Monday, October 8, 2007

कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला

-१-

Writer's Block :- अशी एक अवस्था ज्यात लेखकाला काही तरी सांगायचं असतं किंवा त्याला तसं वाटतं (की आपल्याला काही तरी सांगायचय) पण ते कागदावर उतरवता येत नाही. जरी या अवस्थेला Writer's Block असे नाव असले तरी बहुदा सर्व कलाकार या फेजमधून जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे याला मेन्टल ब्लॉक असे ही म्हणता येऊ शकते. ही अवस्था काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत राहु शकते.
अनुभुतींची कमतरता, कला माध्यमाचा तोकडेपणा, प्रतिभा आणि व्यवहार यांच्यातील अटळ ओढाताण ही यामागची सिद्ध झालेली काही कारणे आहेत. या व्यतिरीक्त मेंदुतील काही रसायनांचे असमतोल हे एक असिद्ध कारण आहे (स्वस्त भाषेत केमिकल लोचा).
यावर उपाय म्हणून लेखकाने अश्या अवस्थेत सतत काही तरी लिहीणे आवश्यक असते, रोज निदान २-३ पाने. शक्यतो असे लिखाण दुय्यम दर्जाचे असल्याकारणे ते आपल्यापुरतेच ठेवावे हे इष्ट.

-२-

सगळंच अस्वस्थ आहे
आभाळ गच्च भरुन यावं आणि सांडूच नये असं काही तरी
एकेक श्वास शब्दांच्या बोलीवर उधार आणलेले
शब्द सापडलेच नाहीत तर? अर्थांचे सारे कोलाज परत मागाल मला सारे?


-३-

"कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला"

लिहू म्हणताच पाषाणाचा आरसा झाला
जिव्हाळ्याचे शिल्प आले जन्माला
रानोमाळ हिंडणारया ओळी एकत्र आल्या
वनमाळी अनुभव मधोमध उभा झाला
पाठमोरा पाठकोरा सामोराही कोराच
कागदासारखा निरक्षर माझा हरी झाला

-४-

अमृता प्रितमची मुलाखत सुरु होती. एक चाळा म्हणून त्या कागदावर काही तरी बरबटत बरबटत मुलाखत देत होत्या. मुलाखत संपल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कागदभर त्यांनी साहीर- साहीर असं लिहीलं होतं. त्याचा हा संदर्भ:

"मी कोरया कागदावर तुझे नाव लिहीत गेले
आणि त्याचीच एक कविता झाली"

"कलमने अज्ज लोडिया गीता दां काफिया
एह इश्क मेरा पहुचिया, अज्ज केहडे मुकाम ते"

-टीपा-

प्रथम चरण- बरयाच लोकांनी Writer's Block चा उल्लेख केलाय. त्याची एक जमेल तेव्हढी व्याख्या मला इथे टाकावी वाटली म्हणून हा कोरडा वाटणारा उद्योग

द्वितीय चरण- या ओळी माझ्या

तृतिय चरण- दिलीप चित्र्यांची एक मला अतिशय भिडलेली कविता. आता ही कविता इथे का असे विचाराल तर मला ती या कॉन्टेक्स्ट मधे भेटली. हरवणे, सापडणे आणि सापडल्यानंतरचा कोरडेपणा असा काहीसा या कवितेचा पोत आहे.

चतुर्थ चरण-या चार ओळी एकाच कवितांचा भाग आहेत की नाहीत माहित नाही पण मला त्या तशा वाटतात. सांगण्याचा मुद्दा असा की तुमची लिखाणा कडे बघण्याची दृष्टी, त्यामागची इन्टेसिटी जर दांडगी असेल तर जगण्यासाठीच्या दोन ओळी कश्याही मिळतील.
अमृताची मी कोरया कागदावर तुझे नाव..ही कविता मला माझ्या आठवणीत अजून दोनदा भेटली आहे; गुलजार आणि दिप्ती नवलच्या कवितांमधून. नक्की संदर्भ आठवत नाहीत.

6 comments:

Meghana Bhuskute said...

तुमची लिखाणा कडे बघण्याची दृष्टी, त्यामागची इन्टेसिटी जर दांडगी असेल तर जगण्यासाठीच्या दोन ओळी कश्याही मिळतील...

tyachsathi sagali tadfad. kunala khari wato wa manbhavi. aapalypurati agadi khari, shwasaitaki aawashyak, apariharya, saktichi..

don oli maganahi khup awastaw tharat kadhi kadhi... tewha kay kartat? kashi tag dhartat?

writer's block'chi wyakhya tar lihilis. ata writer's block jagun kasa sampwaycha ani kas jit-jagat-hati-payi dhad-dhakat baher padayach.. tepan lihi...

Anonymous said...

२. ओळी आवडल्या.

एकेक श्वास शब्दांच्या बोलीवर उधार आणलेले

ही खास करुन जास्त आवडली.

३. अनुभवाला दिलेली वनमाळीची उपमा आवडली.

४. अमृताची कविता बहुतेक गुलजारच्या खालील कवितेत भेटली असावी असा अंदाज आहे. दिप्तीच्या कवितेचे शब्द आता आठवत नाहीत. पण तीनही कविता सुरेख. अनुभवायच्या आहेत त्या.

शंकर रामाणींच्या ’पालाण’ ह्या संग्रहात एक अवतरण दिले आहे.

"A poet's function is not to experience the poetic state; that is a private affair. His function is to create it in others."

ह्या अवतरणाची आठवण झाली.

गुलजारची कविता

नज्म उलझी हुई है सीनेमें
मिसरे अटके हुए है होठोंपर
उडते फिरते तितलियोंकी तरह
लब्ज कागज पे बैठते ही नहीं
कबसे बैठा हुआ हू मैं, जानम
सादा कागज पे लिख के नाम तेरा
बस ! तेरा नाम ही मुकम्मिल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?

पुखराज

Abhijit Bathe said...

क्षिप्रा ची कमेंट आणि २ मधल्या संवेद - तुझ्या ओळी अल्टिमेट!

Meghana said...

totally sahamat with abhijit bathe....ultimate.

Anand Sarolkar said...

Wah! Kay kavita dili ahe Gulzar chi Kshipra ne. Too good!

Meghana Bhuskute said...

photo chhan ahe. pan lihayla wel nahi watat? yeu dya ki ata. bas zala writer's block..