अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ
[पुस्तक शेवटाकडून वाचण्याचा उरफाटा शौक नसेल तर ही गोष्ट पुढील क्रमाने वाचा:
अपुर्णांकाची अवतरणे- ।१/४।-रम्य ते अभयारण्य
अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू
अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?
]
कॅन्टीनच्या मागल्या बाजुला बसून मीरा पॅडीला प्रेम करावं भिल्लाच्या बाणासारखं वगैरे सांगत होती. तिचा गळा किंवा आपले डोळे भरुन आले तर काय करायचं या विचारांनी पॅडीचं लक्ष पारंच उडालं. त्यानं गेले कित्येक दिवस रुमाल धुतलेलाच नव्हता. संत्र्यासारखं रुमालाची घडी सोलत सोलत त्यानं सगळ्या बाजु वापरुन टाकल्या होत्या आणि आत्ता निकराच्या प्रसंगी रुमाल लागला तर रुमाल म्हणून त्याच्याकडे एक घामट काळपट चौरस कापडी तुकडा होता.
त्यानं कसंबसं मीरेला थांबवलं. अनिलाला आर्चिजच महागड आय लव्ह यू वालं ग्रिटींग देऊन ऑलमोस्ट एक वर्ष झालं होतं. शिवाय ग्रिटींगमधलं गाणं वाजणं बंद झालं तर स्पेअर असावा म्हणून एक बटण सेल पण दिलेला. बाटलीभर गुलकंद निघेल इतके गुलाब देऊन झाले होते. पण तिच्या नरडीतून हो काही निघाला नव्हता. या सगळ्याची पुढची पायरी म्हणजे तिला पळवुन नेणं. पण पॅडी ऎनवेळी चपलेचा अंगठा तुटण्याचा गंड सारु शकत नाही. शिवाय अनिलाचं वजन पेललं नाही तर पडताना आपली मोडतोड होईल ही भिती होतीच. नाही म्हणायला अनिलाचा मुड भारी असताना मागून येऊन एकदा पॅडीनं लाडा लाडात तिच्या मांगेत सिंदूर भरुन ’अब तुम मेरी हो’ असं डिक्लेअर केलं होतं. इमर्जन्सी म्हणून पॅडी नेहमीच सिंदूर बाळगतो. यावर अनिलानं त्याला आरीनं कापून ठेविन असं थंडपणे सांगीतलं होतं. तिनं तिच्या वडीलांच्या धंद्याचा वास्ता देवून धमकावल्यानं पॅडीनं ते सिरिअसली घेतलं इतकच. पण प्रेम करणं थांबवलं नाही, ते चालुच राहीलं.
पण तिच्या नरडीतून हो काही निघत नव्हता. नाही म्हणाली नव्हती हाच काय तो दिलासा. पण आज पॅडी तेही करुन आला होता.
"काय?"
"हो. मी सांगीतलं तिला की आय ऍम अनलव्हींग यू. आय टूक माय प्रपोजल बॅक"
"अरे मागे घ्यायला काय टेन्डर आहे का ते?"
मीरेच्या चेहरयावरची उसनी नाराजी आवाजातही उमटती तर तिने माशी पडलेला तो चहा पिलाच नसता. पण म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं.
पॅडीला दुसरयांदा किंवा तिसरयांदा प्रेमाचा साक्षात्कार होतो.
त्याच्या अपूर्ण आयुष्यातला टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ तिथेच स्थिरावतो.

Comments
-सौरभ
हाहाहाहाहा
टिक्टॉक सीसॉ लवकर संपला...
अजून लिहा!
’इमर्जन्सी म्हणून पॅडी नेहमीच सिंदूर बाळगतो’--वाचून हसून हसून पुरेवाट झाली. कोण हा पॅडी? फारच भारी मित्र दिसतोय तुमचा.
सध्या विशेषतः "थ्री इडियट्स" च्या वातावरणात हे असे लेख जरा जास्तच आवडतात. आता पुढे काय?
Pan kharach apurnankach aahet he. jhepat nahiye.
याला काय अर्थ आहे? सॅण्डी, पॅडी, एनपी, अनिला उर्फ दमयंती... सगळ्यांचं माप त्यांच्या पदरात भरभरून घातलयंस. मीरेनं काय घोडं मारलंय तुझं? हे म्हणजे सगळी वातावरणनिर्मिती इत्यादी झाल्यावर आपण निवांत होऊन लव्हष्टोरी बघायला सरसावून बसावं आणि पडद्यावर एक घाईघाईतलं चुंबन, सूर्यास्त आणि ढॅण - दी एण्ड.
आपला कम्प्लीट मोरू.
चालणार नाही.
परत लिही.