मी रुजेन


मी रुजेन
मावळेन आरश्याच्या काठावर
मलाच मी शरण येईन

टोचे मारत बांधेन
पुसेन शब्दांच्या पुरत्या मयसभा
स्वतःवरच हसेन

उदो उदो नाचेन
थबकेन तुझ्या दारावर
कोसळून जाईन


झाडातून उगवेन
फुलेन काट्याच्या टोकावर
मी झाड झाड होईन

Comments

छान! आवडली.
Samved said…
प्रशांत, मनःपूर्वक धन्यवाद