Search This Blog

Powered by Blogger.

Pages

संदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...

Featured Post

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ...   झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...

Wednesday, October 28, 2015

खुप आवाज आहे..

खुप आवाज आहे..

वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांचा.

उडणाऱ्या म्हशींचा थवा

छटाहीन हंबरतो आहे घश्याच्या शिरा ताणून.

व्हॉट्सपच्या ईमोजी

भाषेच्या खांबाला बांधलेल्या शब्दांभोवती

फेर धरुन नाचताहेत भीषण.

बोलण्याची असंख्य साधनं

जमा करुन

एकटा माणूस उभा आहे

बेदम भांबावून.

खुप आवाज आहे..

माझ्या डोक्यात..

खुप आवाज..

खुप..

7 comments:

Meghana Bhuskute said...

हळूहळू आवाजाची सवय होते. मग आवाजाच्या छटा विलग करता येतात सगळ्या आवाजी गुंत्यातून. कोणते धागे आपले, कोणते परके, कोणते सुंभ, आणि कोणते गुंतवळ सोडून द्यावेत वार्‍यावर हेही कळायला लागतं. अर्थात - दमायला होतंच! पण तसं तर भोवती छापलेल्या अक्षरांच्या ओरड्यानंही कधीतरी भांबावायला झालं असेलच की. तसंच हे. होईल सवय. होते.
उत्क्रांतीची सवय आहे आपल्याला. वेग.. that is another story. :)

Samved said...

आवाजाची सवय होते हे फार डेन्जरस आहे, हळुहळु उकळणाऱ्या पाण्यात टाकलेल्या बेडकासारखं !

Meghana Bhuskute said...

हो आणि नाही. म्हणजे, वाईट परिस्थितीची सवय होणं आहेच डेंजरस. पण परिस्थिती खरंच फक्त वाईटच आहे का? या बोलण्याच्या साधनांचे फायदे काही झालेलेच नाहीत? काही मक्तेदाऱ्या मोडल्या नाहीत? काही प्रमाणात तरी अंतरांचे बांध फोडलेच नाहीत? माझा अनुभव अगदी उलट सांगतो. म्हणून..हो आणि नाही!

Meghana Bhuskute said...

आज रवीशकुमारचा कार्यक्रम (http://www.ndtv.com/india-news/debate-tv-leading-india-into-darkness-ravish-kumars-show-1279299) पाहताना याची फार आठवण झाली. तू आणि तो एकच गोष्ट बोलत आहात आणि तरीही तुमच्या राजकीय भूमिका अगदी परस्परविरोधी अशा आहेत, या विसंगतीची फार गंमत वाटली.

Samved said...

हाहाहा, धन्यवाद! मला राजकीय भुमिका आहे असं मला वाटत नाही. मला जे बरोबर वाटतं, माझी ती भुमिका असते. हे खरं तर पत्रकारांनी म्हणावं पण दुर्दैवाने त्यांच्या राजकीय भुमिका आणि पडद्यामागची गणितं त्यांच्या व्यावसाईक नितीमत्तेच्या पल्याडच्या आहेत