Friday, January 4, 2008

नव्या वर्षातील संकल्प

संकल्प १: मी इतका प्रसिद्ध आहे याची मला कल्पनाच नव्हती. आफ्रिकेत बहुदा माझा फॅनक्लबच असावा असा माझा अंदाज आहे. हल्ली मला प्रचंड मेल येतात; कितीतरी आफ्रिकन बॅन्कांचे हेड त्यांचे मिलियन डॉलर फंड्स माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायला अगदी उत्सुक आहेत. विमान अपघातात अख्खं कुटूंब नष्टं होतं आणि मग त्यांचे पैसे मलाच स्विकारावे लागतात. किंवा एखाद्या "minor" चे आई-वडिल कुठल्याशा अपघातात नाहीसे होतात आणि मग ती "बिचारी मुलगी" (दरवेळी मुलगीच का?)तिचं पालकत्व आणि पर्यायाने तिच्या अफाट संपत्तीची जबाबदारी "तुम्ही घ्याच नां..." अश्या आवेशात मला मेल लिहीते. शिवाय मी बरेचसे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरत असलो तरी मायक्रोसॉफ्टची लॉटरी मलाच लागते. मी खुप विचार करुन बघीतला पण लक्ष्मीदेवीचं कोणतही व्रत-वैकल्य केलेलं मला स्मरत नाही. तरीही पैसा, तो ही डॉलर मधे, येतोच आहे.
या नव्या वर्षाचा संकल्प म्हणून सर्वप्रथम मी अश्या गरजु लोकांना अपमानकारक मेल पाठवणार नाही असं ठरवलं आहे.

संकल्प २: अनाहुत फोनवर भरपुर गप्पा मारायच्या. क्रेडिटकार्ड, जॉब ऑफर्स, लोन असे फोन आले की जी कुणी रोजा, मोना, टिना (परत मुलीच...)असेल तिच्याशी खुप खुप गप्पा मारायच्या. जर कर्ज/ क्रेडिट कार्ड साठी फोन असेल तर एखादा करोडचं लिमिट मागायचं आणि या कन्यकांना खुष करुन टाकायचं. जर जॉब साठी असेल तर लगेच रेस्युम देऊन टाकायचा.

संकल्प ३: गर्दीच्या रस्त्यावर, समोरचा कारवाला/ली साईड देत नसेल तर इकडून तिकडून कार काढून त्याला/तिला न घाबरवणे

संकल्प ४: नौकरी सहन करत राहाणे. दुर्दैवाने, कलावंतांना पोसण्याची (को SSहं..)समाजाची नियत नसल्याने आपल्या पोटपाण्याची व्यवस्था आपणच करणे भाग आहे. याच संकल्पाचं दुसरं एक्सटेन्शन म्हणजे, दोन मित्र व्यवसाय करण्याबद्दल चर्चा करत असतील तर आपले मत प्रदर्शित न करणे. "य" वर्षांच्या अनुभवाने गरजेल तो पडेल काय ही म्हण खरी असल्याचे मला पटले आहे

संकल्प ५: वरील संकल्पांवर अनंत काळ विचार करत राहाणे..

नववर्षाच्या शुभेच्छा!!

6 comments:

Megha said...

sankalp no 2 var anand cha upay kay mahiti? to saral ph karnaryala tyacha gharacha ph.no/cell no vicharato aani mich tumhala ph karato thodya velane asa sangto....samorachya bicharya kade ph cut karnyashivay paryay nasato

Meghana Bhuskute said...

पाच नंबरचा संकल्प सगळ्यांत आकर्षक आहे. तो नक्की पुरा होईल, याची आपल्याकडून ग्यारण्टी. :)

Sneha Kulkarni said...

Manasa sankalp kase karatat aani nibhavtat he motha koda aahe majhyasathi!! Anyways tujhya sankalpasathi shubhechcha!! :)

Mints! said...

:) tumache sarv sankalp siddhis jato hi 'tyaa' chyajaval prarthana !

mad-z said...

and how about a sankalp to keep writing regularly!

Monsieur K said...

fantastic new year resolutions :)