Posts

Showing posts from June, 2015

विश्वाच्या बेंबीत बोट

" अंजली, अंजली, अंजली, प्यारी अंजली, अंजली" सगळ्या मनुष्यबळ असोशिएट्संनी पहील्याच दिवशी अंजली सुब्रमण्यमचं चिअरगर्ल्स सारखं हातात पॉम-पॉम उर्फ गुच्चे घेऊन गाण्यासकट ऑफीसात जोरदार स्वागत केलं तेव्हा अंजलीचं ऊर भरुन आलं. कुणीतरी तिला हाताला धरुन तिच्या नावाची पाटी असलेल्या क्युबीकलमधे घेऊन गेलं. बराचसा जड असलेला ऎतिहासिक लॅपटॉप तिथे होता. अंजलीचं मन मोहरीएवढं खट्टु झालं पण तिनंच तर मुलाखतीत सांगीतलं होतं की तिला आजीच्या जुन्या पातळाचा वास आवडतो....म्हणून तर जुना लॅपटॉप..."ऍडमीन-ऍडमीन" सोबतची किडमिडीत कीडकी किरकिरली. "काय"? भानावर येत अंजलीनं विचारलं. ..."ऍडमीन-ऍडमीन, तुमचा लॉगीन-पासवर्ड" किडमिडीत कीडकी तोंडातले ६४ पिवळसर दात दाखवत हसली. गंमत म्हणजे तिचा कुर्ताही सुर्यफुलाचे मोठे छाप असलेला पिवळ्या रंगाचाच होता. तिच्या बांगड्या, डोक्यावरचा बॅंड, सॅंडलचे बंद सारंच पिवळ्या रंगाचं होतं, फ्लुरोसंट पिवळं! अंजलीनं तिचे खास एम्बीए हसु चेहराभर पसरवलं आणि किडमिडीत कीडकीला विचारलं, "तुझं नाव काय व्हीन्सेन्ट व्हॅन गॉग आहे काय?" "नाही, नाही, आपल