Posts

प्रतिमांकन: विठ्ठल

॥ विठ्ठल॥ क्षितीजाच्या कडेकडेने रेखावेत थोडे पहाड मधेच लहरी रेघ गढुळशार नदीची गडगडत येणारा एखादा शाळीग्राम आणि त्यावर कोरलेले तुझे नाव "विठ्ठल" ऎकु येतात - भजनांचे मातकट आग्रही स्वर अबीरगुलालाच्या प्रतलातून उधळणाऱ्या रुढीजात घोड्यांच्या टापा वातावरण भोवंडुन टाकणारा श्रद्धावंत कोलाहल आणि सखीचे अनहत हाकारे "विठ्ठल..." नीजेच्या तळाशी उमलुन येतात पायावरचे भवरे तरीही कुणाचे वाट चालणे संपत नाही कुणाचे वाट पाहाणे संपत नाही लोंबतात दंतकथांच्या पारंब्या तुझ्या अचल अंगाखांद्यावर आणि शतकभरात रुजल्याही असतील जमिनीत खोलवर त्यातून उगवणार मुळमाये पुन्हा नव्याने तू "विठ्ठल"

परत रेषेवरची अक्षरे

२०१२ मधे  ' रेषेवरची अक्षरे ' चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय   याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण ,  चर्चा ,  वादविवाद , गॉसिप्स आणि भंकस ,  उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती. मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो.   पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे , मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो.  ' रेरे ' च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो , शरमलो आणि   सुखावलो.   दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आले ,  काही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढली ,  बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही   चित्रगुप्ताच्या तत्परतेनं   पुन्हा सज्ज झालो.   ' रेषेवरची अक्षरे '  या दिवाळीत पुन्हा येतो आहे! ...

विश्वाच्या बेंबीत बोट

" अंजली, अंजली, अंजली, प्यारी अंजली, अंजली" सगळ्या मनुष्यबळ असोशिएट्संनी पहील्याच दिवशी अंजली सुब्रमण्यमचं चिअरगर्ल्स सारखं हातात पॉम-पॉम उर्फ गुच्चे घेऊन गाण्यासकट ऑफीसात जोरदार स्वागत केलं तेव्हा अंजलीचं ऊर भरुन आलं. कुणीतरी तिला हाताला धरुन तिच्या नावाची पाटी असलेल्या क्युबीकलमधे घेऊन गेलं. बराचसा जड असलेला ऎतिहासिक लॅपटॉप तिथे होता. अंजलीचं मन मोहरीएवढं खट्टु झालं पण तिनंच तर मुलाखतीत सांगीतलं होतं की तिला आजीच्या जुन्या पातळाचा वास आवडतो....म्हणून तर जुना लॅपटॉप..."ऍडमीन-ऍडमीन" सोबतची किडमिडीत कीडकी किरकिरली. "काय"? भानावर येत अंजलीनं विचारलं. ..."ऍडमीन-ऍडमीन, तुमचा लॉगीन-पासवर्ड" किडमिडीत कीडकी तोंडातले ६४ पिवळसर दात दाखवत हसली. गंमत म्हणजे तिचा कुर्ताही सुर्यफुलाचे मोठे छाप असलेला पिवळ्या रंगाचाच होता. तिच्या बांगड्या, डोक्यावरचा बॅंड, सॅंडलचे बंद सारंच पिवळ्या रंगाचं होतं, फ्लुरोसंट पिवळं! अंजलीनं तिचे खास एम्बीए हसु चेहराभर पसरवलं आणि किडमिडीत कीडकीला विचारलं, "तुझं नाव काय व्हीन्सेन्ट व्हॅन गॉग आहे काय?" "नाही, नाही, आपल...

भारांच्या निमित्ताने

Meghana Bhuskute and her team completed a  dream project about भा. रा. भागवत. I am sure whosoever can read Marathi has read Bha Ra's books @ Faster Fene, Bipin Booklwar, Jule Verne' transactions etc. This year is his 105th birth anniversary. And what a tribute my friend who herself is a good  writer and editor offered to Bha Ra. http://aisiakshare.com/brbtr I have just started reading but I was hooked right with the page cover itself. Congratulations Meghana!!! I attempted something that tested my patience, pushed me to read and reread many books, was one damn difficult task. Output is पुत्र व्हावा ऐसा पढाकु here- http://aisiakshare.com/node/4133

बहावा

नव्हते कुणीच झडली झाडे सारी       भगव्या ऊन्हात खारी पेटले दिवस विझे रातीचे वारे       तगमग समुद्र खारे सोन्याच्या लगडी खड्या सर्प तलवारी देखणा बहावा दारी मिटतीे फुलती सुर्यकळ्यांचे हार तू ऊनमग्न बहार

चल पेरू निळासा थेंब

चल पेरू निळासा थेंब उश्याशी बिंब तृणपात्याचे पाऊस लागला थोर भुलवला मोर नृत्यगारांचे गुणगुण गोंदण रात नदीचा आर्त नाद पुराचे मेघांना थोडे सांग आवरा रंग कृष्णकमळांचे दरवेशाचे ऋण सावळे उन तुझ्या पाठीचे

ढगाच्या कविता

प्रवासी ढगाचे कुणी गीत गावे तुटे थेंब त्याला नदी जीव लावे ढगाचे पिसारे रिता मोर नाचे शब्दात भिजले कुणी अर्थ वाचे ढगाचे अडकणे चालणे न् थबकणे असण्यात नसणे न् दिसण्यात असणे रुजणे ढगाचे धुक्याच्या उश्याशी      खुणा शोधताना उसवणे स्वतःशी      ॥ सयामी॥ प्रवासी ढगाचे कुठे गाव आहे पहाडात हाका उगा येत आहे खुळ्या चांदण्याचे कुसुंबी उखाणे ढगाचा अबोला निळेशार गाणे ढगाच्या नीजेशी स्वप्न माझेच आहे नदीच्या तळाशी तुझे नाव आहे