Wednesday, May 7, 2008

रस्ता

रस्ता,
आदी अन अनंताच्या मधे घुटमळणारा नुस्ताच गुंता.
त्याच्या एका बिंदुवर मी
सावरुन उभा आहे
जणू की तो असावाच एका शेवटाची सुरुवात

फक्क पिवळे सोडीयमचे दिवे
ओकताहेत पारंपारिक
शिळाच प्रकाश,
किंवा सरावाने
तोडताहेत अंधाराचे
हिंस्त्र लचके.
आणि आपल्याला उगाचंच वाटत राहातं दिवे
प्रकाश देतात

रस्ता,
पहील्या प्रियकराच्या आठवणींसारखा;
संपतच नाही
संदर्भ संपले तरीही.
लख्खं काळा
जणू काळजाला पिळा.
त्याच्या काठाकाठावर, भ्रमिष्टांसारखी झुलत असतात
गुल्मोहरी काही झाडं,
अधूनमधून पडणारया चांदण्यांच्या सावल्यात.

रस्ता, अनाघ्रात आणि अस्पर्श.
रात्रीचा एखादाच चुकार वाटसरु
अंगावर ओरखडे ओढत जातो;
अन्यथा पुर्णपणे व्हर्जिन

5 comments:

Megha said...

avaghad aahe

a Sane man said...

interesting!

Meghana Bhuskute said...

रस्ता,
त्याला ना आदि ना अंत,
चालत राहणे निरंतर.
विश्वचक्राचा कुठलाही प्रहर.
गुलमोहोरांचा अनावर कहर.
जखमा घेऊन कण्हणारं उदासवाणं शहर.
चराचराच्या श्वासाश्वासातून रुजून आलेलं निळंशार जहर.
तरीही ऋतुमतीला न चुकलेला प्राक्तनाचा बहर.
...चालत राहणे निरंतर.


बाय दी वे - 'हिंस्त्र' नाही, 'हिंस्र'.

Samved said...

आता या वेळी correction नाही करत, कंटाळा आला. आणि कुणाचीही कविता? अचानकच खुप लोक रस्त्यावर आल्यासारखं वाटतयं. कारण अजून एका मित्राने याच विषयावर कविता लिहीली आहे. आता अजून ही एक.आणि भारी correlated..

Meghana Bhuskute said...

"अचानकच खुप लोक रस्त्यावर आल्यासारखं वाटतयं. "
हहपुवा!
माझीच. तिचं श्रेय तुझ्या कवितेला! :)