भयाचे असंबद्ध वर्तमान

मी गच्च बंद डोळ्यांनी
भय हलके उसवुनी आले
पाण्यात खोल दडलेले
काही उदास वर आले

मातीत मुळांचे सर्प
शेवाळ छिन्न उरलेले
जे फिरुन वळूनी आले
ते भय माझ्यात उतरले

ओंजळीत मिटले भाळ
रेषांचे रंग सरकले
क्षितिजाच्या मागे गेले
जुने रक्त साकळले


मारुन अमेचे घोडे
दिवसाला परतुनी आणले
पण दूर खोल दडलेले
काही उदास वर आले

Comments

Anonymous said…
kya baat hai, mastach.
a Sane man said…
सहीच.

एवढंच सुचलं -

थबकून उषेच्या दारी
किरणांचे रथही फिरले
जे लोट धुळीचे उठले,
भय होऊन झणी उगवले
Samved said…
सेन....व्वा!
Megha said…
good....mala sane cha kadava pan aavadala...
Nandan said…
mast, aavadli kavita.
Chhaanach aahe! sane cha kaDawa hi agadi fiTT!
एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/
नाही, आहे धुगधुगी शिल्लक अजून. :)
mad-z said…
शेवटी तुझ्या भिंतीवर तो विंन्सेन्ट चढला वाटतं. दादानी आणि मी त्याच्या जवळपास सगळ्या पेंटींग "चाळून" काढल्या इंटरनेट वर ... "तुला कुठली आवडेल" असा विचार करत :)
Megha said…
pan shevati kuthala painting aavdel te mi decide karun pathavala na...ha ha just kiddin'