाला "आम्ही वखारीतही कारकुन आणि देवांच्या राज्यातही कारकुनच म्हणा की एकुण! मरु दे. मला तुझा एक युनिफॉर्ममधला रुबाबदार फोटो दे" माझ्या बीटमधले शिपाई मला पिक्चरमधल्यासारखे साहेब म्हणतात मला माहीत होतं पण त्यांची लोणीबाजी शिवराजपर्यंत गेली असेल वाटलं नव्हतं. "अरे खेचत नाही बाबा. खरंच दे. तुला फेसबुक माहीतीए का? नसेलच माहीत, तुम्ही पैलवान लोक. ते असतं, त्यावर जुने मित्र शोधता येतात. नवे मित्र मिळवता येतात. त्यावर शिव नावासोबत तुझा फोटो टाकावा म्हणतो. आपला फोटो टाकला तर फेबु बंद पडायचं घाबरुन" राक्षसी हसत...

झेन आर्ट ऑफ सुसाईड- बुडबुड्यांचं खच्चीकरण

बोलणे- कंठातून अर्थपुर्ण आवाज काढून संवाद साधणे वाङमयीन ऊपयोग- खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलेल तो करेल काय, बोलाची कढी, कर्माला बोल लावणे इ इ अबोलण्याचे अनेक फायदे असूनही नेतेमंडळी बोलतात. अबोलण्याचे अनेक फायदे असूनही अभिनेतेमंडळी बोलतात. अबोलण्याचे अनेक फायदे असूनही शिक्षकमंडळी बोलतात. अबोलण्याचे अनेक फायदे असूनही प्राध्यापकमंडळी बोलतात. नेते-अभिनेते मंडळी बोलून करोडो रुपये कमावतात. शिक्षक-प्राध्यापक मंडळीही बोलून लाखभर रुपये जमवतात. अबोल विद्यार्थ्यांनाही वाटलं आपण बोलून फायदा करावा. फायदा-तोटा इयत्ता चौथीत शिकवतात. भांडवलशाही इयत्ता चौथीत शिकवतात. जमा - खर्च = फायदा अबोल - अ =बोल बोल(णे) =फायदा म्हणून अबोल = जमा इ. इ. विद्यार्थीदशेत अकलेची कमतरता असल्याने ही जमा पुंजी उधळण्यासाठी प्राध्यापकांच्या खोलीबाहेर रांग लावून तोंडी परिक्षेसाठी मुले उभी होती.बाळासाहेबही उभा होता. निर्लेपपणे त्यानं रांगेत मागेपुढे बघितलं. क्वचित एखादा-दुसरा चेहरा ओळखीचा वाटला तसं त्यानं कसंनुसं हसुहसु केलं. मुलं आपापल्या तांड्यात मुक्तपणे खिदळत होती. बाळासाहेबाकडे ब...

अनु का बाई सु अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया

यत्ता सहावीतला चि. सव्यसाची बुक्कलवार वर्गभेदाचा बळी पडला म्हणणं म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही वैषयिक कविता आहे म्हणण्यासारखंच झालं. पण चि. सव्यसाचीच्या मते तरी तसंच झालं होतं. परंपरागतरित्या अ, ब, क आणि ड तुकड्यांना काही अर्थ होता आणि दुसऱ्या गावाहुन बदली होऊन आल्यानंच आपण ड तुकडीत ढकलले गेले आहोत हा त्याचा ठाम समज शाळा सुरु होई पर्यंत राहाणार होता. ऎन उन्हाळ्यात नव्या गावात यावं लागल्यानं शेजारच्या बंगल्यातली लिला देशपांडे सोडली तर त्याची कुणाशीही ओळख होऊ शकली नव्हती. "पाचवी-सहावीतली मुलं तुम्ही. कसलं मुलगा-मुलगी करता रे?" असं आईनं दहावेळा वैतागुन म्हटलं तरी लिला देशपांडे ही मुलगीच आहे या बद्दल चि. सव्यसाचीला तिळमात्र संशय नव्हता. ती फ्रॉक घालायची, तिच्याकडे चेंडु-बॅट ऎवजी बाहुल्या होता आणि ती मठ्ठासारखी पुस्तकं वाचायची तरीही तिच्याशी खेळण्यावाचून पर्याय नाही हे कळून चि. सव्यसाचीला अव्यक्त दुःख झालेलं. पण एक दिवस त्यानं पुढाकार घेऊन जमेल तेव्हढं मऊ आवाजात लिला देशपांडेला म्हटलं"ही बघ तुझी बाब्री. मी तिला डॅन्सच्या स्टेप्स शिकवत होतो तर हिचा हात बघ नां. काई तरी झालं......

वैती

आज वैती दरबारात उभी होती. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंधुकल्या सावरल्या तरी विखरुन जातील अश्या विसविसलेल्या. विशेष प्रसंग म्हणून मध्यरात्री भरवलेला दरबार आणि त्यातले खासेच मानकरी वृद्ध डोळ्यांनी वैतीवर चोरुन कटाक्ष टाकत होते. शरीराच्या गरजा भुक आणि हव्यास यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात, ज्ञानी अमात्यांच्या मनात नकळत चोरटा विचार आला. सरावाने कमावलेला कोडगेपणा क्षणभरासाठी कमी पडला, पण क्षणभरच. अमात्य दुसऱ्या क्षणी कर्तव्यकठोर प्रधानाच्या भुमिकेत शिरले. आणि आवाजातला करडेपणा न लपवता त्यांनी हलकेच हा दिली "वैती" राजा शौनकाने आपला चिंतातुर चेहरा वैतीकडे वळवला. वैतीला पाहाताना शौनकालाही अंगभर डोळे फुटले. पण आजचा प्रसंग वेगळा होता. "वैती, तुझ्या जंगलातून तुला शोधून आणून या अवेळ दरबारात उभे करण्यामागे काही कारणं आहेत. सुर्याचा किरणही पोचत नाही अश्या गुहांमधे राहातेस तू.जवळपासच्या वस्तीतले लोक घाबरतात तुला. तू म्हणे वशीकरण जाणतेस. पशु-पक्ष्यांना त्यांच्या भाषेत बोलतेस. वस्तीतली तरुण मुलं जंगलात चुकली की तुझी भुल पडते त्यांना. त्यांना कैद करतेस तू तुझ्या चित्रांमधून आणि असंबद्ध गाण्...

लोकशाही, गांडु बगीचा

नाव जरा भडक दिलं म्हणजे निदान चार डॊकी इथे हिटा मारतील हा साधा हिशेब. सालं व्यावसाईक लेखकं आणि पत्रकार हल्ली काही गंभीर लिहीत नाहीत तर आपण तर प्रयोगशील ब्लॉगवाले. आपली लाल/निळी/ जांभळी आपणच करायची. गंभीर म्हटलं की लोकांना हाताशी जेलुसीलची बॉटल लागते. बरं हल्ली आर्टी म्हणवुन घेण्याची पण फॅशन राहीली नाही वरच्या वर्तुळात, त्यामुळं तो तोंडदेखला ऑडिअन्सही बाद. सारं कसं हल्कंफुल्कं असावं, म्यॅच २०:२०ची शिवाय त्यात नाचणाऱ्या पोरींचा तडका, नाटकं निव्वळ भरत जाधवीय पद्धतीचं-अंगविक्षेपी विनोदी, सिनेमे अजागळ हसवणारे! आपला राष्ट्रीय प्राणी अस्वल केला तर? सारं कसं हसतं खेळतं... जन्मापासून लिंकनची ऎकलेली रेकॉर्ड- लोकांनी- लोकांसाठी- लोकांकडून चालवलेली पद्धत. मग परवाच प्लेटो की कुणाचं वाक्य वाचलं- लोकशाही ही गुंडपुंड आणि रिकामटेकड्या लोकांकडून चालवली जाईल. सॉलीड टाळी दिली. फुकट १ मार्काचा लिंकन वाचला इतकी वर्ष. मुळातच भारतीय मनोवृत्ती धकवुन न्यायची, सोईस्कर ते स्विकारायची, सहन करण्याची, कुणाच्या तरी टाचेखाली राहाण्याची, आंधळी आणि भित्री. त्यामुळे आज आपल्या लोकशाहीनं जी अगम्य दिशा आणि गती पकडली आहे, त...