Search This Blog

Powered by Blogger.

Pages

संदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...

Featured Post

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ...   झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...

Friday, January 11, 2008

Incomplete three shades of Blue


Sky Blue

अपरंपार श्रद्धेने ज्याचा शोध घ्यावा
असा अर्थाचा उखाणा कधी सापडलाच नाही
आणि आता तू;
निर्मितीच्या क्षणांशी एकरुप होण्याची
वाट पाहात थांबली आहेस.


अभिजात भासांची भुरळ जिला पडते
ती ही प्राचीन संदिग्धतेची नगरी
कदाचित पुन्हा वाहू लागेल
तुझ्या आगमनासरशी


Electric Blue

भिनतील स्पर्श अंगात तेव्हा
डोळ्यात चंद्र वितळत जातील
सारया शक्तीनिशी वाचतील
मला, स्पर्श नाजूकपणे,
आणि बंद डोळ्यातुन
निसटूही देणार नाहीत
अंगाचा एखादाच तुकडा.


संवेदनांच्या सारया टोकांना
एकत्र करुन शोषुन घे
माझे सारे गंध
जड युगासारख्या दीर्घ श्वासातुन.

दिवसातुन दिवस,
रात्रीतुन रात्र जाऊ देत आणि
मला बनु दे तुझ्या शरीराचे
एक अविभाज्य अंग


Deep Blue

Yet to realize...

4 comments:

Tulip said...

Beautiful..!!!

Meghana Bhuskute said...

You should have waited for 'deep blue'. Nonetheless... sundar.

Megha said...

nitant sundar!!
aata deep blue sathi kiti vaat pahavi lagel???

a Sane man said...

सुंदर!

अथांग निळ्याइतकं!