Posts

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली शपथांचे नवे बहाणे पाऊस कधीचा पडतो उठवित निजली राने या गावामध्ये असतील चैतन्य भारले रावे रक्ताला फुटणारे पण गाणे कोणी गावे पाऊस चिंब भिजलेला गारांचा फसवा तिड धा श्वासात तुझ्या भासांनी विस्कटलेली राधा तो मदमत्त मातीचा गंध ते ओले गुणगुण पाते हातातून क्षितीज हातांचे पारयागत निसटुनी जाते तू ये नां श्रावण बनूनी झुलव्यांचा बहर कुणाला हिरव्या गवतावर माझा बघ श्वास मोडूनी गेला

ओ सुनी ओ मीरा

सुनी मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक. सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण. पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही. चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाट...

मसाज

"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?" "दमायला होतं पण मज्जा येते बुवा" "म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?" "बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा" "म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट" "जी बुवा" "विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली." "बुवा , म्हन्जे स्वर्गात?" "म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात ना...

मोरल ऑफ द स्टोरी?

मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल ...

कन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी

कन्फेशन्स म्हणजे मनाचे तळ परक्याच्या निक्क्या बोटाने ढवळायचे आणि पापफुटीच्या भयाला किंचितभरही थारा न देता मोकळं व्हायचं अशी राजस परंपरा. गदगदलेल्या झाडांचे संभार तर अफाट पण निरर्थक रानफुलांना माळणार कोण हा कळीचा प्रश्न. लाकडी जाळीआडच्या पाद्रयाचं काळीजही वातड झालेलं असतं पाप-पुण्याचे रोजचे हिशोब ऎकून. कन्फेशन्स...आवडतात, म्हणून ती द्यावीतच असं नाही. मात्र फुलांच्या ताटव्याआड फुटून फुटून कन्फेशन्स देताना अल पचिनोचा मायकेल कोरलेओन पाहील्यानंतर तळाशी दाबून ठेवलेला दगड स्प्रिंग सारखा उफाळून आला. हिवाळा होता का तेव्हा? हिवाळाच असावा बहूदा. नुक्तंच प्रसिद्ध झालेलं तिसरं पुस्तकही सलगपणे गाजत होतं. आणि चौथ्याच्या तयारीसाठी माझ्या प्रशस्त बंगल्यात मी एकटाच राहात होतो. लिखाणासाठी ही जागा पर्फेक्ट होती. कॉलनी नवी होती त्यामुळे फारश्या ओळखी आणि पर्यायाने फारशी येणावळ नव्हती. माझा बंगला कॉलनीच्या शेवटाला होता त्यामुळे येणारया जाणारया गाड्यांचे, माणसांचे फारसे ताप नव्हते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटं तळं होतं. लिहायला बसलं की खिडकीतून ते तळं, त्यात पडलेलं चांदणं स्प...

कुळकथा

रुट्स नावाचं पुस्तक वाचून म्हणे अमेरिकेत आपलं कौटुंबिक मुळ शोधण्याचं फॅड आलं होतं. तसं आपल्याकडे कुलवृत्तांत, गोत्र वगैरे गोष्टी आहेत पण खानदान की खोज म्हणजे जरा अतीच झालं म्हणावं लागेल. मुळातच राजु मुर्डेश्वरकर, हणमाप्पा कवाडे किंवा बाळासाहेब शिंदे इतपत चिल्लर नावं असणारयांनी वंशवृद्धीला खानदान म्हणावं म्हणजे स्नेहा उलालला ऎश्वर्या राय म्हणल्यागतच झालं. विजयविक्रम चोप्रा, संपुर्णप्रताप सिंग असं भरगच्च नाव असणारयांनी खानदान शब्द वापरावा. त्यांच्याकडे म्हणजे कसं, पोरगी पळून गेली की खानदान की इज्जत वगैरे जाते. आपण लग्नाचा खर्च वाचला म्हणत हुश्श करणारे बिच्चारे लोक. तर बाय डीफॉल्ट मी बिच्च्यारा कॅटॅगिरीत असतानाच मी गंडलो. झालं असं की एका दिवाळीत आख्या कुटूंबानं एकत्र यावं असं कुठल्यातरी काकाच्या डोक्यात आलं आणि आम्ही सगळे नांदेडला गेलो. बरीचशी काकामंडळी य वर्षांनी भेटली. काही चुलत भावंडांचे चेहरे फिक्कट ओळखीचे वाटत होते पण मुद्दलात आनंद होता. एक बरया पैकी मोठा दिसणारा बाप्या शिंग मोडून आमच्यात खेळत होता, आमच्या बरोबर जेवत होता आणि नंतर आमच्याच घरी झोपलाही. दुसरयाच दिवशी खेळता खेळता भांडणं...

रस्ता

रस्ता, आदी अन अनंताच्या मधे घुटमळणारा नुस्ताच गुंता. त्याच्या एका बिंदुवर मी सावरुन उभा आहे जणू की तो असावाच एका शेवटाची सुरुवात फक्क पिवळे सोडीयमचे दिवे ओकताहेत पारंपारिक शिळाच प्रकाश, किंवा सरावाने तोडताहेत अंधाराचे हिंस्त्र लचके. आणि आपल्याला उगाचंच वाटत राहातं दिवे प्रकाश देतात रस्ता, पहील्या प्रियकराच्या आठवणींसारखा; संपतच नाही संदर्भ संपले तरीही. लख्खं काळा जणू काळजाला पिळा. त्याच्या काठाकाठावर, भ्रमिष्टांसारखी झुलत असतात गुल्मोहरी काही झाडं, अधूनमधून पडणारया चांदण्यांच्या सावल्यात. रस्ता, अनाघ्रात आणि अस्पर्श. रात्रीचा एखादाच चुकार वाटसरु अंगावर ओरखडे ओढत जातो; अन्यथा पुर्णपणे व्हर्जिन