Posts

कन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी

कन्फेशन्स म्हणजे मनाचे तळ परक्याच्या निक्क्या बोटाने ढवळायचे आणि पापफुटीच्या भयाला किंचितभरही थारा न देता मोकळं व्हायचं अशी राजस परंपरा. गदगदलेल्या झाडांचे संभार तर अफाट पण निरर्थक रानफुलांना माळणार कोण हा कळीचा प्रश्न. लाकडी जाळीआडच्या पाद्रयाचं काळीजही वातड झालेलं असतं पाप-पुण्याचे रोजचे हिशोब ऎकून. कन्फेशन्स...आवडतात, म्हणून ती द्यावीतच असं नाही. मात्र फुलांच्या ताटव्याआड फुटून फुटून कन्फेशन्स देताना अल पचिनोचा मायकेल कोरलेओन पाहील्यानंतर तळाशी दाबून ठेवलेला दगड स्प्रिंग सारखा उफाळून आला. हिवाळा होता का तेव्हा? हिवाळाच असावा बहूदा. नुक्तंच प्रसिद्ध झालेलं तिसरं पुस्तकही सलगपणे गाजत होतं. आणि चौथ्याच्या तयारीसाठी माझ्या प्रशस्त बंगल्यात मी एकटाच राहात होतो. लिखाणासाठी ही जागा पर्फेक्ट होती. कॉलनी नवी होती त्यामुळे फारश्या ओळखी आणि पर्यायाने फारशी येणावळ नव्हती. माझा बंगला कॉलनीच्या शेवटाला होता त्यामुळे येणारया जाणारया गाड्यांचे, माणसांचे फारसे ताप नव्हते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटं तळं होतं. लिहायला बसलं की खिडकीतून ते तळं, त्यात पडलेलं चांदणं स्प...

कुळकथा

रुट्स नावाचं पुस्तक वाचून म्हणे अमेरिकेत आपलं कौटुंबिक मुळ शोधण्याचं फॅड आलं होतं. तसं आपल्याकडे कुलवृत्तांत, गोत्र वगैरे गोष्टी आहेत पण खानदान की खोज म्हणजे जरा अतीच झालं म्हणावं लागेल. मुळातच राजु मुर्डेश्वरकर, हणमाप्पा कवाडे किंवा बाळासाहेब शिंदे इतपत चिल्लर नावं असणारयांनी वंशवृद्धीला खानदान म्हणावं म्हणजे स्नेहा उलालला ऎश्वर्या राय म्हणल्यागतच झालं. विजयविक्रम चोप्रा, संपुर्णप्रताप सिंग असं भरगच्च नाव असणारयांनी खानदान शब्द वापरावा. त्यांच्याकडे म्हणजे कसं, पोरगी पळून गेली की खानदान की इज्जत वगैरे जाते. आपण लग्नाचा खर्च वाचला म्हणत हुश्श करणारे बिच्चारे लोक. तर बाय डीफॉल्ट मी बिच्च्यारा कॅटॅगिरीत असतानाच मी गंडलो. झालं असं की एका दिवाळीत आख्या कुटूंबानं एकत्र यावं असं कुठल्यातरी काकाच्या डोक्यात आलं आणि आम्ही सगळे नांदेडला गेलो. बरीचशी काकामंडळी य वर्षांनी भेटली. काही चुलत भावंडांचे चेहरे फिक्कट ओळखीचे वाटत होते पण मुद्दलात आनंद होता. एक बरया पैकी मोठा दिसणारा बाप्या शिंग मोडून आमच्यात खेळत होता, आमच्या बरोबर जेवत होता आणि नंतर आमच्याच घरी झोपलाही. दुसरयाच दिवशी खेळता खेळता भांडणं...

रस्ता

रस्ता, आदी अन अनंताच्या मधे घुटमळणारा नुस्ताच गुंता. त्याच्या एका बिंदुवर मी सावरुन उभा आहे जणू की तो असावाच एका शेवटाची सुरुवात फक्क पिवळे सोडीयमचे दिवे ओकताहेत पारंपारिक शिळाच प्रकाश, किंवा सरावाने तोडताहेत अंधाराचे हिंस्त्र लचके. आणि आपल्याला उगाचंच वाटत राहातं दिवे प्रकाश देतात रस्ता, पहील्या प्रियकराच्या आठवणींसारखा; संपतच नाही संदर्भ संपले तरीही. लख्खं काळा जणू काळजाला पिळा. त्याच्या काठाकाठावर, भ्रमिष्टांसारखी झुलत असतात गुल्मोहरी काही झाडं, अधूनमधून पडणारया चांदण्यांच्या सावल्यात. रस्ता, अनाघ्रात आणि अस्पर्श. रात्रीचा एखादाच चुकार वाटसरु अंगावर ओरखडे ओढत जातो; अन्यथा पुर्णपणे व्हर्जिन

आयवा मारु

"कोणे एकेकाळी" असं म्हणण्याइतपत जुनी गोष्टं नाही ही. सत्तरीच्या आसपास आयवा मारु नावाचं एक मालवाहु जहाज प्रवासाला निघालं. कोणत्याही जहाजाला असतो, तसं आयवा मारुला पण एक कॅप्टन होता, फर्स्ट मेट, सेकंड मेट, थर्ड मेट होता, चीफ ऑफिसर, सुकाण्या, कुकही होता. या सारया मुरलेल्या खलाश्यांना समुद्राची, त्याच्या वादळांची सवय होती. पण एक वादळ त्यांच्या सोबतच प्रवासाला निघालं होतं ते जरा निराळं होतं. आयवा मारुवर राहणारया या वादळाने आणखी वादळे निर्माण केली आणि आयवा मारुचा तळ ढवळुन निघाला. आयवा मारुवरच्या माणसांच्याच काय पण प्रत्यक्ष आयवा मारुच्याही इच्छा, वासना, आशा जागृत व्हाव्यात असं भीषण वादळ. एम. टी आयवा मारु ही त्याचीच गोष्ट. ******************************************************* अश्रूंच्या उंच सावल्या कलंडतात तिच्या बिलोरी डोळ्यांत आक्रोशत ओलांडतात अक्षांश आग लागलेले राजहंस आणि तिच्या गिरकीची शैली उगवते भूमितीत दिक्काल अचानक पडतो एक क्ष-किरणांचा झोत अंगावर आणि तिच्या शरीराचें शुभ्र यंत्र होते पारदर्शक पेटलेल्या कंबरेभोवती तिच्या विस्कटतात छाया किंचाळतात नीरवपणे स्तब्धतेत वाहणारया तिच्...

ऊन: ताजे संदर्भ

सुडाचं बेफाम संतप्त ऊन नव्हतं ते. उभे आडवे वार करुन संपून जातं असं ऊन सायंप्रहरी, आणि आईच्या पदराआड दमून, हमसुनहमसुन लपून जावं तसं ढगांआड मिटून जातं. हे ऊन जरा निराळं; द्रौपदीच्या कुळातलं. इथे दिवस-रात्र सुडाची चक्रं फिरतील, आत्मनाशाच्या बोलीवर, पराभव पलटवले जातील पण युद्ध संपणार नाही. दिवसाचे प्रहर अस्ताला गेले तरी आग शमत नसते आणि द्रौपदीच्या अस्पर्श केसांसारखे किरण, निळ्या गडद शाईला आटवत राहातात. आकाशात दुरवर काही ही दिसत नसतं. फक्त एखादाच चुकार पक्षी पंखातलं बळ तुटण्याआधी घट्ट मनानं उडत असतो. रस्त्यावर घम्मटगार, खारट, शांतता, त्याच्या एका टोकाला उगवलेलं बोन्साय क्षितीज, आणि डोळ्यांना उघड दिसणारी ऊन्हाची तरल लहर. मी मान फिरवत दमट डोळे मिटतो तर पापण्यांआड सुर्याचे किंचित वर्तमान. "स्वतःपुरते सुटकेचे पुल तयारच ठेवावेत आपण" कारच्या बंद डबक्यात एसीचा नॉब पिळत मी कितीदाही हे ब्रम्हवाक्य उच्चारलं तरी मला लाज वाटणार नसते. डोळ्यांवरच्या थंड काचांतुन सरावाचा बहावा दिसला नाही तसा मात्र मी चरकलो. पार त्याच्या झाडाखालीच जाऊन थांबलो तसा जुन्या ओळखीतुन घट्ट भेटला तो. "जुना परिचय?...

इंजिनिअरींगचे दिवस

आमचं FE, TEचं हॉस्टेल तसं नवं होतं आणि कॉलेजपासून थोडंस लांबदेखील. SE, BEचं हॉस्टेल मात्र कॉलेजच्या आवारातच होतं. कॉलेज तसं फार मोठं नव्हतं. मुख्य बिल्डींग, ड्रॉईंगहॉल्स आणि लॅब्ज सारं C आकारात. C संपतो तिथे वर्कशॉप्स. हा झाला कॉलेजचा मुख्य भाग. वर्कशॉपच्या मागे ऍनेक्स बिल्डींग. आणि मुख्य Cच्या एका बाजुला एक नवी बिल्डींग जोडलेली आणि दुसरया बाजुला लायब्ररी आणि त्यावर ऑडीटोरीयम. सगळं एकदम शिस्तीत म्हणजे कसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल मुख्य शाखा म्हणून त्या मुख्य बिल्डींग मधे म्हणजे C मधे. सिव्हील पण मुख्यच शाखा पण का कोण जाणे त्यांचे वर्ग सगळ्यात मागे ऍनेक्स बिल्डींग मधे भरायचे. कदाचित सिव्हीलची पोरं आणि बरयाच प्रमाणात पोरीही विविधगुणदर्शनात वाकबगार होते. उगाच कुणाला आल्या आल्या कॉलेजच्या कलागुणांचं प्रदर्शन नको म्हणून त्यांना वाळीत टाकलं असेल. कॉलेजची सारी फेसव्हॅल्यु मात्र त्या नव्या बिल्डींगमधे होती. ती बिल्डींग ईलेक्ट्रॉनिक्स आणि कंम्प्युटरच्या गुणी, शांत, सालस, सज्जन, अभ्यासु इ. इ. गुणांनी ठासून भरलेल्या शाम नावांच्या मुलांनी बहरलेली होती. त्यांच्या वर्गभगिनी सर्वसाधारण नाठाळ, खट्याळ,...

हॉस्टेलचे दिवस

जून-जुलैत औरंगाबादेत मुक्काम हलवला तेव्हा असंख्य प्रश्न होते. सर्वात गहन प्रश्न होता हॉस्टेल झेपेल काय आणि तिथे काय काय होईल. तरी एक बरं होतं की बाकीचं कॉलेज अजून सुरु न झाल्यानं हिंडाफिरायला बरीच मोकळीक मिळणार होती. दोन-तीन दिवसात बरोब्बर आमची गॅन्ग बनली. सगळ्यांत मिळून ३ खोल्या होत्या पण मुख्य अड्डा आमची खोली. दिवसभर हिंडणे एकत्र आणि झोपायला आपापल्या खोलीत अशी न ठरवता वाटणी झालेली. नित्याची खोली आमच्या समोर आणि त्याचे रुपा (म्हणजे रुमपार्टनर) अजून आलेलेच नव्हते त्यामुळे तो एकटाच झोपायचा. सॅन्डी आणि पद्म्या एका खोलीत राहायचे. एके दिवशी अचानक नित्यानं सांगुन टाकलं की तो या पुढे आमच्या खोलीत झोपणार. त्याच्या खोलीत म्हणे कुणी तरी आधीच्या बॅचमधे सुसाईड केली होती, खिडकीला गळफास लावुन. जमिनी पासुन खिडकीची उंची ४-५ फुट! कुणी आत्महत्या करायची ठरवलीच तर पाय दुमडुन वगैरेच कराय लागेल. पण हॉस्टेलची अवस्था भयाण. पॅसेज मधे ट्युब नसायच्या कारण कुठलं तरी आत्रंगी कारटं ती ट्युब त्याच्या खोलीत लावायला घेऊन जायचा. आता अश्या अवस्थेत रात्री उठून बाथरुम पर्यंत जायचं म्हटलं तरी रस्त्यात नित्याची रुम लागायची...