अनुवाद ३: He Wishes for the Cloths of Heaven
विल्यम यीट्सची ही १८९९ मधली प्रसिद्ध कविता. ही कविता सिनेमा, टीव्ही मालिका आणि इतरही पुस्तकांमधून वापरली गेली आहे असं विकी सांगतं. या कवितेचा अनुवाद करता करता मला एक सयामी कविता सुचली, यीट्सच्या कवितेची जुळी बहीणंच जणु. तिला नाही म्हणणं अशक्यच होतं म्हणून अनुवादाचा दुसरा भाग म्हणजे ती सयामी कविता. कृष्णाच्या नजरेतून यीट्सची कविता कशी दिसेल असं काहीसं त्या सयामी कवितेचं स्वरुप आहे. Had I the heavens ’ embroidered cloths, Enwrought with golden and silver light, The blue and the dim and the dark cloths Of night and light and the half-light, I would spread the cloths under your feet: But I, being poor, have only my dreams; I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams - William Butler Yeats तेरे लिए सपनों की चादर बुनुं प्रिय, दैवदत्त एखादा शेला असता, सोनेरी आणि चंदेरी प्रकाशलहरींनी विणलेला, गर्द निळ्या, सावळ्या रंगाचा, अंधाराची सळसळ, दिवसाचे लख्खं लावण्य आणि संध्याकाळचे बावरपण कोरलेला तर तुझ्यासाठी त्याच्या ...