Posts

शिव्या- एक देणे!

किती थोड्या गोष्टी आहेत माणसाच्या आयुष्यात जिथे देणारा खुष असतो आणि घेणारा खल्लास! तरीही शिव्या भाषिक दृष्ट्या अस्पृश्य का? असे म्हणतात की तुम्हाला एखादी नवी भाषा किती येते याची परीक्षा घ्यायची असेल तर नव्या भाषेत शिव्या द्यायला सांगा. इतकं सारं असूनही शिव्यांना आपण सांस्कृतिक घटक मानत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. शिव्या आणि मनुष्यप्राण्याचं वय यांच्या आंतरीक संबंधांविषयी फारसं संशोधन झालेलं नसलं तरी सांखिकीदृष्ट्या ते सिद्ध करणे फारसे कठीण नाही. उदा. तुम्ही आम्ही लहान असताना भयंकर भांडणे झाली की फार फार तर गाढव किंवा मुर्ख असे म्हणून आत्माराम शांत करायचो. नीट आठवून बघा, कॉलेजमधे या दर्जाची शिवी कधी दिली आहे का? तिथे सर्वसामान्यपणे जो उद्धार होतो तो इथे लिहीणे शिष्टसंमत होणार नाही अन्यथा मी दुर्मिळातदुर्मिळ पुण्यवचने तुम्हा सारयास ऎकविली असती. तर मुळ मुद्दा असा की कॉलेज मधे कानाखाली जाळ शिव्या काढण्या ऎवजी कुणी 'अरे गाढवा' असं म्हटलं तर किती विनोदी वाटेल? आणि कॉलेजमधली दुषणे पन्नास वर्षे वयाचा माणूस द्यायला लागला तरी आपल्या भुवया वर जातातच की. तर, पुराव्यानिशी हे सिद्ध केले ज...

पाहुणा

येऊरच्या जंगलात तिसर्यांदा स्टार्टर मारुनही गाडी सुरु झाली नाही तेव्हा मात्र गाडीत जरा चलबिचल झाली. संध्याकाळची वेळ, त्यात ड्रायव्हरही सोबत नाही आणि आता गाडीही रखडली आहे. "Shit! निदान सेलची तरी रेंज असावी. निघाल्यापासून अपशकून." मोबाईलची बॅटरी आणि सिग्नल, दोन्ही जेमतेम एक कांडी दाखवत होते. दिवस वाईट सुरु झाला की सगळच वाईट होतं म्हणतात, तसंच काही तरी. सिग्नल सारखा येत आणि जात होता पण शेवटी कसबसं बोलणं झालं आणि कामाचं ठिकाण चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे कळाल्यावर जंगलातल्या त्या त्रस्ताचा जीव जरा भांड्यात पडला. कार तिथेच सोडून चालत जाण्याचा निर्णय जसा झाला तसा अचानक घुबडाचा घुत्कार जंगलातल्या शांत वातावरणात घुमला. "जंगलात घुबडाचा नाही तर काय लताचा आवाज येणार आहे?" अशुभाची चाहूल विनोद केला की जाते असं काही लोकांना उगाचच वाटतं. असो. अर्धा पाऊण तास चालूनही कोणीच का दिसत नाहीत म्हणून चंद्राच्या प्रकाशात जंगलातल्या त्या अनोळखी पाहूण्यानं घड्याळ पाहीलं तर ते कधीच बंद पडलं होतं, मोबाईलच्या बॅटरीनं मान टाकली होती आणि डोक्यावरचा चंद्र अभद्र ढगांआड वेगाने नाहीसा होत होता. घश्य...

पुरुषसुक्त: दोन टिपणे (180!)

-१- अस्तित्वाचे अपभ्रंश सोबत घेऊन जगताना थकलास तर थांब कधी माझ्या दाराशी कवितेचे एखादे जुने कडवे उखाण्यासारखे सामोरे घेऊन येईन मी तर कदाचित वितळेल तुझा दगडी चेहरा आणि ओथंबून वाहणारया तुझ्या शब्दांना मिळेलही अर्थाचा एखादा दृष्टांत -२- कोणतेही बंधन नको असते मला की काळाची एखादीही मेख पण पाठीतून आरपार जाणारा मज्जारज्जू सतत खुपत राहातो जसा वारयावर धावणारा अबलख अरबी घोडा वरचेवर कुणी पेलावा धारदार भाल्यावर

रंग

रंगावरुन मनाच्या तळाचे कंगोरे सांगणारा भविष्यवेत्ता भेटला होता मला एकदा. "बोल काय सांगु तुला? भुतकाळातली भुतं की वर्तमानाचे वर्तमान? म्हणत असशिल तर भविष्याचे आरसे आत्ताच दाखवीन उलगडून. ओळखशील स्वतःला आत्ताच, तर सावरशील कदाचित काळाच्या एखाद्या निसरड्या क्षणावर. मनापासुन ऎकशील तर कदाचित फायद्यात राहाशील नाहीतर थोडीशी गंमत समज आणि विसरुन जा" सुर्याची कुळं आणि चंद्राची मुळं खणून भविष्य वर्तवणारी असंख्य बिनचेहरयाची माणसे मी पाहीली होती. हातांवरच्या रेषात भुत-भविष्य शोधत हरवलेली माणसेही माझ्या पाहाण्यात होती. पण निसर्गाच्या अंगांगात भिनलेल्या रंगांचे, त्यांच्या अनंत छटांचे विलगिकरण करु पाहणारा हा पहिलाच. संधीला पंख असतात वायुचे, अशब्दाचे तीव्र कान आणि मौनाची बेजोड भाषा. "निळा" मी माझ्याच नकळत बोलता झालो. "विशाल! बच्चा, मोठं मन, मोठे विचार...आकाशाची भव्यता- सागराची खोली लाभली आहे तुझ्या आवडीला" निळ्या रंगाच्या अनंत छटा माझ्या डोळ्यां समोर तरळत राहिल्या. उत्तरे नसतातच, प्रश्नांचेच छंद होऊ पाहाताहेत आता. "बाबजी, पिवळा रंग? बुद्धाची करुणा आणि ऍनचं एकाकी पण दिसत...

सृजन-सर्जनत्वाचे अपरंपार शोध

एखाद्या कलाकृतीचा अर्थ लावणे, तिला समजून उमजून घेणे आणि दिसणारया परिघाच्या आतील वर्तुळ शोधणे हे सृजनत्वाचे प्राथमिक लक्षण. कलाकृती "वाचणे" म्हणजे समिक्षा करणे हे गृहितक काही अंशी खरे असले तरी त्या समिक्षेची मांडणी, अभिव्यक्तीचे माध्यम आणि मुख्यतः कलाप्रकाराची खोलवर जाण या मुद्यांवर आपण सृजन आणि समिक्षक यांचे द्वैत समजु शकतो. सृजन आणि समिक्षक यांचे हे वर्गिकरण म्हणजे water tight compartmentalization नव्हे. पण समिक्षक हा दर वेळी सृजन असतोच असे नव्हे, कोरडेपणाने व्यवसायाचा भाग म्हणूनही समिक्षा होऊ शकते. पण सृजन हा कोरडा नसतोच आणि तो जाणकार असेल असे ही नाही आणि म्हणूनच त्याच्या मनोवृत्तीत ढाळून एखादा कलाप्रकार बघणे हा मोठा गंमतीचा अभ्यास होऊ शकतो. हा भुप राग, हा सकाळीच म्ह्टला गेला पाहिजे किंवा कुमारांनी इथे समेवर येणे अपेक्षित आहे किंवा हे शार्दुलविक्रिडीत म्हणजे मात्रांचे गणित हे असेच! समिक्षक होता होता राहिलेली, जाण असणारी ही सृजन जमात शास्त्रकाट्यांच्या कसोटीवरच कलेचा आस्वाद घेते. पण हा अभ्यास कधी कधी इतका कठोर होत जातो की रसिकतेची बाकी परिमाणे हळूहळू फिकुटत जातात. पुर्वी नाड...

विदुषक

विदुषकाने एकदा त्याच्या दुखरया पायाकडे आणि नंतर लग्नाचं वय उलटून गेलेल्या त्याच्या मुलीकडे आणि निठल्ल्या, निकम्म्या मुलाकडे अनुक्रमे हताशपणे आणि तिरस्काराने पाहीलं. "या पोरानं काही उद्योगधंदा केला असता तर आज हा मोडका पाय घेऊन नाचावं लागलं नसतं, ना या पोरीच्या लग्नाची चिंता करावी लागली असती" विदुषकानं मनातल्या मनात विचार केला "आणि हो, त्या नव्या बेरकी मॅनेजरची बोलणीही खावी नस्ती लागली." मॅनेजरच्या आठवणीने विदुषक कसानुसा झाला. गेल्या काही महिन्यांपासुन त्याचं वय जाणवत होतं आणि सर्कसच्या त्या छोट्या तंबुचे नियम मोठे स्पष्ट होते; लंगड्या घोड्यांना तिथे जागाच नव्हती. विदुषकाला तरीही खात्री होती की या नव्या जमान्यात सर्कसला कोणी दुसरा जोकर सापडणार नाही. शिवाय त्यानं आज लंगड्या पायांनी मारलेल्या बेडूक उड्यांनाही पब्लीक बरं हसलं होतं. आजचा शो आठवून विदुषकाला जरा धीर आला आणि पायाचं दुखणं मागे सारुन त्यानं मॅनेजरच्या तंबुचा रस्ता धरला. "कदाचित येव्हढ्या वर्षांची सेवा आणि जुने दिवस आठवून देणारा आजचा परफॉर्मन्स, या बळावर एक जीर्ण पगार वाढ!" विदुषकाचं पायाचं दुखणं कुठल...

सावित्री

-१- ... मी म्हटलं,"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं" ... -२१- केवळ एका पत्रांतील दोन शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळ वेळां कांहीच सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले. कुठल्या पाखरांनी स्वरांची ओवणी केली. दिवस तिला अपरुप असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला नाही सोसत शब्दांची बंदिषी. ती म्हणाली होती, अशीच कधीं तरी येईन-आणि दिवस लोटले तरी आलीच नाही. मग वाटेवरच्या बागेंत त्याला कोण भेटलं? कोण कुणाकडं निघालं होतं? बरोबर चालतांना पावलं आडखळलीं नाहींत. डोळे कुठंच रेंगाळले नाहीत. वाट ओळखीची झाली आणि बाजूच्या झाडांनी सावल्यांची तोरणं बांधली. खालीं पडलेल्या जुन्या पानांना पहिली आठवणहि उरली नाहीं. नदीच्या काठांवर ती बसली होती तेव्हां तिनं उगाच पाण्यांत खडा टाकून कुणाला भिवविलं नाहीं. एक सारस पक्षी दुरुन येऊन काठांशी गवतावर अलगद उतरला. त्याचं पाण्यांतलं प्रतिबिंब जरसुद्धा सरकलं नाहीं. पहिली पावसाची सर अचानक आली तेव्हां ती भिजत चिंब तशीच उभी राहिली. देवळाच्या आवारांत त्याच्याबरोबर फिरतांना तिनं सहज एक उत्सवांतील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वा...