उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता

नव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु.

यावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही.

शिट्टी फुर्र्र्र्र

********************************************************
अमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टोकांवर एकाचवेळी नांदणाऱ्या संस्कृतीत अमृतासारखी बंडखोर कवी जन्मावी हा वेगळाच योग. साहिर, इमरोज असे काही फसलेले आणि काही स्थिरावलेले टप्पे सावरत अमृता सहज लिहून जाते "एक दर्द था- जो सिगरेट की तरह मैंने चुपचाप पिया है । सिर्फ कुछ नज्मे है- जो सिगरेट से मैं ने राख की तरह झाडी है ।"

साहीत्य अकादमी आणि ज्ञानपीठ असे सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या अमृताच्या "आदि" मालिकेतील (आदि रचना, आदि संगीत इ) ही एक कविता.



आदि पुस्तक

मै सां- ते शायद तूं वी...

शायद इक साह दी वित्थ ते खलोता
शायद इक नजर दे हनेरे ते बैठा
शायद अहसास दे एक मोड ते तुरदा ।
पर ओह परा-इतिहास समिआं दी गल्ल है...

एह मेरी ते तेरी होंद सी
जो दुनियां दी आदी भाषा बणी
मैं दी पहचाण दे अक्खर बणे
तूं दी पहचाण दे अक्खर बणे
ते ओहनां आदि भाषा दी आदि पुस्तक लिखी ।

ऎह मेरा ते तेरा मेल सी
असीं पत्थरां दी सेज ते सुत्ते,
ते अक्खां होंठ उंगलां पोटे
मेरे ते तेरे बदन दे अक्खर बणे
ते ओहनां ओह आदि पुस्तक अनुवाद कीती ।

ऋगवेद दी रचना तां बहुत पिच्छों दी गल्ल है...

*****************************
स्वैर अनुवाद
*****************************

आदि पुस्तक

मी होते
आणि कदाचित तू ही..
बहुदा श्वासभर अंतरावर उभा
कदाचित
नजरेआडच्या वळणावर बसलेला
किंवा जाणीवां मधून ओघवता वाहाणारा
पण ही किती तरी जुनी गोष्ट आहे

ते तर माझे आणि तुझे निव्वळ असणे होते
ज्याची आद्य भाषा झाली
"स्व"च्या ओळखीचे अक्षर झाले
"तू"च्या जाणीवांचे अक्षर झाले
आणि त्यांनी आद्य भाषेतील आद्य पुस्तक लिहीले

देहांचे आकार समजत उमजत
आपण दगडांचीच शेज केली.
देहाला उत्कट देहाची पालवी फुटली
अन् सारेच देहभान अक्षर अक्षर झाले

आणि त्यांनी आदि पुस्तकाचा अनुवाद केला

ऋग्वेदाची निर्मिती तर फार नंतरची घटना आहे...




माझा खो निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्राला

Comments

Samved said…
माझा खो निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्राला
Megha said…
anuvaad chaan zalay...amruta chi kavita madhun madhun samajalai navati...pan kay sundar aahe....mala shevatacha kadava farach aavadala..."dehanche" pasun..aani ekhadi Gulzar, Emily chi pan karayachi na lage hath...kunitari parat yalach kho dya re...yachyakade khup chaan chaan kavita aahet bara...
वाह..
शेवटची ओळ तर खतरनाकच.
मी आधी कविताच कमी वाचते, त्यात मावसबोलीतली कविता... अशी अनेक भुणभुणगाणी लावता येतील. पण नको, शक्य तितक्या लवकर टाकते. :)
Tulip said…
आह काय कविता आहे! आणि तु अनुवाद तर अफाट सुंदर केला आहेस संवेद. असा भावानुवाद जमेल का नाही याची शंका आहेच आणि जी काही कविता शोधली जाइल तिचा अपमान तर त्यामुळे होणार नाही ही भितीही. प्रयत्न नक्कीच करीन लवकरात लवकर.

तु कळवलस त्याप्रमाणे माझा ब्लॉग जर न लिहिणार्‍यांच्या यादीत खरंच खालून पाचव्या नंबरवर गेला असेल तर हे धक्कादायक आहे कारण मी लिहितेय याला 'यात्रा'चे दोन भाग साक्षी आहेत. उशिर होईल कदाचित पण ती पूर्ण करणार मी हे नक्की.
पण बाकी नियमित ब्लॉग लिहिण्याची झालेली असते त्याही पेक्षा वेगाने ब्लॉग न लिहिण्याची सवय होते हे मात्र खरंच.
a Sane man said…
सहीच! ह्या ’खो’ची आद्य कविता म्हणून हीची निवड तर भलतीच चपखल. अनुवाद इतक्या उत्कटपणे नि नैसर्गिकपणे उतरेपर्यंत वाट पाहू की नको, तेवढं सांग. ’खो’ घेतलाय, उतरायला वेळ दे! :)
kshipra said…
अमॄताची कविता आणि अनुवाद खरंच एकदम सही आहे. बाकी ट्यु सारखं मलापण वाटतं आहे की जमेल की नाही. म्हणजे मूळ कवितेला धक्का न लागता किंवा सार उतरलं पाहीजे असं काहीसं.

लिखाण/वाचण्यातलं सातत्य संपत आलेलं आहे. त्यामुळे खो घ्यावा की नाही हे ठरवता येत नाहीये.

सेन, अनुवाद १ , अनुवाद २ असे लिहीलेस तरी चालेल.
Anonymous said…
फारच चांगला उपक्रम , संवेद.
आणि ट्युलिप, आम्हा सर्वांना कधी मिळणार तुझा ब्लॊग वाचायला? कुठली "यात्रा"?
नाहीतर तू कविता लिहूनही जाशील आणि कळणारच नाही!
Samved said…
मेघा, अगं श्वास घ्यायला वेळ नाही. अजून नस्त उद्योग नको लावु मागे

निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्रा- हे बघा, नस्ती कारण काढु नका. रुपांतर करा, भाषांतर करा, स्वैर अनुवाद करा नाही तर भावानुवाद करा पण करा. आणि झर झर करा आणि खो पुढे सरकवा. आणि तुम्हाला अनुवाद आवडला वाचून आनंद झाला. कदाचित पहिल्यांच हा प्रयोग केलाय. ठीकच झाला असं वाटतय तुमच्या प्रतिक्रिया वरुन
Samved said…
अभिजीत, अरे किती टिंग्या माराव्या माणसानं? इंटरनेट म्हणजे काय माणूस आहे का की खुप दिवसांनी भेटलं तर ओळख दिली नाही? काही ही फेकावं अन तेही टेकी माणसासमोर? तुला ब्लॉक वगैरे करुन आम्हाला काय आ बैल करायचं का?

आणि थॅन्क्स!
Ashish said…
Nice ! My understanding of both Marathi as well as Punjabi is rudimentary indeed, but I still loved what I understood.
And so here are some translations of her poems in English (Hail Google !); not quite as beautiful, but still so evocative :

http://razarumi.wordpress.com/i-will-meet-you-yet-again-amrita-pritam/

http://www.lehigh.edu/~amsp/2005/11/reflections-and-questions-on-amrita.html
खरडलं खरं. पण माझंच समाधान नाही झालेलं. हा घे दुवा: http://meghanabhuskute.blogspot.com/2010/07/blog-post.html
Gayatri said…
अरे हा भारीच उपक्रम सुरू केलाहेस! काय सुंदर सुंदर कविता वाचायला मिळतायत :) ठ्यान्क्सालॉट!
http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_721.html

http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_3060.html

या 'खो'मधल्या कविता नव्हेत्, पण 'खो'मुळे यांची आठवण झाली. इथे त्यांची नोंद असावी, म्हणून.
a Sane man said…
http://asanemanthinks.blogspot.com/2010/07/blog-post_24.html
Saee said…
Farach sundar. Anuvad wachun watla, "aplyala punjabi kalala asta tar kiti bara zala asta!"
Asach mala Shraddhachi French kavita vachun zala. Pan sigh! saglya bhasha yet nahit mhanunach ase kheL vilobhaneeya (bapre jeebh murgaLli mazi) watatat. :)

अन् सारेच देहभान अक्षर अक्षर झाले

Hee oL mala far awadli. :)
Thanks for starting this. And I am glad I was khoed too. :D
Samved said…
गायत्री- पब्लीक जे काय सुटलय ते बघून माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा फार आनंददायी मामला झाला असं दिसतय एकूण

माझ्याजवळच्या खो च्या नोंदी अश्या:
http://meghanabhuskute.blogspot.com/
http://bolaacheekadhee.blogspot.com/
http://shabd-pat.blogspot.com/
http://asanemanthinks.blogspot.com/
Samved said…
सई-थॅन्क्यु- लिही मग पटपट
darshana said…
samved dada, ultimate translation kela aahes...original kavita thodi varun geli but tu khup mase translate kela aahes....
fandooo
Saee said…
@Samved
Aho kaka..lihilay ki!!
http://randomvichar.blogspot.com/2010/07/blog-post_24.html
Anonymous said…
सुंदर अनुवाद वाचायला मिळतायत. धन्यवाद संवेद.
मला YD ने खो दिलाय.
जे काही अल्पमतीला धरून सुचलंय ते उतरवलंय

http://sonalwaikul.wordpress.com/2010/07/26/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80/
Anonymous said…
सुंदर अनुवाद वाचायला मिळतायत. धन्यवाद संवेद.
मला YD ने खो दिलाय.
जे काही अल्पमतीला धरून सुचलंय ते उतरवलंय

http://sonalwaikul.wordpress.com
Gayatri said…
अजून दुवे:
http://bashkalbadbad.blogspot.com/2010/07/some-lyrics-died-today-at-least-fatally.html

http://rbk137.blogspot.com/2010/07/blog-post.html

http://randomvichar.blogspot.com/2010/07/blog-post_24.html

http://gunjaarava.blogspot.com/2010/07/blog-post_24.html
Megha said…
ha kho kho mala saglyat jasti aavadala.....gayatrine tar kammal keliye....jiyo....thanks 2 everybody for uploading their work so rapidly....aamahala utkrushta(my god mala jaam jad gela ha shabda lihayla) translations vachayla milat aahet...thanks samved....keep up the good work!!
Samved said…
अजून खो:

http://marathisahitya.blogspot.com/
http://jaswandi.blogspot.com/
Samved said…
आणि एक अश...क्य प्रकार

http://thebabaprophet.blogspot.com/
Niftyplayer7 said…
प्रिय सामवेद,ह, अगदीच काही लिहायला नसत  अस काही नाही राव ,तुमच्या सारख्यांच्या कडे तर माझ्या मते खूप काही सांगण्या सारखा असत,बोलण्या सारख असत पण एक मात्र खर कि तुम्हाला वेळ देता येत नसतो,अर्थात हे मी खरोखरच चांगल्या भावनेने म्हणत आहे. "आमच्या" सदाशिव पेठी पद्धतीने नव्हे. तुम्ही लोक दिवसभरात इतक्या वेगवेगळ्या  प्रकारच्या माणसांना कामा निमित्त किंवा इतर काही कारणाने भेटत असता,बघत असता,प्रवास करत असता,त्या मुळे तुम्हाला चालू  घडीचे  माझ्या मते जास्त चांगल्या प्रकारचे भान असते आणि तुम्ही त्याचे जास्त चांगल्या प्रकारे विश्लेषण ,मूल्यमापन  करू शकाल/ करता अशी माझी खात्री  आहे  ,विश्वास आहे. प्लीज थोडा वेळ देता आला तर पहा.  अर्थात तुमचा चाहता,     
poonam said…
इथे सर्व खोंचं एकत्रीकरण होतंय असं दिसलं.. मला जास्वंदीकडून मिळालेला खो, मी इथे घेतलाय-

http://kathapournima.blogspot.com/2010/08/blog-post.html

धन्यवाद सम्वेद!
Anagha said…
नमस्कार,
तुमचा हा खोखो तर अगदी जगभर पसरला! मला खूपच आवडला तुमचा हा उपक्रम! असा निखळ आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन. :)
अनघा
Anagha said…
आणि मला दिला गेलेल्या खोचे हे माझे उत्तर-
http://restiscrime.blogspot.com/2010/08/mungaru-maleyekannada-song-with.html

:)