रंग

रंगावरुन मनाच्या तळाचे कंगोरे सांगणारा भविष्यवेत्ता भेटला होता मला एकदा.

"बोल काय सांगु तुला? भुतकाळातली भुतं की वर्तमानाचे वर्तमान? म्हणत असशिल तर भविष्याचे आरसे आत्ताच दाखवीन उलगडून. ओळखशील स्वतःला आत्ताच, तर सावरशील कदाचित काळाच्या एखाद्या निसरड्या क्षणावर. मनापासुन ऎकशील तर कदाचित फायद्यात राहाशील नाहीतर थोडीशी गंमत समज आणि विसरुन जा"

सुर्याची कुळं आणि चंद्राची मुळं खणून भविष्य वर्तवणारी असंख्य बिनचेहरयाची माणसे मी पाहीली होती. हातांवरच्या रेषात भुत-भविष्य शोधत हरवलेली माणसेही माझ्या पाहाण्यात होती. पण निसर्गाच्या अंगांगात भिनलेल्या रंगांचे, त्यांच्या अनंत छटांचे विलगिकरण करु पाहणारा हा पहिलाच.

संधीला पंख असतात वायुचे, अशब्दाचे तीव्र कान आणि मौनाची बेजोड भाषा.

"निळा" मी माझ्याच नकळत बोलता झालो.

"विशाल! बच्चा, मोठं मन, मोठे विचार...आकाशाची भव्यता- सागराची खोली लाभली आहे तुझ्या आवडीला"

निळ्या रंगाच्या अनंत छटा माझ्या डोळ्यां समोर तरळत राहिल्या. उत्तरे नसतातच, प्रश्नांचेच छंद होऊ पाहाताहेत आता.

"बाबजी, पिवळा रंग? बुद्धाची करुणा आणि ऍनचं एकाकी पण दिसतं मला. कान कापलेला, उन्हात तळपून सुर्याहूनही तेजस्वी व्हिन्सी दिसतो मला कधी त्यात.."

"उत्तरांचे कसले प्रश्न करतोस बच्चा? विरक्तीचे निःशब्द मार्ग दिसतील तुला, जरा डोकावुन पाहा तुझ्या रंगात"


विचारण्या विचारण्यात रंगा मागून रंग संपले; कधी हिरवा, कधी पारवा आणि पोत तरी किती त्या रंगांचे..गर्भरेशमी हिरवा आणि राघुचा ही हिरवाच.


तो पॅलेटमधले रंग कॅनव्हासवर ओतत राहिला. तलम मऊशार त्वचेवर धारदार चाकुने हळूवार नक्षी काढावी तसे कॅनव्हासचे अर्थ बदलत राहिले आणि कॅनव्हासाची नियतीही. रंगांचे गुढ अर्थ समजुन घेण्यासाठी आता त्याला कुण्या भविष्यवेत्त्याची जरुर नव्हती. एकेक रंग असे चित्तवृत्तीच्या एकेक टोकाला बांधले तर एका माणसातुन किती माणसे उभी राहातील याचे हिशोब त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. आकारां पलीकडले आकार आणि मिती पलीकडल्या मिती रंगवून जीव थकला तसे त्याने प्रकाशाचे दान मागितले आणि सर्वत्र प्रकाश झाला.


ज्या नक्षत्रावर
आम्ही जन्मलो
त्याचे सारेच गुणदोष
कॅनव्हासवर पसरले होते
त्यातून कोणीतरी कोरुन
काढलेलं नाईफपेंटींग
म्हणजे आमचा समुर्त देह

Comments

"रंग असे चित्तवृत्तीच्या एकेक टोकाला बांधले तर एका माणसातुन किती माणसे उभी राहातील याचे हिशोब त्याच्या आवाक्याबाहेरचे होते..."

काय तीव्रतेच्या गोष्टी लिहायच्या असतात तुला... दुर्दैवानं लिहायचे रस्ते नसतेच तर न लिहिल्यामुळे आपण वेडे झालो असतो असं नाही का रे वाटत कधी?
Monsieur K said…
a canvas awaits us.
the palette beckons us.
we lift the brush.
a multitude of colors flow onto the canvas. as these colors flow,
s'times we get mesmerised by what appears on the canvas. s'times, disheartened. s'times, elated.
the colors of the canvas paints us with a myriad of emotions.
only to rekindle the spirit within the canvas and the urge within the artist...
and a unique masterpiece takes birth...

>> एकेक रंग असे चित्तवृत्तीच्या एकेक टोकाला बांधले तर एका माणसातुन किती माणसे उभी राहातील याचे हिशोब त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. आकारां पलीकडले आकार आणि मिती पलीकडल्या मिती रंगवून जीव थकला तसे त्याने प्रकाशाचे दान मागितले आणि सर्वत्र प्रकाश झाला.

amazing! simply amazing!!
Anand Sarolkar said…
WOW!!! Amazing lihila ahe...

P.S.: Don't know why pan he vachtana mage background madhe kuthetari jaltarang vajta ahe asa bhaas hot hota.
झाडून सगळी मित्रमंडळी आज भेटतात, त्यात यंदा तुम्हीपण. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
शहीद - धारातीर्थी - भूमिगत - संन्यासी - नुसतेच मृत .... काय झालंय तरी काय?
wonderfully written! keep them coming!!
Megha said…
kay he,itka sundar lihayacha aani nantar itke divas tatkalat thevayacha...mala vatala hota aata divalit 7,8 tari divali ankancha fadasha padun aala asshil tar fresh mood ni kiti tari lihshil....kunich ka lihit nahiye halli??????? jasti bhav nako khau han. laukar lihi..nahitar....
dhamakich samaj.
बाठे आणि तुमचा काय संगनमताने 'बंद' की काय?
कोहम said…
ज्या नक्षत्रावर
आम्ही जन्मलो
त्याचे सारेच गुणदोष
कॅनव्हासवर पसरले होते
त्यातून कोणीतरी कोरुन
काढलेलं नाईफपेंटींग
म्हणजे आमचा समुर्त देह

Aprateem....ani patala..