Posts

Showing posts from July, 2016

फुल्या-फुल्यांचं साहित्य

Image
भूमिका : समजणं, आवडणं, मान्य करणं (किंवा या प्रत्येकाची विरुद्धार्थी कृती) आणि ती ठाशीव माध्यमात व्यक्त करता येणं या दोन भिन्न गोष्टी असू शकतात. फुल्या-फुल्यांचं साहित्य हा प्रकार माझ्यापुरता तरी असा आहे. वाचनाच्या ओघात बऱ्याच वेळा ओंगळवाणं ते कलात्मक (!) असे लैंगिक अनुभव व्यक्त करणारी पुस्तकं डोळ्यांखालून जात असतात आणि त्याबद्दलची विचारांच्या पातळीवरची प्रतिक्रिया ही निव्वळ खासगी स्वरूपाची असते. पण जेव्हा त्याबद्दल विचार करून लिहिण्याची वेळ येते, तेव्हा मला सततचा अवघडलेपणा जाणवत आहे. अशा अवघडलेपणाचा लेखाच्या गुणवत्तेवर आणि खोलीवर परिणाम होऊ शकतो का? तर हो, ती शक्यता मी या क्षणी नाकारत नाही. दुसरी मर्यादा, जी स्वीकृत आहे, ती म्हणजे हाताशी सगळे संदर्भ नसणं. या दोन्ही मर्यादा लक्ष्यात घेऊन लेखाची मांडणी मी किंचित वेगळी ठेवत आहे. विचारांचा ढग : वेगवेगळे मुद्दे आणि त्यांचा परस्परांशी असणारे संबंध मांडायला विचारांचा ढग मदत करतो. यातले सर्व मुद्दे लेखात येतीलच असं नाही. शिवाय त्यांच्या आपापसांत असणाऱ्या संबंधांमुळे हे मुद्दे स्वतंत्रपणे मांडले जातीलच असंही नाही.   टिपा : १. ’इर