Posts

भंपि

भाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला. कुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर. अश्या विचित्र नजरेने काय बघता? आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला? Wait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का? अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल... हं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच! आता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार? म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का? (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर ...

बजाव!

दे धमाल! वाजवा रे अजून जोरात वाजवा. गणपती आलान नाचून गेला. जुनं झालं म्हणता? मग? तेरा तेरा तेरा जुनून? चालेल आपल्याला काय? त्यो हलकट इलाईट क्लास विजेचं बील भरतोय की आपल्यासाठी. ते बघं, ते सोंग, छाती धरुन बसलय, दुखतं म्हणतं छातीत आवाजानं खुर्च्या ऊबवतात साले. दोन-चार दिवस आवाजाची एव्हढी भिंत नाही सहन नाही करु शकत तुम्ही? वर्षानुवर्ष दबलेला आमचा आवाज आहे समजा हा. २-४ दिवस कार नाही काढता आली तर काय झालं? रोडटॅक्स भरला तर रस्ता विकत घेतला कारे भिकारया? मंडप रस्त्यावरच लागणार. पिएमसी गेली तेल लावत. च्यायला आणि तुम्ही कोण सांगणारे मुर्ति कशी बसवायची आणि कशी उठवायची. आम्ही देवाचं आमच्या पद्धतीनं करणार. तुमचं तुमच्या पाशी. तुम्ही वर्गणि देता म्हंजे आम्हाला उपदेश करण्याचा काम नाय.कुठून पैसा कसा काढायचा माहितिय आम्हाला. श्रद्धा-बिद्धा ठिकाय पण पोरांना नाचायला मिळालं पायजेल. तुम्ही कशाला थांबलात रे? वाजवा... इथून पुढे सगळ्या जयंत्या-मयंत्या आम्ही वाजत-गाजत करणार. जिथे जिथे आम्हाला पब्लिकच्या पैशांवर, पब्लिकच्या प्रॉपर्टीवर मजा मारता येईल तिथे तिथे आम्ही आवाजाच्या भिंती उभ्या करणार, देशी विदेशी ठु...

वजा लसावि

आख्खं आभाळ पेटलेलं आणि त्यात निर्वात संध्याकाळ. झटकले तरी जात नाहीत मनातुन अशुभाचे अगम्य संकेत. कवी आहे म्हणून कल्पनेचं एक टोक सतत ताणलेलंच हवं का? तेही दुखेपर्यंत? फॅक्टरीत ब्लास्ट झाल्याची बातमी ऎकल्यापासुन मी मुळातुन हललो, एक क्षणभर तुम्हीच डोळ्यासमोर आलात. कुठे असाल? कसे असाल? ओहो, प्रश्नांना नकारार्थी केलं नाही तरी मनातुन वाईट शंका जातच नाहीत. ऎन संध्याकाळी हे असले भास? देवाचा धावा करावा तर त्याच्याशी तेव्हा उभं वैर. थोडा कमीपणा घेऊन तेव्हाच त्याला साकडं घातलं असतं तर? पुढचं चित्र बदलण्याची ताकद त्यात असती, तर कदाचित तेही करुन बघायला हवं होतं. मी कवी, जगातला सर्वात शक्तिमान माणूस, पण माझीच कल्पनाशक्ती आज माझा घात करतेय. मेंदुला स्वीचऑफ बटन नसतं का? आता मला राहावतच नाही. मॉर्गला फोन लावण्याची ताकद माझ्यात नसते. शेवटची धुकधुकी जागी ठेवून मी हॉस्पिटलला फोन लावतो. "Everyone is looking for you" माझा चेहरा चमत्कारीक झाला असणार, एका क्षणात अंगातली सारी हाडं वितळून गेली, कण्यासहीत. Man is so fragile? उत्तर शोधायला वेळच नाहीए मला. तुमचा चेहरा झोपेत असल्यासारखा शांत. तुम्हाला हलवू...

Mind Snatcher

श्रीरंग नटराजन उर्फ श्री हा काही फार जगावेगळा माणुस नव्हे. पण त्याच्या आयुष्यात जे झालं ते कदाचित तुम्हाला चित्तथरारक वाटू शकतं. तर मी काय सांगत होतो? हं, श्री काही फार जगावेगळा माणुस नव्हे. हिमाचलच्या कुशीत कोणत्याश्या अडनिडं नाव असणारया गावात तो राहायचा, म्हणजे तेव्हा होता. कसलसं धरण बांधण्याच्या सरकारी प्रोजेक्टवर तो आलाय. आता सरकारी कारभार म्हटलं की जो काही नैसर्गिक उशिर होऊ शकतो, तो झाल्यामुळे गेली वर्ष-दोन वर्षं तो त्या गावात होता. मुळातच बोलका स्वभाव, मदत करण्याची वृत्ती आणि मोकळा वेळ या मुळे त्या छोट्याशा गावात त्याचं बस्तान बसायला फार वेळ लागला नाही. पुढे पुढे तर त्याचं एकवेळचं जेवण कुणाच्या न कुणाच्या घरीच व्हायला लागलं. सगळ्या मित्रांना घेऊन तो कधी कधी त्याच्या रेस्टहाउसवर जमायचा, शहरातल्या गंमतीजंमती, इंजीनिअरींगच्या दिवसातले किस्से असं बरच काही चालायचं. सगळ्यांनी मिळून या अड्ड्याला क्लब असं फॅन्सी नाव ही दिलं होतं. दिवस असे बरे चालले होते. घराची फार ओढ आणि आयुष्यात फार ध्येय नसल्यानं श्री ही खुष होता. एखाद्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचा एखादा पुसटसा सिग्नल आधीच मि...

पत्र- अमुक आणि तमुकच्या डायरीतील काही तुटक नोंदी

आठवतं, मी किती पत्र लिहायचे तुला? कधी कधी तर दिवसातून २-२ वेळा..आणि तू निर्घृण थंडपणे एकदा विचारलस, का? पत्र म्हणजे काय औषध आहे, ठराविक वेळीच लिहायला? कुठेतरी उघडं होण्याची गरज असते माणसाला. तुला नाही कळणार.. व्हिन्सीच्या पत्रांची वाट पाहाणारा तिओ तुला आवडायचा, तू एकदा म्हणाली होतीस. तुझ्या पत्रांची वाट पाहून मी आज उंबरठ्याचाच एक भाग झालो आहे. मीही तुला आवडू शकतो नां? आपण मोठे मजेदार असतो. कधी तरी तंद्रीत, भावनेच्या भरात, बहराच्या वयात, माणूस काही तरी लिहून जातो आणि काही वर्षांनी ते बघून आपल्यालाच हसू फुटतं, कधी तर लाजही वाटते. काही काळाने, कोणत्याही संदर्भांशिवाय, त्या पत्रांचा काय अर्थ लावशील तू, याची मला चिंता नाही. माझं लिहून झालं की माझ्या पुरतं एक आवर्तन संपतं. कोणत्या भिंगातून मला बघायचं, हे तेव्हा तू ठरव. तुला तेव्हा आकाशाइतके मोठे वाटणारे प्रश्न, आज किती फुटकळ वाटतात म्हणून मी हसत नाही. त्या प्रश्नांना सोडवण्याची उर फोडणारी माझी धडपड आठवून मला हसू येतय तू कधीच पत्रांना उत्तर दिलं नाहीस..सामोरं येत राहीलास तेच न उलगडणारया प्रश्नांसारखा. तुझ्या न लिहीण्याची इतकी सवय झाली आहे की ...

ये शहर बडा पुराना है..

तुझ्या गावातील रसद संपली तसे माझ्या पुरते तुझे गाव मिटून गेले. तसे ते आवडलेही फारसे नव्हतेच; वेळ जाण्यापुरता नुस्ताच झालेला खेळ. दोन विरुद्ध ध्रुवावर एकाचवेळी तोल पेलायला मला आवडते पण तुझ्या शहरात पसरायचे झाले तर मला असंख्य धुमारे फुटण्याची अनंत काळ वाट पाहावी लागली असती. आणि काय खात्री की मला तुझ्या शहराने रुजुही दिले असते? धीर दिल्यागत मधेच माया सांगून जाते ही "ये शहर बडा पुराना है..." पण उधार शब्दांच्या बोलीवर आयुष्य पणाला लावण्याचे दिवस फार थोडे असतात. तुझ्या शहरात दिवस उजाडतो आणि एखाद्या कैद्यासारखा प्रकाशाचा किंचित तुकडा गजाआडून डोकावल्यासारखा करतो. जमावात बेभान होऊन मी ही झोकून देतो चालत्या डब्यात स्वःतला. स्वच्छ काही सुगंधी वास, काही चेहरयांवरून टपकणारा पवित्रपणा, रात्रीच्या अबोल प्रेमाचे अतृप्त काही स्पर्श आणि संध्याकाळी खिजवणारे थकेलेले घामट असंख्य स्पर्श..is it justified to overwrite my moods with that of the crowds' ? शब्दांचे तरल वृक्ष इथे सळसळत नाहीत काळीज अडकले तरी खेचत जायचे शरीराचे माजोरी साज; माझे तर सारे अंगांग विस्कटलेले.. कुत्सित हसत मी ही एक अवतरण आठ...

"शांतता... कोर्ट चालु आहे" आणि "महानिर्वाण"

"हिंसा आणि वासना या माणसाच्या मुलभुत भावना आहेत!" "तें"च्या या विश्वप्रसिध्द वाक्याला कसल्याच सिद्धांताचा टेकु न देता मी पट्कन मान्य करुन टाकतो. शेपूट गळून गेलं तरी आपण आपल्यातलं जनावर जपतोच नां? जंगल काय झाडांचंच असतं? जनावरं राहातात त्याला जंगल म्हणतात मग ते भलेही इमारतींचं असो. आपल्या बहुतेक कुठल्याच साहित्यात/कलेत हा रासवटपणा का उतरत नाही? एक मिनीट; भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे. किरण नगरकर (रावण आणि एडी) आणि नातिचरामी (मेघना पेठे) आणि तत्सम लिखाण (गौरी, अर्थातच अपवाद..सानिया पेक्षा कितीतरी जोरकस आणि सकस) निदान मला तरी मुद्दाम "धाडसी" केल्यासारखं वाटतं. किरण नगरकर तर अगदी इंग्रजीतल्या चलाऊ लेखकांइतका टाकाऊ... वासना आणि हिंसा यांच्या व्याख्या हिंदी सिनेमात दाखवतात तश्या पावसात भिजणारया बाया (किंवा एकमेकांवर आपटणारी "कलात्मक" फुलं) आणि टोमॅटो केचपचे डाग या पुरत्याच मर्यादित आहेत? "ईडिपस" आणि " ऑथेल्लो"त वासना आणि हिंसा नाही? मराठीत असे मैलाचे दगड का नसावेत? पांढरपेश्यांनी लिहीलं म्हणून आणि झाकून ठेवण्याच्या तद्...