भरल्या पोटीचा न-अभंग

कोंबड्यागत फोनाचे आरविणे-मेलाचे फोनातच चेकविणे
स्वप्नांच्या बुडावर लाथविणे-आपणची आपुल्या

निग्रहाने पुस्तक मिटणे-एमओएमांमागे जीवा पळविणे
पापण्यांना तिष्ठविणे-भरल्या पोटी

कळफलकावर कळा काढिणे-दुसरयांच्या घाणी निस्तरणे
आपुल्या खालचे जळणे-कोणा न दिसे

सश्याचे आतची धडधडणे-श्वासांचे येणे अन रेंगाळणे
सुरांचे आर्त आळविणे-मनयोगासाठी

शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे
त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे

Comments

a Sane man said…
"शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे
त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नस"...

khara re bhau!
Megha said…
kiti ha vaitaaaaag......kharay pan sukh bochatach.
.. said…
कवितेमागचा विचार सुरेख. पण ओढूनताणून अभंगाच्या साच्यात बसवली आहेस असं का वाटतंय?
"शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे
त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे"
Can't agree more.
Anand Sarolkar said…
"Bola samved Maharaj ki Jai..." ;)