माया महा ठगनी


अमेरिकेत रिसर्च स्कॉलर म्हणून काम करणाऱ्या सिद्धार्थ चक्रधरला बंदी घातलेलं स्फोटक मागवल्याच्या संशयावरुन अटक होते तेव्हा त्याची बहीण गायत्री चक्रधर या प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवते.  

सिदच्या लॅबमधल्या ऍडव्हान्सड कंम्प्युटर सिस्टीम पाहून या सगळ्याच्या मुळाशी आर्टीफीशिअल इंटलीजन्सवर चालणारे बॉट्स असावेत हा गायत्रीचा निष्कर्ष सायबर गुन्हेगारी हाताळणाऱ्या एफ़बीआयच्या पॉल कार्लाला सावध करुन जातो. 

बॉट्सचा बनवणाऱ्या मॅडनर्ड कंपनीपर्यंत गायत्री पोचते तेव्हा तिथे रवीकांत, स्टीव्ह आणि आशा यांच्यात सीईओच्या खुर्चीसाठी अटीतटीची शर्यत सुरु झालेली असते. मॅडनर्डमधे गायत्रीसमोर उभा राहातो तो फसवणुक, सत्ताकारण आणि तंत्रज्ञानाच्या अमर्याद शक्तीचा विचित्र खेळ.
 

तुमच्या आमच्या दाराशी उभं असणारं तंत्रज्ञान ज्योशुआसारख्या माणसाच्या हातात पडलं तर काय होईल? फेसबुक आणि व्हॉट्सपवर कोंडाळं करुन राहाणाऱ्या सिदसारख्या प्रत्येकाला प्रत्यक्षातली नाती निभावता येतील? सरतेशेवटी मशीनच जिंकतील ही गायत्रीच्या बाबाची भिती खरी ठरेल? माणसाच्या उद्यामधे काय दडलय हे शोधायचं तर गायत्रीला या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार आहेत.
 
Listen to first AI based novel in Marathi on Storytel (App)



Comments